agriculture news in Marathi, agrowon, season Highest Temperatures in Bhira at 43.5 degrees | Agrowon

भिरा येथे हंगामातील उच्चांक; तापमान ४३.५ अंशांवर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 मार्च 2018

पुणे  : मार्च महिनाअखेरच्या टप्प्यात राज्यात उन्हाच्या झळा वाढल्याने सर्वत्र तापमानात वाढ झाली आहे. भिरा, सोलापूर, परभणी, अकोला, ब्रह्मपुरी, सांताक्रूज येथे पारा चाळीशी पार गेला आहे. भिरा येथे यंदाच्या हंगामाच्या राज्याच्या उच्चांकी ४३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत, उष्णतेची लाट आल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

पुणे  : मार्च महिनाअखेरच्या टप्प्यात राज्यात उन्हाच्या झळा वाढल्याने सर्वत्र तापमानात वाढ झाली आहे. भिरा, सोलापूर, परभणी, अकोला, ब्रह्मपुरी, सांताक्रूज येथे पारा चाळीशी पार गेला आहे. भिरा येथे यंदाच्या हंगामाच्या राज्याच्या उच्चांकी ४३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत, उष्णतेची लाट आल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

मुंबईतील कुलाबा येथे तापमानात सरासरीपेक्षा ७.६ अंश आणि सांताक्रूज येथे ८.२ अंशांनी वाढ झाल्याने उष्णतेची तीव्र लाट आली अाहे, तर भिरा येथे तापमानात सरासरीपेक्षा ५ अंशांनी वाढ झाली अाहे. सोमवारी (ता.२६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पारा ३८ ते ३९ अंशांवर पोचला आहे. राज्यात सर्वच भागात उन्हामुळे होरपळ वाढली असून, रात्रीचे तापमानाही सरासरीच्या वर जात आहेत.   

भिरा येथे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने उच्चांकी तापमान नोंदले जात असून, गेल्या वर्षी २९ तारखेला मार्च महिन्यातील आतापर्यंतच्या उच्चांकी ४६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तसेच २००९ आणि २०१६ च्या मार्चमध्ये पारा ४४ अंशांच्या वर सरकला होता, तर मुंबईतील सांताक्रूज येथे १९५६ मध्ये आतापर्यंतच्या उच्चांकी ४१.७ अंश सेल्सिअस तापमानांची नोंद झाली होती. तर २०११ मध्ये ४१.३ अंश सेल्सिअस, २०१३ मध्ये ४०.५ अंश, तर २०१५ मध्ये ४०.८ अंश सेन्सिअस तापमानाची नोंद झाली होती. 

रविवारी (ता. २६) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.०, नगर ३८.०, जळगाव ३९.२, कोल्हापूर ३७.३, महाबळेश्वर ३२.६, मालेगाव ३८.८, नाशिक ३७.३, सांगली ३८.४, सातारा ३७.५, सोलापूर ४०.२, मुंबई (सांताक्रूझ) ४१.०, अलिबाग ३४.७, रत्नागिरी ३५.९, डहाणू ३५.१, भिरा ४३.५, औरंगाबाद ३७.३, परभणी ४०.०, नांदेड ३९.५, अकोला ४०.५, अमरावती ३८.४, बुलडाणा ३७.२, ब्रह्मपुरी ४०.१, चंद्रपूर ३९.६, गोंदिया ३७.५, नागपूर ३९.०, वर्धा ३९.५, यवतमाळ ३८.५.
 

भिरा येथे २००८ पासून मार्च महिन्यात
नोंदले गेलेले उच्चांकी तापमान
(अंश सेल्सिअमध्ये)

 वर्ष  तापमान  (तारीख)
 २००८  ४१.०  (१७)
२००९  ४४.०  (६)
२०१० ४२.५  (२२)
२०११ ४२.५  (८)
२०१२ ४३.०  (२६)
२०१३ ४३.०  (२६)
२०१४ ४३.५  (३१)
२०१५ ४२.७  (२५)
२०१६ ४४.५  (२४)
२०१७ ४६.५  (२९)

इतर अॅग्रो विशेष
बांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’ण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे...
आधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास संपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग...
'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच...नवी दिल्ली  : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि...
नंदुरबार, धुळ्यात पपई काढणी बंदनंदुरबार  : पपईच्या दरावरून शेतकरी, व्यापारी...
...त्या दिवशी घरातलं कुणी जेवलं नायसुपे, जि. पुणे : एकच बैल होता. चितऱ्या...
किमान तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जगात...पुणे - द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर...
पीक फेरपालटीवर भर देत श्रीमंती केळीचे...कलाली (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथील योगेश व मनोज...
बळिराजाच्या हाती पुन्हा ‘लोखंड्या नांगर’गणूर, जि. नाशिक : शेतमालाला मिळणारे कवडीमोल भाव,...
दराच्या प्रतीक्षेतील कांद्याला फुटले...वडेल, जि. नाशिक :  आज ना उद्या दर वाढला, की...
पोटदुखीवर कडू कंद उपयुक्त कडू कंद ही वेलवर्गीय वनस्पती असून...
शिरूर ठरले मुगासाठी हक्काची बाजारपेठपुणे जिल्ह्यात शिरूर बाजार समिती ही मुगासाठी...
तहात अडकले ‘ब्रेक्झिट’युरोपीय महासंघातून बाहेर पडायचे अथवा नाही, या...
साखरेच्या कमी दराची शिक्षा ऊस...ऊस दराच्या बाबतीत कधी नव्हे एवढी आर्थिक कोंडी या...
बायोडायनॅमिक पद्धतीने कमी काळात कंपोस्ट...बायोडायनॅमिक तंत्रज्ञान हे मूलत: भारतीय वेदांवर...
पाने कुरतडणाऱ्या मुंग्यांकडूनही होते...उष्ण कटिबंधीय जंगले हे नायट्रस ऑक्साईड या हरितगृह...
पणन सुधारणेतील दुरुस्तीला शेतकरी...मुंबई ः महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व...
ताराराणी महोत्सवातून घडली उद्यमशीलता,...कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत राज विभागाच्या...
कृषी निविष्ठा अनुदानासाठी ‘ऑनलाइन'ची...पुणे : राज्यात कृषी विभागाच्या योजनांमधील विविध...
'आयमा'ची होतेय मुस्कटदाबी; मोठ्या...पुणे : ट्रॅक्टर, हार्वेस्टर, रोटाव्हेटरसारख्या...