शिवसेना, काँग्रेस पक्ष रिकामे करणार : नारायण राणे

नारायण राणे
नारायण राणे

कुडाळ, जि. सिंधुदुर्ग  : ''तुम्ही काय माझी हकालपट्टी करता, मीच काँग्रेस सोडतो, असे सांगत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाचा आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे गुरुवारी (ता. २१) घोषित केले.

तसेच आगामी काळात शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही रिकामे करणार असल्याचे राणे यांनी सांगितले. अलीकडच्या काळात नारायण राणे आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या भेटींमुळे राजकीय चर्चेला उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा रंगली होती; मात्र काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर दसऱ्यापूर्वी पुढील दिशा ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्रिपदाबाबत चाचपणी करण्यासाठी त्या वेळी प्रणव मुखर्जी, अँटनी आणि दिग्विजयसिंह हे निरीक्षक म्हणून आले होते, तेव्हा ४८ आमदारांनी मला पसंती दिली, तर ३२ आमदारांनी अशोक चव्हाण यांना पसंती दिली होती. तरीही मला संधी देण्यात आली नाही. पक्षात आल्यानंतर सहा महिन्यांत मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन काँग्रेसने मला दिले होते; मात्र ते पाळले नाही, असे त्यांनी सांगितले. 

राज ठाकरे स्वतःच फुटबॉल राणे यांचा फुटबॉल झालाय, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावर राणे म्हणाले, राज हे स्वतःच फुटबॉल आहेत. माझ्या घरात दोन आमदार आहेत. राज ठाकरे यांच्या पक्षात एकच आमदार आहे. त्यांच्या टीकेला उत्तर द्यावे, असे मला वाटत नाही, अशा शब्दांत नारायण राणे यांनी राज यांची खिल्ली उडवली. तसेच आपण शिवसेनेत परत जाणार नसल्याचे स्पष्ट करताना उद्धव ठाकरे दररोज सरकारमधून बाहेर पडण्याचे इशारे देत असून, काही करत नसल्याचा टोलाही राणे यांनी लगावला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com