शाहु महाराज, अंबाबाईचे दर्शन घेवुन नव्या संघटनेची घोषणा - खोत

सदाभाऊ खोत
सदाभाऊ खोत

कऱ्हाड - घटस्थापनेदिवशी 21 तारखेला छत्रपती शाहु महाराज व अंबाबाईचे दर्शन घेवुन नव्या संघटनेची घोषणा केली जाईल. संवादातून संघर्षाकडे असे नव्या संघटनेचे ब्रिदवाक्य आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे दिली

येत्या 30 तारखेला  इचलकरंजी येथे दसरा मेळावा होणार आहे. यामध्ये सोन लुटण्यासाठी ५० हजार शेतकऱ्यांची उपस्थिती राहणार आहेत, असेही खोत म्हणाले. यंदाच्या ऊस दरासह अन्य पिकांच्या बाबतीतील निर्णय जाहीर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

कऱ्हाडमध्ये एका कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. भाजपचे जेष्ठ नेते राजाभाऊ देशपांडे, माजी आमदार भगवानराव साळुंखे,  नितीश देशपांडे आदि उपस्थित होते. 

मंत्री खोत म्हणाले, संघटनेचे नाव काय असावे यासाठी १६ जणांची मसुदा समिती गठीत केली आहे. २० तारखेला त्यांची बैठक होवुन त्यामध्ये संघटनेच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. ही संघटना सर्वांना बरोबर घेवुन काम करेल.  

येत्या 30 तारखेला  इचलकरंजी येथे दसरा मेळावा घेतला जाईल. त्यामध्ये सर्व प्रकारचे कामगार आणि शेतकऱ्यांच्या ऊसाचा मुद्यावरही काय भुमिका असेल ते आम्ही जाहीर करणार आहोत. त्याचबरोबर अन्य पिकांच्या बाबतातीलही संघटेनेचे धोरण जाहीर केले जाईल.

ते म्हणाले, मी माढा मतदार संघात जाऊन निवडणुक लढवली. हातकणंगले तर माझा घरचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातुन आगामी लोकसभा निवडणुक का लढवु नये ? आत्तापर्यंत केंद्राने कर्जमाफी दिली होती मात्र राज्याने एवढी मोठी कर्जमाफी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा निश्चीतपणे लाभ होईल. आत्तापर्यंत ५० लाख शेतकऱ्यांनी आॅनलाईन भरले आहेत. जे कर्जमाफी फसवी आहे असे म्हणत आहेत मग ५० लाख शेतकरी फसवे आहेत का ? त्यांनी अर्ज भरले कसे ? सरकार शेतकऱ्याच्या बाजुचे असुन शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळवुन दिला जाईल. 

मी चळवळीतील कार्यकर्ता आहे. कोण काय म्हणतय त्यापेक्षी मी काय करायचे यावर भर दिला असुन मी स्पर्धा करत नाही, असा खुलासाही मंत्री खोत यांनी खासदार राजु शेट्टी यांच्या टिकेवर देवुन अधिक बोलणे टाळले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com