दुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची जोड : गडकरी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर  : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल तर त्यास बदलत्या काळानुसार नवनवीन तंत्रज्ञानाची सांगड घालून शेती आणि दूध उत्पादनात वैज्ञानिक क्रांती आणण्याचा प्रयत्न केला, तर खऱ्या अर्थाने विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी संपन्न होऊन आत्महत्या थांबविण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ परिवहन, महामार्ग व जहाज बांधणी आणि जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केले.  

कविवर्य सुरेश भट सभागृह येथे राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डच्या वतीने आज एकदिवसीय विदर्भ व मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प वैज्ञानिक पशू संगोपन पद्धतीवर शेतकरी अभिमुख कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. उद्योग व खनिकर्म राज्यमंत्री प्रवीण पोटे, राष्ट्रीय डेरी विकास बोर्डचे अध्यक्ष दिलीप रथ, वाय. वाय. पाटील आदी उपस्थित होते.

मंत्री गडकरी पुढे म्हणाले, की विदर्भात आजही पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. त्यामुळे जमिनीचा कस कमी होऊन सेंद्रिय कार्बन कमी होत आहे. कंपोस्ट खत, गांढूळ खत, शेणखत अशा सेंद्रिय संसाधनांचा वापर केल्यास जमिनीची गुणवत्ता व उपजाऊपणा वाढविण्यास मदत होईल. त्याचबरोबर शेतीला पाण्याचीही आवश्यकता असते. पाण्यामध्ये असणारे क्षार व तसेच मानवी व पशूच्या शरीरास घातक रासायनिक द्रवे नष्ट करून पाण्याचा वापर केला, तर तो शेती व जनावरास फायदेशीर ठरतो. विशेषकरून दुधाळ जनावरांना जास्तीत-जास्त शुद्ध व स्वच्छ पाणी दिल्यास दुधाचे गुणवत्तापूर्वक उत्पादन वाढविण्यास मदत मिळते.

पाण्याबरोबर जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी उपलब्ध चाऱ्याची प्लॅस्टिकच्या साह्याने साठवण करणे, प्रोटीनयुक्त चाऱ्याकरिता मका, धान, जवस, सरकी, सोयाबीनची ढेप यांसारख्या शेतीतील उत्पादनाचा वापर करण्याचा सल्ला श्री. गडकरी यांनी शेतकऱ्यांना दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com