agriculture news in Marathi, agrowon, Shortage of farming worker | Agrowon

शेतीकामासाठी सालगड्यांची कमतरता
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 मार्च 2018

अमरावती  ः गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन सालगडी ठेवण्याची परंपरा आहे. परंतु या वर्षी मात्र सालगड्याच्या वार्षिक मेहनतान्यात झालेली वाढ आणि त्यांच्या उपलब्धतेचा अभाव या कारणांमुळे अनेक ठिकाणी सालगडी ठेवण्याच्या परंपरेला ब्रेक लागल्याची चित्र आहे. 

अमरावती  ः गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन सालगडी ठेवण्याची परंपरा आहे. परंतु या वर्षी मात्र सालगड्याच्या वार्षिक मेहनतान्यात झालेली वाढ आणि त्यांच्या उपलब्धतेचा अभाव या कारणांमुळे अनेक ठिकाणी सालगडी ठेवण्याच्या परंपरेला ब्रेक लागल्याची चित्र आहे. 

ग्रामीण भागात खरीप व रबी हंगामात हंगामी मजुरांची गरज भासते. त्यासोबतच २४ तास कुटुंबासह शेतावर राहत शेतीमालकाच्या अनुपस्थितीत त्यांची कामे सांभाळणाऱ्या सालगड्यांची नेमणूक केली जाते. बहुतांश ठिकाणी सालगडी हे शेतावर राहूनच जबाबदाऱ्या सांभाळतात. त्याच गावातील सालगडी असल्यास ते घरूनदेखील कामांची जबाबदारी पार पाडतात. गुढीपाडव्यापासून सालगड्यांचे नवे वर्ष सुरू होते. 

सालगडी ठरवून पाडव्याला त्याचे नवीन कपडे देऊन स्वागत होते. या वर्षी मात्र शहरातील कामावर मिळणाऱ्या मजुरीच्या तुलनेत शेतीकामात मजुरी कमी मिळते; म्हणून अनेकजण सालगडी म्हणून राबण्यास तयार होत नाहीत. त्यामुळेदेखील यंदा सालगड्यांची कमतरता असल्याचे चित्र आहे.

त्यासोबतच शेतीकामात आता बैलजोडीपेक्षा यांत्रिक पर्यायाचा विचार शेतकरी करू लागले आहेत. 
परिणामी कमी मजुरांमध्ये अधिक काम होणे सुलभ झाले. परंतु काही शेतकरी मात्र सालगड्यांचा विचार करत परंपरा जोपासतात. त्यानुसार या वर्षी सालगड्यांचे पगार ७५ हजार रुपयांपासून १ लाख २५ हजार रुपयांपर्यंत पोचले आहेत. शेतीतील वार्षिक उत्पन्नाच्या तुलनेत सालगड्यांचे वेतन वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...
आंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या...मिजमाशी प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर,...
फळपिके सल्लाकोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानाचा कमी जास्त...
योग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...
धनगर समाजाचा उद्या औरंगाबादमध्ये धडक...औरंगाबाद : धनगर समाजाला एस.टी.(अनुसूचित जमाती)...
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव...मनमाड, जि. नाशिक : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक,...
केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री अनंत...बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण...
ऊस दरप्रश्नी सोलापुरात ‘स्वाभिमानी’...सोलापूर  ः गेल्या गळीत हंगामातील उसाची...
दिवाळी संपूनही शासकीय कापूस खरेदीला...अकोला : या हंगामात लागवड केलेल्या बागायती तसेच...
ऊस दरासाठी सातारा जिल्ह्यात रास्ता रोकोसातारा  ः जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने...
थकीत एफआरपीच्या मागणीसाठी शिरोळ येथे...कोल्हापूर  : साखर कारखान्यांनी गेल्या...
ऊस दरप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे त्रिधारा...परभणी : मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी यंदाचे ऊस...
सांगलीत एकरकमी ‘एफआरपी’कडेगाव, जि सांगली  ः कोल्हापूर जिल्ह्याने...