agriculture news in Marathi, agrowon, session Winter also in Nagpur ? | Agrowon

पावसाळीपाठोपाठ हिवाळी अधिवेशनही नागपुरात?
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 10 मे 2018

नागपूर (प्रतिनिधी) : पावसाळी अधिवेशन नागपुरात होणार असल्याचे स्पष्ट झाले असताना हिवाळी अधिवेशनही येथेच होण्याची चिन्हे आहेत. 

नागपूर (प्रतिनिधी) : पावसाळी अधिवेशन नागपुरात होणार असल्याचे स्पष्ट झाले असताना हिवाळी अधिवेशनही येथेच होण्याची चिन्हे आहेत. 

विदर्भ महाराष्ट्रात सामील करताना झालेल्या कराराप्रमाणे एक अधिवेशन म्हणजे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेण्यात येते. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर जवळपास प्रत्येक हिवाळी अधिवेशन नागपुरात झाले आहे. विदर्भावर होत असलेल्या अन्यायामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेण्याची मागणी अनेकदा विदर्भातील नेत्यांकडून विशेष करून विरोधात असताना भाजपच्या नेत्यांनी केली आहे. पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचे हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकारकडून जाहीर करण्यात आले होते. सरकारने जवळपास पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचे निश्‍चित केले असून बांधकाम विभागाला तशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

4 जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. पावसाळीपाठोपाठ हिवाळी अधिवेशनही नागपुरात होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. मुंबईतील आमदारांचे निवास असलेली "मनोरा'' इमारत धोकादायक दर्शविण्यात आली असून ती तोडण्यात येणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनोरा पाडण्यात येणार असून त्या जागी नवीन भव्य इमारत बांधण्यात येणार आहे. लवकरत इमारत पाडण्यात येणार असल्याची माहिती सांगण्यात येते. 

मुंबईतील मनोरा पाडल्यास आमदारांच्या मुक्कामाचा प्रश्‍न निर्माण होईल. त्यामुळे आमदारांकडून राहण्यासाठी एक लाख रुपयाची मागणी होत आहे. विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार धरता दोन कोटींच्या वर महिन्याला खर्च येईल. शासनाची आर्थिक परिस्थिती आधीच बिकट आहे. त्यामुळे पर्याय म्हणून हिवाळी अधिवेशनही नागपुरात घेण्याचा विचार सरकार पातळीवर सुरू असल्याचे समजते. 

सत्ताधारी भाजप याच्या माध्यमातून एकाच दगडात दोन पक्षी मारण्याच्या प्रयत्नात असल्याचेही जाणकार सांगतात. यामुळे विदर्भाच्या विकासाबाबत सरकार गंभीर असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात येते.

इतर ताज्या घडामोडी
वीरगळचा इतिहास नव्या पिढीसमोरकोल्हापूर - या दगडी शिळा अनेक गावांत पाराखाली,...
सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक...मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍...
पाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...