agriculture news in Marathi, agrowon, Silk purchased in jalna from 21st April | Agrowon

जालन्यात २१ एप्रिलपासून रेशीम कोष खरेदी
संतोष मुंढे
गुरुवार, 12 एप्रिल 2018

औरंगाबाद : रामनगरम किंवा त्यापेक्षाही चांगल्या सुविधांसह जालन्यात रेशीम कोषाची बाजारपेठ निर्माण करण्याला मूर्त रूप मिळण्यास सुरवात झाली आहे. येत्या २१ एप्रिलला जालना बाजार समितीच्या कक्षेत प्रायोगिक तत्त्वावर रेशीम कोष खरेदीची अधिकृत खरेदी सुरू करून करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. 

औरंगाबाद : रामनगरम किंवा त्यापेक्षाही चांगल्या सुविधांसह जालन्यात रेशीम कोषाची बाजारपेठ निर्माण करण्याला मूर्त रूप मिळण्यास सुरवात झाली आहे. येत्या २१ एप्रिलला जालना बाजार समितीच्या कक्षेत प्रायोगिक तत्त्वावर रेशीम कोष खरेदीची अधिकृत खरेदी सुरू करून करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. 

राज्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला. त्यांनी रेशीम बाजारपेठेसाठी निर्धारित जागेवर बाजारपेठ निर्मितीला साधारणत: वर्षभराचा कालावधी लागेल, हे ओळखून जालना बाजार समितीच्या आवारातच रेशीम कोष खरेदीसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. या प्रायोगिक तत्त्वावर सुरू केल्या जाणाऱ्या रेशीम कोष खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांना आवश्‍यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.  

कोष ठेवण्यासाठी जागा व प्रसंगी राहण्याची सोय या ठिकाणी असणार आहे. रेशीम कोष उत्पादकनांही आवश्‍यक सुविधा पुरविल्या जाणार आहेत. इलेक्‍ट्रॉनिक काट्यावर वजन, कोषांचे ग्रेडशन, चोवीस तासांत विकलेल्या कोषाचे पैसे मिळण्याची सोय या खरेदी केंद्रावर उभी केली जाणार आहे.

रामनगरमसह इतरही रेशीम मार्केटमध्ये असलेल्या सुविधा व त्या तुलनेत आवश्‍यक असणाऱ्या सुविधा याचाही अभ्यास करून जालन्यातील  रेशीम खरेदी उत्पादक, व्यापारी यांच्या दृष्टीने अधिक सोयीची कशी असेल, याचे नियोजन करण्याच्या कामाला मराठवाड्याचे सहायक संचालक रेशीम दिलीप हाके व त्यांचे सहकारी लागले आहेत. 

जालना जिल्ह्यातच सुरू होणाऱ्या ॲटोमॅटिक रेलिंग युनिटचे कामही अंतिम टप्प्यात आहे. प्रतिदिवस जवळपास एक हजार किलोग्रॅम कोषाची गरज असलेले हे रेलिंग युनिटही लवकरच सुरू होण्याची आशा आहे. रेशीम विभागाच्या वतीने रेशीम कोष खरेदीदारांना खरेदीचा शुभारंभ केल्या जाणाऱ्या पहिल्या दिवसापासून सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जात आहे. 

आता महाराष्ट्रातील रेशीम कोष उत्पादकांना रामनगरमला जाण्याची गरज पडणार नाही. चांगले खरेदीदार यामध्ये सहभागी करून उत्पादकांना रामनगरमप्रमाणे किंवा जास्तीत जास्त दर कसे मिळतील यासाठी प्रयत्न राहणार आहे. या बाजारपेठेमुळे शेतकऱ्यांचा खर्च, वेळ वाचून रामनगरममध्ये प्रसंगी होणारी लूट थांबेल.
- अर्जुन खोतकर, वस्त्रोद्योग राज्यमंत्री. 

जालना बाजार समितीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर रेशीम कोष खरेदी सुरू केली जात आहे. व्यापाऱ्यांना सुविधा देण्यासोबतच शेतकऱ्यांना चांगले दर मिळवून देत पारदर्शक व्यवहारातूर कोष खरेदीचे काम केले जाईल. 
- दिलीप हाके, 
सहायक संचालक रेशीम, औरंगाबाद विभाग. 

इतर बातम्या
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
`आंब्याचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग :  कोकणातील आंबा...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...
रणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम...
काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी बारा...मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
आचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारीमुंबई : नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी...