agriculture news in Marathi, agrowon, Satana, Nampur Market Committee About 55 thousand new voters | Agrowon

सटाणा, नामपूर बाजार समितीत ५५ हजार नवमतदारांची भर
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 एप्रिल 2018

नाशिक  : सटाणा, नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी १० गुंठे जमीन असलेल्या शेतकऱ्यांची मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आदेश दिल्यानंतर १० गुंठे जमीन असलेल्या शेतकऱ्यांचा शोध घेऊन मंगळवारी (ता.३) अखेर दोन्ही बाजार समित्यांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार १ लाख १३ हजार २४ मतदारांची नोंद करण्यात आली असून, यात गेल्यावेळच्या तुलनेत दोन्ही बाजार समित्यांमध्ये सरासरी ५५ हजार नवमतदारांची भर पडली आहे. 

नाशिक  : सटाणा, नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी १० गुंठे जमीन असलेल्या शेतकऱ्यांची मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आदेश दिल्यानंतर १० गुंठे जमीन असलेल्या शेतकऱ्यांचा शोध घेऊन मंगळवारी (ता.३) अखेर दोन्ही बाजार समित्यांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार १ लाख १३ हजार २४ मतदारांची नोंद करण्यात आली असून, यात गेल्यावेळच्या तुलनेत दोन्ही बाजार समित्यांमध्ये सरासरी ५५ हजार नवमतदारांची भर पडली आहे. 

शुक्रवार (ता.१३) ते सोमवार (ता.२३) दरम्यान निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात येणार असल्याचे तहसीलदार गणेश राठोड यांनी सांगितले. राज्य सरकारने सहकार प्राधिकरणाच्या माध्यमातून बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी नवीन कायदा तयार केला असून, त्यानुसारच आगामी निवडणुका होणार आहेत. त्यानुसार प्रथमच नामपूर आणि सटाणा बाजार समितीसाठी निवडणुका होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला मतदानाचा अधिकार मिळाला असून निवडणूकही लढवता येणार आहे. या निवडणुकीसाठी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात वास्तव्यास आणि दहा गुंठ्यांहून अधिक जागा ताब्यात असलेल्यांना मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आला आहे.

दरम्यान, अनेक शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर सामायिक नावे असल्याने नेमका मतदार कोण, असा प्रश्न निर्माण झाल्याने व त्याबाबत सहकार आयुक्तांनी समाधानकारक मार्गदर्शन न केल्याने बाजार समित्यांची यादी आहे त्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आली. मात्र, या यादीवर हरकतींचा पाऊस पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सातबारा उताऱ्यावरील क्षेत्र व त्यावर असलेल्या नावाच्या आधारे दहा गुंठे जमीन ज्याच्या ताब्यात असेल त्याला मतदार म्हणून नोंद करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले. 

यासंदर्भात मुंबईत महाधिवक्‍त्यांकडे झालेल्या बैठकीत दहा गुंठे जमिनीचा निकष आणि तीन वर्षांत संबंधित मतदाराने बाजार समितीत शेतमाल विक्री करणे आदी विषयांवर एकमत झाले. त्यामुळे बाजार समितीचा हा नाशिक पॅटर्न संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे.

सटाणा बाजार समितीसाठी सिद्धार्थ भंडारे यांची निवडणूक निर्णय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली असून नामपूर बाजार समितीसाठी प्रांत ए. आर. विघ्ने यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

इतर बातम्या
साखरेच्या गोळ्याही करतील वेदना कमीवाढत्या स्थौल्यत्वासारख्या व त्या अनुषंगाने...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
कडधान्याची कमी दरात सर्रास खरेदीजळगाव ः जिल्ह्यातील जळगाव, चोपडा, पाचोरा,...
राज्यातील विकास सोसायट्यांना रिक्त...सांगली ः राज्यातील विकास सोसायट्यांची संख्या २१...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
पुण्यात एक ऑक्टोबरला ‘कृषी कल्चर’ ज्ञान...पुणे ः शेतीमधील बदलत्या तंत्रावर प्रकाश टाकणारा...
पावसाच्या तुरळक हजेरीने हलका दिलासापुणे: पावसाच्या दीर्घ खंडानंतर राज्यात दोन...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात पंचवीस...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्याच्या...
पोटॅशचा मोठा तुटवडाजळगाव  ः रेल्वेकडून खत पुरवठादार किंवा खत...
कीडनाशकांबाबतच्या याचिकेची सर्वोच्च...नवी दिल्ली ः मानवी आरोग्याला धोकादायक व भारतात...
राज्यात उद्यापासून पावसाचे संकेतपुणे: बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी...
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
जळगाव जिल्ह्यात तुरळक पाऊसजळगाव ः जिल्ह्यात सोमवारी (ता. १७) सकाळी ८ पर्यंत...
महाराष्ट्रात भावांतर योजना लागू...परभणी ः शेती एवढ्या समस्या कुठेच नाहीच. सर्व...