agriculture news in marathi, agrowon, research on kas pathar flower | Agrowon

कास पठारावरील रानफुलांच्या व्यावसायिक शेतीसाठी संशोधन
गणेश कोरे
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

भविष्यात चांगले वाण उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना व्यावसायिक शेतीतून निर्यातक्षम शाेभिवंत फुले उपलब्ध हाेतील.

-डॉ. के. व्ही. प्रसाद, संचालक, पुष्प संशाेधन संचालनालय

पुणे ः रानफुलांचा अमूल्य ठेवा असलेल्या कास पठारावरील (जि. सातारा) फुलांवर संशाेधन करून, नवनवीन वाण विकसित करण्यात येणार आहे. यासाठी प्रकल्पाची आखणी सुरू असून, लवकरच तज्ज्ञ, संशाेधक आणि शास्त्रज्ञांचा गट कास पठारचा अभ्यास दाैरा करणार आहे.

या रानफुलांच्या संशाेधनातून निर्माण हाेणाऱ्या वाणांच्या व्यावसायिक विस्तारासाठी या फुलांची शेती करणे शक्य आहे का, यावर वन विभागाच्या सहकार्याने पुष्प संशाेधन संचालनालयाच्या वतीने संशाेधन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. याविषयी माहिती देताना पुष्प संशाेधन संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद म्हणाले, की भारतामध्ये रानफुलांसाठी विशेष हॉटस्पॉट आहे.

या ठिकाणी निसर्गाचा अमूल्य आणि दुर्मिळ ठेवा असून, या विविध फुलांमधील काही आॅर्किड इंग्रज त्यांच्या बराेबर घेऊन गेले व त्यांनी संशाेधन करून तेच वाण पुन्हा भारतात विक्री करत बाजारपेठ उपलब्ध केली. हे करत असताना अनेक दुर्मिळ फूल वनस्पती कमी हाेत गेल्या.

महाराष्ट्रातील पश्‍चिम घाट परिसरात विविध रानफुले फुलतात. यामध्ये विशेषतः कास पठारावर विविधरंगी हजाराे जातींची फुले फुलतात. वाढत्या पर्यटनामुळे या फुलांच्या अनेक प्रजातींना धाेका निर्माण झाला आहे. सर्वसमान्य नागरिक, पर्यटक आणि शेतकऱ्यांना या दुर्मिळ ठेव्याचे महत्त्व जाणून देण्याबराेबरच या फुलांवर संशाेधनाचा प्रकल्प राबविण्याचे प्रयत्न सुरू आहे.‘‘

निर्यातक्षम शाेभिवंत फुले उपलब्ध होतील
येथील विविध फुलांना नागरी भागात स्थापित करण्यासाठी संशाेधन हाती घेण्यात येणार आहे. यासाठी संशाेधकांचा एक गट लवकरच कास पठारला भेट देणार असून, विविध फुलांचे आणि वनस्पतींचे नमुने संकलित करणार आहे.

या वनस्पतींवर संशाेधन संचालनालयात संशाेधन करून याचे व्यावसायिक वाण विकसित करता येतील का, यावरही संशाेधन केले जाणार आहे. ही प्रक्रिया दीर्घकालीन अाहे. भविष्यात चांगले वाण उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना व्यावसायिक शेतीतून निर्यातक्षम शाेभिवंत फुले उपलब्ध हाेतील, असा विश्‍वास डॉ. प्रसाद यांनी व्यक्त केला.

दुर्मिळ फुलांची काळजी घ्यावी
कास पठारवर पर्यटकांना अनिर्बंध वागण्यामुळे दुर्मिळ फुले धाेक्यात आली आहेत. पर्यटकांनी केवळ फुले पाहण्याचा आनंद घ्यावा. फुले, वनस्पती ताेडणी, त्यावर चालणे, लाेळणे असे प्रकार करू नये, असे आवाहन डॉ. प्रसाद यांनी केले आहे. अन्यथा भविष्यात कास पठारवर फुले शिल्लक राहणार नाहीत, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

गुलछडी, शेवंतीचे वाण प्रसारित करणार
पुष्प संशाेधन संचालनालयाच्या वतीने देशभरातील गुलछडीच्या २२, तर शेवंतीच्या विविध रंगांच्या १५० पेक्षा जास्त वाणांवर संशाेधन सुरू आहे. या विविध वाणांचे प्रक्षेत्रावर लागवड करण्यात आली असून, पुढील महिन्यात यांना फुले येतील. या वेळी राज्याच्या विविध भागांतील शेतकऱ्यांना हे प्रक्षेत्र पाहणीसाठी खुले करण्यात येणार असून, शेतकऱ्यांशी चर्चा करून विविध वाण प्रसारित करण्यात येणार आहे, असेही डॉ. प्रसाद यांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
रसायन विरहित फायद्याची शेती शक्य भारतात आज नेमकी सेंद्रिय व नैसर्गिक शेती...
राज्यातील जमिनीत जस्त, लोह, गंधक,...डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद...
केवळ जमीन आरोग्यपत्रिकेचा उपयोग नाही :...परभणी :जमीन आरोग्यपत्रिकेतील शिफारशीनुसार...
विदर्भात किमान तापमानात सरासरीच्या...पुणे : विदर्भाच्या काही भागांत थंडीत वाढ झाली आहे...
मातीची हाक मातीचा कस घटल्यामुळे मरणपंथाला लागलेल्या जमिनी...
मातीच्या घनीकरणाने घटते उत्पादनजमीन खराब होण्याचे एक महत्त्वाचे कारण   ...
समजून घ्या जमिनीची आरोग्यपत्रिकाबऱ्याच शेतकऱ्यांकडे जमिनीची आरोग्यपत्रिका उपलब्ध...
सावधान, सुपीकता घटते आहे... पुणे : महाराष्ट्रातील भूभागाचे मोठ्या...
अॅग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला जालन्यात...जालना : सर्वांची उत्सुकता लागून असलेल्या सकाळ-...
शून्य मशागत तंत्रातून कस वाढविला...मी १९७६ पासून आजपर्यंत जमिनीची सुपीकता...
सेंद्रिय कर्बावर अवलंबून जमिनीची सुपीकताजमिनीस भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म हे...
भूमिगत निचरा तंत्राद्वारे क्षारपड...सुरू उसात दक्षिण विभागात पहिला क्रमांक उरुण...
अतिपाण्यामुळे क्षारपड होतेय जमीनक्षारपड-पाणथळ जमिनीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी...
जैवइंधन, जैवखते, ठिबक उपकरणांच्या...२९ वस्तू आणि ५३ सेवांच्या जीएसटी दरामध्ये कपात...
प्रगतीच्या दिशेने पाऊलराज्यात कृषी विद्यापीठांच्या स्थापनेपासून ते १९९०...
सहकारी बॅंका डिजिटाइज केव्हा होणार?डिजिटल बॅंकिंग याचा अर्थ आधुनिक तंत्रज्ञानाच्या...
कारखाने, ऊस उत्पादकांचे नुकसान...नवी दिल्ली : साखरेच्या घाऊक दरात घसरण होऊनही...
इंडोनेशिया, चीनला द्राक्ष निर्यातीत...नाशिक : रशिया, चीन, इंडोनेशिया अशा काही देशांनी...
किमान तापमानाचा पारा वाढू लागलापुणे : दक्षिण कर्नाटकाच्या परिसरात चक्राकार...
कृषी संजीवनी प्रकल्पाची मंजुरी अंतिम...मुंबई : दुष्काळापासून शेतीचे संरक्षण आणि खारपाण...