राज्यातील शेतीमधील समस्यांची यादी केली तर ती खूप मोठी होईल.
ताज्या घडामोडी
मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे हैराण झालेल्या शिवसेनेच्या "गनिमी कावा''ने भाजपच घायाळ झाल्याचे चित्र आहे. "मातोश्री''वर टाचणी पडली तरी ती भाजपच्या नेतृत्वाला कळते, असा आत्मविश्वास बाळगणाऱ्या भाजपच्या धुरिणांना या वेळी मात्र मातोश्रीवरील रणनीतीचा अंदाज येत नसल्याचे आश्चर्य वाटत आहे.

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे २०१४ पासून सतत राजकीय डावपेचात कोंडी करून घेत असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू होती. मात्र, मनसेचे सहा नगरसेवक फोडण्याची किमया साधताना ना मनसेला त्याची कानकून लागली ना भाजपच्या गुप्तहेरांना सुगावा लागला. मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर जात असताना व त्यांचे विमान हवेत असतानाच इकडे मातोश्रीवर मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्या वेळी भाजप नेत्यांची उडालेली त्रेधातिरपीट सर्वश्रुत आहे.
त्यानंतर आता पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत दिवंगत भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या चिरंजीवाचा शिवसेना प्रवेश व त्यांनाच उमेदवारी देत उद्धव ठाकरे यांनी भाजपला चांगलेच डिवचले आहे.
विधान परिषदेच्या सहा जागांवर जिथे संख्याबळ आहे, तिथे स्वबळावर उमेदवार देऊन ठाकरे यांनी युतीचा गजर लावलेल्या भाजपला कोंडीत पकडले. त्यातच पलुस विधानसभेत थेट कॉँग्रेसला पाठिंबा देत भाजपच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार ठाकरे यांनी केल्याचे मानले जाते.
केंद्रात मोदी सरकारला २०१४ सारखे एकहाती यश मिळवण्यात अडचणीचा अंदाच व्यक्त होत असताना, मित्रपक्ष शिवसेनेने सुरू केलेल्या कुरघोडीच्या खेळीने आक्रमक भाजपला सबुरीचे धोरण घ्यायला भाग पाडल्याचे चित्र आहे. २०१९ ला लोकसभेला युती केल्यास पुन्हा विधानसभेला भाजप शिवसेनेला एकाकी पाडू शकते, असा विश्वास असल्यानेच उद्धव ठाकरे यांनी आता निर्णायकपणे "स्वबळाचा'' निर्धार केल्याचे हे संकेत असल्याचे शिवसेना नेते सांगत आहेत.
- 1 of 349
- ››