agriculture news in Marathi, agrowon, Sinnar Bazar Samiti onion issue | Agrowon

सिन्नर बाजार समितीच्या फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना दणका
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 मे 2018

सिन्नर, जि. नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारातून नाशिक ॲग्रो इंडस्ट्रिज लि.ने कांदा खरेदीपोटी शेतकऱ्यांना दिलेले धनादेश न वटल्याने बाजार समितीने शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून संबंधित फर्मच्या दोघा कांदा व्यापाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या दोघा व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडे १६ लाख ३७ हजार रुपये जमा केले आहेत. त्यामुळे फसवणूक झालेल्या ६९ शेतकऱ्यांना बुधवारपासून (ता. १६) कांद्याची रक्कम मिळणार आहे.

सिन्नर, जि. नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारातून नाशिक ॲग्रो इंडस्ट्रिज लि.ने कांदा खरेदीपोटी शेतकऱ्यांना दिलेले धनादेश न वटल्याने बाजार समितीने शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून संबंधित फर्मच्या दोघा कांदा व्यापाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या दोघा व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडे १६ लाख ३७ हजार रुपये जमा केले आहेत. त्यामुळे फसवणूक झालेल्या ६९ शेतकऱ्यांना बुधवारपासून (ता. १६) कांद्याची रक्कम मिळणार आहे.

पोलिसांनी संशयित राजू पठारे व राकेश आढाव यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या दोघा संशयितांना अटकही केली होती. फेब्रुवारी ते मार्च २०१८ या कालावधीत ६३ शेतकऱ्यांना देण्यात आलेले १४ लाख ६३ हजार ७४३ रुपयांचे धनादेश न वटता परत आल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे तक्रार केली होती.

कांदा व्यापारी राजू सदाशिव पठारे (रा. वाशी, नवी मुंबई) व राकेश भास्कर आढाव (रा. वावीवेस, सिन्नर) या दोघांची नाशिक ॲग्रो नावाने नोंदणीकृत फर्म २०१३ पासून बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांकडून कांदा खरेदीचा व्यवहार करते. गेल्या चार महिन्यांत तालुक्‍यातील ६९ शेतकऱ्यांना नाशिक ॲग्रोने कांदा खरेदीपोटी धनादेश दिले होते. मात्र, हे धनादेश बॅंकेतून न वटता परत आल्याने व व्यापारी उडवाउडवीची उत्तरे देऊन झुलवत ठेवत असल्याने शेतकऱ्यांनी फसवणूक झाल्याची तक्रार केली होती.

बाजार समितीकडून शेतकऱ्यांचे कांदा खरेदीचे पैसे तत्काळ अदा करण्याची सूचना करण्यात आली होती. सभापती विनायक तांबे यांनी संचालक मंडळाची बैठक घेतली. त्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सचिव विखे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची कांदा खरेदीची रक्कम १६ लाख ३७ हजार रुपये १४ मे रोजी बाजार समितीकडे जमा केली आहे.

त्यामुळे बाजार समिती आरटीजीएसद्वारा परस्पर शेतकऱ्यांचे पैसे खात्यात वर्ग करणार आहे. ज्या शेतकऱ्यांची नाशिक ॲग्रो इंडस्ट्रिज यांच्याकडून कांदा विक्रीची रक्कम मिळणे बाकी आहे त्यांनी ताबडतोब बाजार समितीच्या सिन्नर कार्यालयात मूळ धनादेशाची प्रत, बॅंकेच्या पासबुकाची झेरॉक्‍स, हिशेबपट्टी, पावत्या सादर कराव्यात, असे आवाहन बाजार समिती संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...