पुण्यात महागाईविरोधात शिवसेनेचा लाटणे मोर्चा

पुणे ः शिवसेनेच्या वतीने महागाईविराेधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी (ता.२६) लाटणे माेर्चा काढण्यात आला. या वेळी महिलांनी सरकारच्या विराेधात घाेषणा देऊन निदर्शने केली.
पुणे ः शिवसेनेच्या वतीने महागाईविराेधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी (ता.२६) लाटणे माेर्चा काढण्यात आला. या वेळी महिलांनी सरकारच्या विराेधात घाेषणा देऊन निदर्शने केली.

पुणे : महागाईच्या विराेधात शहर शिवसेनेच्या वतीने मंगळवारी (ता. २६) जिल्हाधिकारी कार्यालयावर लाटणे माेर्चा काढण्यात आला हाेता. मोर्चात शिवसैनिकांसह महिला माेठ्यासंख्येने उपस्थित हाेत्या. या वेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विराेधात घाेषणा देत निदर्शने करण्यात आली.

शिवसेनेचे संपर्कप्रमुख उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली माेर्चा काढण्यात आला हाेता. आंबेडकर पुतळ्यापासून सुरू झालेल्या माेर्चात माेठ्या संख्यने महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या हाेत्या. या वेळी उपनेत्या निलम गोऱ्हे यांच्यासह तृष्णा विश्‍वासराव, शहरप्रमुख विनायक निम्हण, माजी आमदार महादेव बाबर, चंद्रकांत माेकाटे, युवा सेनेचे शहराध्यक्ष किरण साळी, ज्येष्ठ शिवसैनिकांसह नगरसेवक, शाखाप्रमुख या वेळी उपस्थित हाेते.

माेर्चामध्ये महागाईची बुलटे ट्रेनसह महागाईच्या भस्मासुराचा वेष परिधान केलेला कार्यकर्ता सहभागी झाला हाेता. माेर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com