ॲग्रोवन शुभलाभ बक्षीस योजनेस धडाक्यात प्रारंभ

ॲग्रोवन शुभलाभ बक्षीस योजनेस प्रारंभ
ॲग्रोवन शुभलाभ बक्षीस योजनेस प्रारंभ

पुणे : लाखोंच्या हिऱ्यांसह पेरणी यंत्र, ठिबक संच अशा शेती उपयोगी शेकडो बक्षिसांची रेलचेल असणाऱ्या खास वाचकांसाठीच्या ॲग्रोवन शुभलाभ योजनेचा रविवारी (ता. ३) दणक्यात प्रारंभ झाला. वाचकांना एकूण ३२ लाखांची १ हजार ४२४ बक्षिसे जिंकण्याची संधी या योजनेतून उपलब्ध झाली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी योजनेचे स्वागत आणि प्रचार रथास प्रारंभ करण्यात आला. याेजनेत राज्याच्या विविध भागांतून वाचकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे.  ॲग्रोवन शुभलाभ बक्षीस योजनेत अनुक्रमे तीन, दाेन आणि एक लाख रुपयांचे हिऱ्याचे दागिने असणार आहेत. या बक्षिसाचे प्रायाेजक पुण्यातील पु. ना. गाडगीळ आणि सन्स अाहेत. इतर आकर्षक अशा बक्षिसांमध्ये बियाणे व खत यंत्रे, ठिबक सिंचन संच, स्प्रिंकलर संच, रासायनिक खते, मिरॅकल उत्पादने, गिप्ट कूपन आणि बॅटऱ्यांचा समावेश आहे. या विविध बक्षिसांसाठी स्मार्टकेम टेक्नाॅलॉजीज लिमिटेड, पारस ठिबक तुषार संच, राेहित कृषी इंडस्ट्रीज, ॲग्राेस्टार आणि ॲण्डस्लाईट हे प्रायाेजक आहेत. पाच हजार भाग्यवान वाचकांना २०० रुपयाचे ॲग्राेस्टार डिस्काउंट कूपन मिळणार आहे.    या याेजनेस रविवारी (ता. ३) राज्याच्या विविध भागांत प्रारंभ झाला. या याेजनेसाठी तयार करण्यात आलेल्या रथाचे उद्‍घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मंगळवेढा (जि. सोलापूर) येथे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख आणि राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या हस्ते प्रचार रथास झेंडा दाखविण्यात आला.  याेजनेचा कालावधी ३ सप्टेंबर ते १४ डिसेंबर असणार आहे. पुढील १०० दिवस नियमित ॲग्राेवन वाचन करून पान १६ वरील किमान ७५ कूपन एकत्रित प्रवेशिकेवर चिकटवणे बंधनकारक अाहे. प्रवेशिका पाठविण्याची अंतिम मुदत २७ डिसेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे. ॲग्राेवन शुभलाभ बक्षीस याेजना असा स्पष्ट उल्लेख असलेल्या प्रवेशिका ‘ॲग्रोवन, द्वारा सकाळ पेपर्स लिमिटेड, ५९५, बुधवार पेठ, पुणे - ४११००२’ या पत्त्यावर पाठवाव्यात, प्रवेशिका ॲग्रोवनमध्ये १५ ते २० सप्टेंबरदरम्यान प्रसिद्ध करण्यात येणार अाहेत.

दरम्यान ॲग्राेवन शुभलाभ बक्षीस याेजनेच्या प्रचार रथाचा प्रारंभ साेमवारी (ता. ४) पुण्यातील सकाळ कार्यालयाच्या आवारात स्मार्टकेमचे उपसरव्यवस्थापक संजय बिराजदार आणि सतीश नरतम, स्मार्टकेमचे सहायक उपाध्यक्ष विजयराव पाटील, ॲण्डस्लाइटचे मुख्य वितरक (महाराष्ट्र) प्रकाश शिंदे आणि ॲग्राेस्टारच्या विपणन विभागाचे सहायक व्यवस्थापक दुर्गाप्रसाद उपाध्याय यांच्या हस्ते करण्यात आला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com