agriculture news in Marathi, agrowon, Shivsena examined anti-BJP atmosphere | Agrowon

भाजपविरोधी वातावरणाची शिवसेनेकडून चाचपणी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 मे 2018

नागपूर  ः शेतकऱ्यांचा भाजपविरोधी सूर विदर्भात पक्षाला पोषक ठरेल, असे लक्षात आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विदर्भाकडे मोर्चा वळविला आहे. शुक्रवारी (ता. ११) नागपुरातील रविभवनमध्ये श्री. ठाकरे दहा लोकसभा मतदार संघांचा आढावा घेणार आहेत. या माध्यमातून स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेने भाजपसमोर आव्हान उभे करण्याची तयारी चालविली आहे. 

नागपूर  ः शेतकऱ्यांचा भाजपविरोधी सूर विदर्भात पक्षाला पोषक ठरेल, असे लक्षात आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विदर्भाकडे मोर्चा वळविला आहे. शुक्रवारी (ता. ११) नागपुरातील रविभवनमध्ये श्री. ठाकरे दहा लोकसभा मतदार संघांचा आढावा घेणार आहेत. या माध्यमातून स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेने भाजपसमोर आव्हान उभे करण्याची तयारी चालविली आहे. 

विदर्भातील मतदारांचा विकासापेक्षा जातीय राजकारणावर भर राहिला आहे. त्यामुळेच विदर्भात गेल्या अनेक वर्षात भौतिक तसेच सिंचन विकासाचा मोठा अनुशेष निर्माण झाला. येथील राजकीय नेतृत्वांनी देखील मतदारांच्या याच मानसिकतेचा फायदा घेत स्वतःकरीता शैक्षणिक संस्थांचे साम्राज्य निर्माण करीत आपल्या कुटुंबाच्या भरणपोषणाची सोय केली. लग्न, अंत्यसंस्कारांना हजेरी लावण्यापुरतेच या भागातील नेतृत्व कार्यशील राहिले. 

विदर्भातील नेते आणि मतदारांच्या याच मानसिकतेचा फायदा पश्‍चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी घेत विकास निधीची पळवापळवी केली. भाजपसोबतच शिवसेनेच्या उमेदवारांनादेखील या भागात मोठी पसंती होती. त्यानंतरच्या काळात मात्र शिवसेना विदर्भात पिछाडल्याचे चित्र आहे. 

हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपने विदर्भात मुसंडी मारली. विदर्भातील हा मतदार पुन्हा आपल्याकडे वळविण्यासाठी शिवसेना पुन्हा क्रियाशील होणार आहे. त्याकरीता ११ मे रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला जाणार आहे. 

त्यासोबतच विशेष चर्चासत्राचे आयोजनही करण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख यानिमित्ताने आपल्या पदाधिकाऱ्यांना कोणता कानमंत्र देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आढावा बैठकीला पक्षाचे संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, सहसंपर्क प्रमुख, खासदार, आमदार व तालुकास्तरीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
कळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...
नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...
कपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...
सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...
नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...
अकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...
गोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया   ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...
साताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा  : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...
नगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर  ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...
वाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम  ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...
खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा  : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...