agriculture news in Marathi, agrowon, in Satara tur, gram purchase response is short | Agrowon

साताऱ्यात तूर, हरभरा खरेदीला अल्प प्रतिसाद
टीम अॅग्रोवन
रविवार, 1 एप्रिल 2018

सातारा : शासनाने फलटण, कोरेगाव येथे हमीभावाने तूर व हरभरा खरेदीसाठी केंद्र सुरू केले आहे. मात्र, या केंद्रास शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळाला आहे. तुरीची नाममात्र खरेदी झाली असून, हरभरा विक्रीची नोंदणीदेखील कमी प्रमाणात झाली आहे. 

सातारा : शासनाने फलटण, कोरेगाव येथे हमीभावाने तूर व हरभरा खरेदीसाठी केंद्र सुरू केले आहे. मात्र, या केंद्रास शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळाला आहे. तुरीची नाममात्र खरेदी झाली असून, हरभरा विक्रीची नोंदणीदेखील कमी प्रमाणात झाली आहे. 

जिल्ह्यात सोयाबीन पिकासाठी हमीभावाने खरेदी केंद्रे सुरू केली होती. सोयाबीन काढणी सुरू असताना व्यापाऱ्यांनी सोयाबीनचे दर पाडल्यामुळे ही हमीभाव केंद्रे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरली होती. या विभागाकडून पाच फेब्रुवारीस फलटण येथे तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र, आजपर्यंत या केंद्रावर अवघी २५२ क्विंटल तूर खरेदीसाठी आलेली आहे. सध्या नोंदणीसही शेतकऱ्यांकडून कमी प्रतिसाद मिळत आहे.

जिल्ह्यात तुरीचे क्षेत्र कमी असल्याने आवक कमी होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या केंद्रावर तुरीला क्विंटलला ५४५० रुपये दर दिला आहे. हरभऱ्यासाठी फलटण व कोरेगाव येथे खरेदी केंद्रे सुरू केली असून, नोंदणीची कामे सुरू झाली आहेत. मात्र, आज अखेर कोरेगाव केंद्रावर पाच तर फलटण केंद्रावर २० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात हरभऱ्यांच्या क्षेत्राच्या तुलनेत ही नोंदणी फारच अल्प आहे. हरभऱ्यांची प्रत्यक्ष खरेदी (ता.२) पासून केली जाणार आहे. खरेदी केंद्रावर हरभऱ्यास ४४०० रुपये क्विंटलप्रमाणे दर दिला जाणार आहे. 

इतर बातम्या
शासनाच्या तीन खरेदी केंद्रांद्वारे...जळगाव : उडीद, मूग, सोयाबीनचे बाजारातील दर...
कादवाच्या विस्तारीकरणावर भर देणार : शेटेचिंचखेड, जि. नाशिक : ‘‘शासनाने इथेनॉल...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
‘आरटीजीएस'द्वारे ग्रामपंचायत...सोलापूर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सहा...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...