agriculture news in Marathi, agrowon, In Sangli district, 60% Complete turmeric cultivation on the area | Agrowon

सांगली जिल्ह्यात ६० टक्के क्षेत्रावरील हळद लागवड पूर्ण
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 मे 2018

सांगली  ः जिल्ह्यात हळद लागवड अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सुरू झाली. आज अखेर जिल्ह्यात सुमारे ६० टक्के क्षेत्रावर लागवड झाली असून, उर्वरित ४० टक्‍के क्षेत्रावरील लागवड पंधरा दिवसांत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे.
 

सांगली  ः जिल्ह्यात हळद लागवड अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सुरू झाली. आज अखेर जिल्ह्यात सुमारे ६० टक्के क्षेत्रावर लागवड झाली असून, उर्वरित ४० टक्‍के क्षेत्रावरील लागवड पंधरा दिवसांत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे.
 

जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकरी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर हळद लागवडीस प्रारंभ करतात. जिल्ह्यात गेल्या वर्षी सुमारे एक हजार हेक्‍टरवर हळदीची लागवड करण्यात आली होती. यंदा मात्र वीज खंडित होत असल्याने उशिरा हळद लागवड करण्यास शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. ज्या शेतकऱ्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांनी हळद लागवड केली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा हळदीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्‍यता हळद संशोधन विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

सांगली जिल्ह्यात वाळवा, पलूस, मिरज तालुक्‍यांत प्रामुख्याने हळदीचे मोठे क्षेत्र आहे. गतवर्षी जिल्ह्यात सुमारे १ हजार हेक्‍टर क्षेत्रावर हळदीची लागवड केली होती. यंदा हळदीच्या क्षेत्रात अंदाजे ८०० हेक्‍टरने वाढ होण्याची शक्‍यता कसबे डिग्रज येथील हळद संशोधन विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. 

वास्तविक पाहता गेल्या चार ते पाच वर्षांपासून हळदीचे दर स्थिर आहेत. यंदा देशात हळदीच्या उत्पादनात घट झाली असल्याने हळदीचे दर वाढण्याची शक्‍यता असल्याची चर्चा शेतकऱ्यांच्यात सुरू आहे. 

वाळवा, मिरज पश्‍चिम भाग आणि पलूस या भागात पाणी उपलब्ध असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी हळद लागवड केली आहे. सुमारे ६० टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात वळीव पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पावसावर उर्वरित शेतकरी हळद लागवडीसाठी पुढे आले आहेत. प्रामुख्याने वाळवा, पलूस, मिरज तालुक्‍यात हळद लागवड मोठ्या प्रमाणात होते. 

गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी झालेला वळीव पाऊस हा हळद पिकास उपयुक्त ठरणार आहे. अगोदर लागवड केलेली हळद वाढीच्या मार्गावर आहे. सकाळी थंड वातावरण आणि दुपारी उष्णता यामुळे हळदीची वाढ चांगली होण्यास मदत होईल.
- डॉ. एम. डी. माळी, 
प्रभारी अधिकारी हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज.

इतर ताज्या घडामोडी
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...