agriculture news in Marathi, agrowon, rGrowth in fourteen crops loan | Agrowon

पुणे जिल्हा बॅंकेकडून चौदा पिकांच्या पीककर्ज दरात वाढ
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 एप्रिल 2018

पुणे  ः शेतकरी घेत असलेल्या पिकांचा उत्पादन खर्च वाढत असल्याने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनेही पीककर्ज दरात वाढ करण्याचे ठरविले आहे. यंदा बँकेने चौदा पिकांच्या पीक कर्जदरात वाढ केली आहे. यामध्ये उसाच्या पूर्वहंगामी, सुरू आणि खोडवा पिकांच्या पीककर्ज दरात सर्वाधिक म्हणजे वीस हजार रुपयांनी वाढ केली आहे.

पुणे  ः शेतकरी घेत असलेल्या पिकांचा उत्पादन खर्च वाढत असल्याने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनेही पीककर्ज दरात वाढ करण्याचे ठरविले आहे. यंदा बँकेने चौदा पिकांच्या पीक कर्जदरात वाढ केली आहे. यामध्ये उसाच्या पूर्वहंगामी, सुरू आणि खोडवा पिकांच्या पीककर्ज दरात सर्वाधिक म्हणजे वीस हजार रुपयांनी वाढ केली आहे.

दरवर्षी शेतकरी घेत असलेल्या पिकांच्या वार्षिक उत्पादन खर्चात वाढ होत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या तांत्रिक समितीने उत्पादन खर्चाचे निश्चित केलेले दर यावर प्रगतशील शेतकरी, तसेच जिल्हा उपनिंबधक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रगतशील शेतकरी, बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये उत्पादन खर्चावर नुकतीच चर्चा झाली होती. त्यामध्ये पंधरा पिकांच्या पीककर्ज दरात वाढ करण्याचे निश्चित करण्याचे ठरविले आहे. आर्थिक वर्षामध्ये ठरविलेल्या दरानुसार शेतकऱ्यांना कर्जाचे वितरण करण्यात येत आहे.  

जिल्ह्यातील जवळपास २७५ शाखांमधून कर्ज वाटप केले होते. जिल्ह्यात बँकेचे खातेदार संख्या जवळपास दोन लाख ५६ हजार ६९० एवढी आहे. त्यापैकी जवळपास दोन लाख सभासद शेतकरी पीककर्ज घेतात.

शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर तीन लाखांच्या पुढे सहा टक्के व्याजदराने कर्ज दिले जाणार आहे. शेती कर्जामध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, सोयाबीन, सुर्यफूल कापूस, ऊस, हरभरा, फळबाग, भाजीपाला पिकांना पीककर्जाचा पुरवठा केला जातो. तर शेतीपूरक कर्जातून ठिबक सिंचन, उपसा पाइपालाइन, ट्रॅक्टर, ट्रेलर, जेसीबी, शेतीपूरक औजारे, शेळी, मेढीपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, संरक्षित शेती,  बिगर शेतीमध्ये शैक्षणिक, गृहकर्ज, साखर कारखाने व औद्योगिक कर्ज दिले जाते. 

मात्र, यंदा शेती कर्जातील भूईमूग, खरीप कांदा, पूर्व हंगामी ऊस, सुरू ऊस, खोडवा ऊस, द्राक्षे, टिश्युकल्चर केळी, बटाटा खरीप, टोमॅटो, संकरित भात, कांदा रब्बी, बटाटा रब्बी, डाळीब सुधारित जाती अशा पंधरा पिकांच्या पीक कर्ज दरात वाढ केली आहे. उर्वरित कोणत्याही पिकांच्या कर्जदरात वाढ केलेली नाही. उसापाठोपाठ डाळिंबाच्या सुधारित जातीच्या पीककर्जाच्या दरात पंधरा हजार रुपयाने वाढ केली आहे. 

पिकांचे पीककर्जाचे दर व झालेली वाढ

पीक जुने पीक कर्जाचे दर नवीन पीक कर्जाचे दर झालेली वाढ 
ऊस हंगामी ९५००० १,१५००० २०,०००
सुरू ऊस ९५००० १,१५,०००  २०,०००
खोडवा ऊस ९५,००० १,१५,००० २०,०००
द्राक्षे २९,००० ३०००० १,०००
टिश्यूकल्चर केळी १,१५,००० १,३२,००० १७,००० 
बटाटा खरीप ७०,००० ७२,६०० २६०० 
टोमॅटो खरीप, रब्बी ७५,००० ७७,००० २००० 
संकरित भात ४४,००० ४७,५०० ३५०० 
भुईमूग ३६,००० ३७,८०० १८००
कांदा खरीप ६०,००० ६५०००  ५००० 
संकरित भात ४४,००० ४७,५०० ३५०० 
कांदा रब्बी  ६०,००० ६५,००० ५०००
बटाटा रब्बी ७०,००० ७२,६०० २६०० 
डाळिंब सुधारित १२५,००० १,४०,००० १५,०००

 

इतर बातम्या
कपाशीच्या नांदेड ४४ बीटी बियाण्याची ५...परभणी ः महाबीज आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
वनस्पतीच्या ताण स्थितीतील संदेश यंत्रणा...वनस्पतीतील ताणाच्या स्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
शेतीमालाच्या काढणीपश्चात तंत्रज्ञानावर...नाशिक :  ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
रायवाडी तलावातून १५ हजार ब्रास गाळ काढलासांगली ः कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्वाधिक पाणी...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई होतेय तीव्रसातारा ः जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई तीव्र होत...
लातूर विभागात होणार चौदाशे शेतीशाळालातूर ः या वर्षीपासून शेतकऱ्यांच्या शेतावर...
कोरडवाहू फळपिकांच्या क्षेत्र वाढीसाठी...नांदेड ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शाश्वत...
पुणे जिल्ह्यासाठी २६ हजार ५७३ क्विंटल...पुणे  ः खरीप हंगाम सुरू होण्यास एक ते दीड...
पुणे विभागात राष्ट्रीय फलोत्पादन...पुणे   ः कृषी विभागामार्फत चालू वर्षी...
तंटामुक्‍त गाव अभियानाला चंद्रपुरात...चंद्रपूर : शांततेतून समृद्धीकडे जाण्याचा...
परभणीत खरिपासाठी ९७ हजार क्विंटल...परभणी ः परभणी जिल्ह्यात २०१९-२० च्या खरीप...
अमरावतीत तुर चुकाऱ्यासाठी हवे ८७ कोटी;... अमरावती : चुकाऱ्यांसाठी यंदा शेतकऱ्यांना...
शेतीच्या दृष्टीने सरकारचा कारभार...नाशिक : अगोदरचा कालखंड व ही पाच वर्षे यात...
अमरावतीतून ९१ विहिरी अधिग्रहणाचे...अमरावती  ः सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे...