सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेची स्थापना

कोल्हापूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या ‘रयत क्रांती संघटने’च्या लोगोचे उद्‌घाटन करताना शेजारी सागर खोत, श्रीकांत घाटगे आदींसह संघटनेचे कार्यकर्ते. (छायाचित्र ः बी. डी. चेचर)
कोल्हापूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या ‘रयत क्रांती संघटने’च्या लोगोचे उद्‌घाटन करताना शेजारी सागर खोत, श्रीकांत घाटगे आदींसह संघटनेचे कार्यकर्ते. (छायाचित्र ः बी. डी. चेचर)

कोल्हापूर : यंदा ऊस उत्पादकांना चांगले दिवस असून, दर चांगला मिळणार आहे. यासाठी आंदोलन करावे लागणार नाही, दर किती घ्यायचा हे मी ठरविणार, असे सांगत याचा निर्णय  दसऱ्याच्या दिवशी होणाऱ्या मेळाव्यातच जाहीर करेन, अशी घोषणा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी (ता.२१) येथे केली.

श्री. खोत यांनी स्वभिमानीतून हकालपट्टी झाल्यानंतर घटस्थापनेच्या मुहूर्तावर शाहू सांस्कृतिक भवनात "रयत क्रांती संघटने"ची स्थापना आणि लोगोचे उद्घाटन केले. तसेच ही संघटना केवळ शेती प्रश्‍नावरच नव्हे तर इतर क्षेत्रात होणाऱ्या अन्यायाविरोधात लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आजपर्यंत झालेल्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी सज्ज व्हा असे, आवाहन त्यांनी या वेळी केले. स्वाभिमानी संघटनेवर नाव न घेता टीका केली असली, तरी खासदार राजू शेट्टी यांचा नामोल्लेख त्यांनी टाळला.

ते म्हणाले, की मी शेतकऱ्यांचा दूत म्हणून सरकारमध्ये गेलो. पण काही जणांना ते बघवले नाही. माझ्या विरोधात बोलणे सुरू झाले. जे काही चुकीचे निर्णय होतील ते सदाभाऊंमुळेच झाले, अशी आवई उठविण्यात आली. मी शेतकऱ्यांसाठी नांगरण्याचे काम केले. पण पेरक्‍या दुसरा ठेवला आणि फायदा तिसऱ्यानेच उठविला, अशी माझी गत झाली. 

यापुढे मात्र रानपण मीच नांगरणार, मीच पेरणार लाभ मात्र शेतकरीच उठविणार, यामुळे येथून पुढे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन श्री. खोत यांनी केले.  या वेळी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी सुरेशदादा पाटील यांची, तर युवा प्रदेशाध्यक्षपदी शार्दूल जाधवर यांची निवड करण्यात आली. या वेळी सागर खोत, संदीप भोई, प्रा. विनायक पाटील, दि. बा. पाटील, निशिकांत पाटील, दिलीप माणगावे, प्रकाश कोळी आदींची भाषणे झाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com