agriculture news in Marathi, agrowon, Search Committee for 'Vasantrao Naik Marathwada University Vice Chancellor | Agrowon

'वनामकृवि' कुलगुरू निवडीसाठी शोध समिती
पीटीआय
शुक्रवार, 16 मार्च 2018

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. बी. व्यंकटेश्वरलू यांचा कार्यकाळ येत्या ३१ मे रोजी संपत आहे. त्यामुळे नवीन कुलगुरूंची निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यपाल तथा कृषी विद्यापीठांचे कुलपती सी. विद्यासागर राव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर या अध्यक्ष असलेली त्रिस्तरीय शोध समिती स्थापन केली आहे.

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. बी. व्यंकटेश्वरलू यांचा कार्यकाळ येत्या ३१ मे रोजी संपत आहे. त्यामुळे नवीन कुलगुरूंची निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यपाल तथा कृषी विद्यापीठांचे कुलपती सी. विद्यासागर राव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर या अध्यक्ष असलेली त्रिस्तरीय शोध समिती स्थापन केली आहे.

कुलगुरू पदांसाठी इच्छुक उमेदवारांना नोडल अधिकारी डाॅ. पी. जी. पाटील यांच्याकडे १६ एप्रिलपर्यंत अर्ज पाठविता येणार आहेत. डाॅ. बी. व्यंकटेश्वरलू यांचा कार्यकाळ ३१ मे २०१८ रोजी संपत आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठांचे कुलपती सी. विद्यासागर राव यांनी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी कृषी शास्त्रज्ञ, विद्याव्यासंगी, विद्यापीठास शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षणाचे अत्युच्च केंद्र बनविण्यासाठी क्षमता असलेल्या तसेच मराठवाडा विभागातील कृषीविषयक संशोधनाच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीची शिफारस करण्याकरिता त्रिस्तरीय शोध समिती स्थापन केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर या शोध समितीच्या अध्यक्ष आहेत. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महानिदेशक डाॅ. डाॅ. त्रिलोचन महापात्र आणि कृषी व पणन विभागाचे अतिरिक्त सचिव विजय कुमार हे शोध समितीचे सदस्य आहेत. शोध समितीने केंद्रिय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक डाॅ. पी. जी. पाटील यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

कुलगुरू पदासांठी विहित केलेली अर्हता आणि अनुभव आदीची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्यक्ती तसेच अर्हताप्राप्त योग्य उमेदवारांचे नामनिर्देशन संस्थादेखील करू शकतात. इच्छुक उमेदवारांना १६ एप्रिलपर्यंत नोडल अधिकारी डाॅ. पी. जी. पाटील यांच्याकडे अर्ज पाठविता येणार आहेत. शोध समितीला आवश्यकता भासल्यास निवडयोग्य उमेदवारांना त्यांच्याबरोबर वैयक्तिक पातळीवर विचार विनिमय करण्यासाठी आमंत्रित करण्यात येईल.

इतर ताज्या घडामोडी
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...
अकोला जिल्ह्यात १७०० शेततळी पूर्णअकोला   ः शासनाच्या मागेल त्याला शेततळे...
अमरावती जिल्ह्यात रब्बीची २८ टक्के पेरणीअमरावती  ः खरीप हंगाम हातून गेला आहे. शेतकरी...
वन्यप्राणी संरक्षण कायदा रद्द करा ः...यवतमाळ  ः वन्यप्राण्यांचा जिव्हाळा...
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...