सांगलीत स्वाभिमानीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सांगली ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी गुरुवारी (ता. १०) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
सांगली ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी गुरुवारी (ता. १०) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

सांगली  ः दूध दरवाढ, उसाची थकीत बिले आणि शेतकरी प्रश्‍नावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी (ता. १०) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. पोलिसांनी मोर्चा प्रवेशद्वारावर अडवल्याने बाचाबाची झाली. ‘आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत, आम्हाला आत सोडा, आम्ही नुकसान करणार नाही, मात्र हक्क मारू नका’, असा आक्रमक पावित्रा या वेळी आंदोलकांनी घेतला. तसेच प्रशासनाचा निषेध करत प्रवेशद्वारावर दूध ओतले.   

जिल्हाध्यक्ष महेश खराडे, संदीप राजोबा, महावीर पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून मोर्चाला सुरवात झाली. हातात ऊस, दुधाच्या किटल्या घेऊन मोर्चा निघाला. मोर्चा दुपारी साडेबाराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. पोलिसांनी तो अडवला. त्यावर आम्हाला आत सोडा, अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करायची आहे, अशी मागणी केली. पोलिसांनी त्याला नकार दिल्याने कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडले. त्यानंतर अडवणूक केल्याचा आरोप करत दूध ओतले. 

कोल्हापुरातही स्वाभिमानीचा एल्गार संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित किमान दीडपट हमीभाव देण्याच्या दृष्टीने विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोर्चाद्वारे केली. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले. यावेळी सावकार मादनाईक, जिल्हाध्यक्ष भगवान काटे, प्रा. जालिंदर पाटील, आण्णासाहेब चौगुले, शैलेश चौगुले, सागर संभुशेटे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com