agriculture news in marathi, agrowon, return monsoon, india | Agrowon

माॅन्सूनच्या परतीचा प्रवास पुढील आठवड्यापासून?
संदीप नवले
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

सध्या राजस्थानच्या पश्चिम भागात पाऊस पडत आहे. त्यामुळे पाच ते सहा दिवस परतीचा पाऊस सुरू होण्याची शक्यता कमी आहे. पुढील आठवड्यात या भागातील पाऊस थांबल्यास परतीचा पाऊस सुरू होईल. त्याचा अंदाज चार ते पाच दिवस आधी हवामान विभाग जाहीर करेल. 
- पी. सी. एस. राव, वैज्ञानिक, हवामान विभाग, पुणे

पुणे ः राजस्थानच्या पश्चिम भागात अजूनही पाऊस पडत आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या परतीचा प्रवास उशिराने होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. येत्या पाच ते सहा दिवसांत तरी माॅन्सूनच्या परतीचा प्रवास होण्याची शक्यता कमी आहे. परंतु पुढील आठवड्यात, सोमवार (ता. १८) नंतर या भागातील पाऊस थांबल्यानंतर मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे, असे संकेत हवामान विभागाच्या सूत्रांनी दिले आहेत. 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार राजस्थानच्या पश्चिम भागातील पाऊस थांबल्यानंतर पाच दिवस आधी परतीच्या पावसाचा अंदाज दिला जाणार आहे. देशात साधारणपणे एक सप्टेंबर रोजी परतीचा प्रवास होण्याचा अंदाज असतो. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून देशाच्या वायव्य भागात कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. ही स्थिती अजून पाच ते सहा दिवस राहण्याची शक्यता आहे. तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, त्रिपुरा, उत्तराखंड, गुजरात, झारखंड या भागांतही पाऊस पडत आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या परतीला अनुकूल स्थिती अजून तरी तयार झालेली नाही.

 परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर वाऱ्याची दिशा बदलून ती उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. त्या वेळी राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाना या भागांतील पाऊस थांबतो. त्या वेळी उत्तरेकडील हवेचा दाब वाढलेला असतो. तर दक्षिणेकडील हवेचा दाब कमी असतो. त्याच वेळी ईशान्येकडील हवेचा दाब जास्त असल्याने वारे ईशान्येकडून बाष्प घेऊन दक्षिणेकडे येतात. टप्याटप्याने हे वारे दक्षिणेकडे सरकल्याने मॉन्सूनचा परतीचा पाऊस सुरू होतो. 

महाराष्ट्राच्या पूर्व भागाकडील मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र या भागांत परतीचा पाऊस चांगला पडतो. कोकणात हा पाऊस कमी होतो. दक्षिणेकडील तमिळनाडूच्या भागात हा परतीचा पाऊस नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरपर्यंत सुरू असतो.

गेल्या दहा वर्षांतील पावसाचा परतीचा प्रवास लक्षात घेतला असता, २०१३ मध्ये नऊ सप्टेंबर रोजी परतीचा प्रवास सुरू झाला होता. त्यानंतर २०१५ मध्येही चार 
सप्टेंबर रोजी परतीचा प्रवास सुरू झाला होता, असे दिसून येते. यंदा १८ सप्टेंबरनंतर पोषक हवामान झाल्यास परतीचा प्रवास सुरू होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला आहे. 

मागील दहा वर्षांतील 
मॉन्सूनच्या परतीची वेळ

२००७ ः ३० सप्टेंबर 
२००८ ः २९ सप्टेंबर 
२००९ ः २६ सप्टेंबर  
२०१० ः २७ सप्टेंबर 
२०११ ः २३  सप्टेंबर 
२०१२ ः २४ सप्टेंबर 
२०१३ ः ९ सप्टेंबर 
२०१४ ः २३ सप्टेंबर 
२०१५ ः ४ सप्टेंबर 
२०१६ ः १५ सप्टेंबर 

इतर अॅग्रो विशेष
सहकार मंत्र्यांच्या कारखान्यावरच...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार...
शेतकऱ्यांच्या १८० संघटनांची दिल्लीत धडकनवी दिल्ली : मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा...
भरकटलेल्या धोरणांमुळे सहकारी दूध संघ...विस्कटलेल्या दूध धंद्याचे भरकटलेले धोरण : भाग एक...
आंबा पीक सल्लाआंबा पिकाचे वार्षिक चक्र काढणीनंतर म्हणजे जून...
गाय, म्हैसवाटप योजनेस मान्यतापुणे : मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर दुष्काळी...
कृषी योजनांच्या प्रचारासाठी व्हाॅट्सअॅप...अकोला : कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती...
बोंडअळीच्या प्रादुर्भावाने वाढली...अमरावती (प्रतिनिधी) ः अमरावती विभागातील अनेक...
प्रश्न जादा साखरेचादेशात पुढच्या वर्षी साखर उत्पादनात वाढ अपेक्षित...
दक्षिण ब्राझीलमधील साखर उत्पादनात घट नवी दिल्ली ः ब्राझील देश साखर उत्पादनात जगात...
दुष्काळग्रस्त लातूर जिल्हा ५० टक्के `... लातूर ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत जलयुक्त...
नांदेड जिल्ह्यात २५० गावांत शेतकऱ्यांचा...नांदेड : पुणे जिल्ह्यातील कानगाव (ता. दौंड)...
बैलांच्या सजावटीला बचत गटाचा साजनशिराबाद (जि. जळगाव) येथील दुर्गाबाई शांताराम नाथ...
खाद्यतेल अायात शुल्कात दुप्पट वाढमुंबई : देशांतर्गत तेलबियांच्या दरात होणारी...
पीकेव्ही हायब्रीड-२ कापूस वाणास...जिरायती शेतीसाठी वाण; २०१९ च्या हंगामात होईल...
‘आनंद निकेतन`ने घेतला शिक्षण,...स्वावलंबनातून शिक्षण तसेच सहिष्णुता, समता,...
अंदमानलगत कमी दाबाचे क्षेत्र; पावसाची...पुणे : अंदमान निकाेबारलगत नवीन कमी दाबाचे क्षेत्र...
विलीनीकरण नको, पुनर्रचना कराएकोणीसाव्या शतकाच्या अखेरच्या अघोऱ्या ...
प्रकल्प पूर्णत्वाचा मार्ग खडतरविदर्भ, मराठवाड्यासह उत्तर व पश्चिम...
पाशा पटेल यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जामुंबई : राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा...
ज्वारी, करडई, सूर्यफूल, कापूस पीक सल्लारब्बी ज्वारी : खोडकिडा : (पोंगेमर) लक्षणे...