agriculture news in Marathi, agrowon, Shivsena behave dosen't accepted says Fadnavis | Agrowon

शिवसेनेनं असं वागायला नको होतं : फडणवीस
सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 9 मे 2018

पुणे : पालघर लोकसभा निवडणुकीत माजी खासदार (कै.) चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेत प्रवेश देणे हे दुर्देेेेेेेवी आहे. शिवसेनेनं असं वागायला नको होतं, अशी खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

या निवडणुकीत भाजपचा उमेदवार शिवसेनेनं पळविल्याबद्दल फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. वनगा यांच्या मुलालाच भाजप उमेदवारी देणार होते. हे शिवसेनेला माहीत असूनही त्याला मातोश्रीवर नेण्यात आले. त्यांच्याशी संपर्क होणार नाही, अशा पद्धतीने ठेवण्यात आले. मला त्याविषयी काही बोलायचे नाही. पण, शिवसेनेची ती पद्धत आहे.

पुणे : पालघर लोकसभा निवडणुकीत माजी खासदार (कै.) चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेत प्रवेश देणे हे दुर्देेेेेेेवी आहे. शिवसेनेनं असं वागायला नको होतं, अशी खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

या निवडणुकीत भाजपचा उमेदवार शिवसेनेनं पळविल्याबद्दल फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. वनगा यांच्या मुलालाच भाजप उमेदवारी देणार होते. हे शिवसेनेला माहीत असूनही त्याला मातोश्रीवर नेण्यात आले. त्यांच्याशी संपर्क होणार नाही, अशा पद्धतीने ठेवण्यात आले. मला त्याविषयी काही बोलायचे नाही. पण, शिवसेनेची ती पद्धत आहे.

ही जागा भाजपची आहे. भाजपने ती जिंकली आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजपचे सर्व कार्यकर्ते जिंकण्याच्या हेतूने लढणार आहेत. माजी मंत्री आणि काॅंग्रेसचे नेते राजेंद्र गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गावित हे भाजपकडून निवडणूक लढविणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नाशिकच्या शिवसेना उमेदवाराचे
भवितव्य फडणवीसांच्या मर्जीवर?

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत दोघांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे नरेंद्र दराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड. शिवाजी सहाने यांसह भाजपच्या सदस्यांनी सुचक म्हणून सह्या केलेले परवेझ कोकणी हे तीन उमेदवार राहिले. 

भाजपशी सख्य असलेले कोकणी शिवसेनेला अडचणीचे, की राष्ट्रवादी काँग्रेसच्या पथ्यावर याची चर्चा आहे. मात्र भाजपने अधिकृत उमेदवार दिलेला नसल्याने त्यांच्या १६७ मतदारांवर निकाल ठरेल. त्यासाठी पुन्हा वरिष्ठ नेते चर्चा करून नाशिकची जागा व पक्षाची प्रतिष्ठा दोन्ही राखणार का, याला महत्त्व आले आहे.

कोकणी यांचा अर्ज अद्याप राहिला आहे. त्यांचे सुचक पुरुषोत्तम लोहगावकर यांनी भाजपच्या वरिष्ठांशी संपर्क साधला जाईल, असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी सहाणे यांनी शिवसेनेचे मतदार पोखरण्यास सुरवात केली आहे. अशा स्थितीत भाजपकडे निर्णायक मतदार असून, शिवसेना उमेदवाराचे भवितव्य मुख्यमंत्र्यांच्या हाती आहे.

इतर ताज्या घडामोडी
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...
नाशिकला स्वाईन फ्ल्यूचा कहर, 24...नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात स्वाईन फ्ल्युने...
आज मराठवाडा मुक्तीदिन ! संग्रामाला झाली...15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला...
पेट्रोल दराची शंभरीकडे वाटचाल मुंबई : महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या...
वऱ्हाडात पिकांना वाढती उष्णता सोसवेनाअकोला  ः गेल्या अाठ दिवसांपासून कमाल...
शेतीमाल प्रक्रियेला चालना देण्यासाठी...भेंडा, जि. नगर  : बीव्हीजी ग्रुपने स्वच्छता...
साताऱ्यात ११७७ शेततळ्यांची कामे पूर्णसातारा  ः मागेल त्याला शेततळे योजनेतून...
इंधन दरवाढ शेतकऱ्यांच्या मुळावरऔरंगाबाद : इंधन दरवाढीचा थेट आघात आता शेतीवरही...
शेतमाल वाहतुकीच्या दरात वाढजळगाव : इंधनाचे दर दिवसागणिक वाढत आहेत. डिझेलचे...