द्रवरूप जैविक खत विक्रीतून एक कोटींचा महसूल

जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळेला विभागीय कृषी सहसंचालक एन. टी. शिसोदे यांनी भेट दिली. या वेळी त्यांना तांत्रिक माहिती देताना तंत्र अधिकारी डी. बी. देशपांडे.
जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळेला विभागीय कृषी सहसंचालक एन. टी. शिसोदे यांनी भेट दिली. या वेळी त्यांना तांत्रिक माहिती देताना तंत्र अधिकारी डी. बी. देशपांडे.

वर्धा  ः द्रवरूप जैविक खत विक्रीत आघाडी घेत सेलू (जि. वर्धा) येथील जैविक कीडनियंत्रण प्रयोगशाळेने वर्षभरात तब्बल एक कोटी रुपयांचा महसूल राज्य सरकारला मिळवून दिला आहे. वर्षभरात २३ हजार ८२४ लिटर द्रवरूप जैविक खताचे उत्पादन या प्रयोगशाळेतून करण्यात आले. 

द्रवरूप जैविक खतात नत्र स्थिरीकरण करणारे, पालाश उपलब्ध करणारे आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू राहतात. राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी याच्या उत्पादनास सुरवात केली. त्यानंतर द्रवरूप जैविक खतांना मागणी वाढावी, याकरिता शेतकऱ्यांना अनुदानावर याचा पुरवठा केला जातो. परंतु, याचे परिणाम अनुभवल्यानंतर शेतकरीदेखील आता या खतांची मागणी नोंदवू लागले आहेत. 

गेल्या वर्षीच्या हंगामात ११०० लिटर द्रवरूप जैविक खताची खरेदी शेतकऱ्यांनी केली. पश्‍चिम विदर्भात सेलू येथील जैविक किडनाशके निर्मिती प्रयोगशाळेत द्रवरुप जैविक खतांचे उत्पादन होते. तंत्र अधिकारी डी. बी. देशपांडे यांच्या नियंत्रणातील या प्रयोगशाळेने द्रवरूप खत उत्पादनात राज्यात आघाडी घेतली आहे. २३ हजार ८२४ लिटरचे उत्पादन वर्षभरात या प्रयोगशाळेत करण्यात आले. त्या माध्यमातून १ कोटी ४ लाख १७ हजार रुपयांचा महसूल शासनाला मिळाला आहे. द्रवरुप जैविक खताची विक्री ४०० रुपये लिटरने होते. विशेष म्हणजे उत्पादन आणि शासन महसूलात गेल्या तीन वर्षांपासून या प्रयोगशाळेची आघाडी राहिली आहे.

राज्यातील इतर प्रयोगशाळांतील उत्पादन (चौकटीत महसूल)

अहमदनगर १९,१९६ लिटर (५६ लाख ७१ हजार रुपये)
औरंगाबाद १८,४२७.२० लिटर (७१ लाख ४४ हजार रुपये)
परभणी १३,३६७.५ लिटर (५७ लाख ९५ हजार रुपये)
नांदेड १५,३३६ लिटर (५९ लाख ६७ हजार रुपये)
धुळे ८,६०० लिटर (२१ लाख ७९ हजार रुपये)
जळगाव ५,५०० लिटर (२५ लाख ४९ हजार रुपये)
अमरावती ७,०२२ लिटर (२१ लाख ४ हजार रुपये)
बुलडाणा ११४६७ लिटर (४७ लाख ५१ हजार रुपये)
यवतमाळ ४१५० लिटर (७ लाख ८३ हजार रुपये)
सेलू २३,८२३ लिटर (१ कोटी ४ लाख १७ हजार रुपये)
एकूण १,२६, ८८९.७ लिटर (४ कोटी ७३ लाख ६० हजार रुपये)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com