agriculture news in marathi, AGROWON sirpanch mahaparishad, Alandi, Pune | Agrowon

कृषी प्रदर्शनात जाणून घेतला सरपंचांनी माहितीचा खजिना
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

आळंदी, जि. पुणे  ः गावातील सरपंचाना गावाचा व शेतीचा विकास करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध योजनांची माहिती होण्याच्या उद्देशाने आळंदी येथे (ता.१५) आयोजित केलेल्या सरपंच महापरिषदेच्या निमित्ताने कृषी प्रदर्शनाचे खास आयोजन केले होते. या प्रदर्शनात स्मार्टकेम टेक्नालॉजी लिमिटेड, विक्रम चहा, शासनाचा कृषी विभाग, पशुसंवर्धन, नियोजन विभागाची रोजगार हमी योजना, मुख्यमंत्री कार्यालयाचा महालाभार्थी विभाग, एसआयएलसी, फोर्स मोटर्स आणि सकाळ प्रकाशनच्या स्टॉलचा समावेश होता.

आळंदी, जि. पुणे  ः गावातील सरपंचाना गावाचा व शेतीचा विकास करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध योजनांची माहिती होण्याच्या उद्देशाने आळंदी येथे (ता.१५) आयोजित केलेल्या सरपंच महापरिषदेच्या निमित्ताने कृषी प्रदर्शनाचे खास आयोजन केले होते. या प्रदर्शनात स्मार्टकेम टेक्नालॉजी लिमिटेड, विक्रम चहा, शासनाचा कृषी विभाग, पशुसंवर्धन, नियोजन विभागाची रोजगार हमी योजना, मुख्यमंत्री कार्यालयाचा महालाभार्थी विभाग, एसआयएलसी, फोर्स मोटर्स आणि सकाळ प्रकाशनच्या स्टॉलचा समावेश होता.

सरपंचांना ग्रामविकास व शेतीच्या खास योजना गावात राबवता याव्यात यासाठी सकाळ माध्यम समूहाअंतर्गत विविध विषयांच्या स्टाॅलवर आवर्जून भेट देऊन पुस्तकाची चौकशी करत होते. विविध विषयांवरील पुस्तकांची खरेदी करून सरपंच माहितीच्या खजिन्याचा संग्रह करत होते. पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी लागणाऱ्या रासायनिक खतांची माहिती व्हावी म्हणून स्मार्टकेम टेक्नॉलॉजी लिमिटेडने उत्पादित केलेले जवळपास २५ खतांचे प्रकार सरपंचाना पाहण्यासाठी उपलब्ध होते. तसेच विक्रम चहा कंपनीच्या स्टॉलवर क्लासिक, सिटीसी, गोल्ड, फॅमिली मिक्स, मसाला चहा, लाॅयन डस्ट, ग्रीन टी, ब्लॅक टी, विक्रम विलायची असे चहाचे प्रकार होते.

शासनाच्या नियोजन विभागाअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या रोजगार हमी योजनांची माहिती सरपंचाना होण्यासाठी खास योजनांची माहितीपत्रके उपलब्ध करून दिली होती. गावात परदेशी भाजीपाल्याची लागवड करण्यासाठी सरपंचाना परदेशी भाजीपाल्याची उत्पादने पाहण्यासाठी ठेवली होती. त्यामुळे सरपंच उत्साहाने बारकाईने माहिती घेत आपणही गावात या पिकांची लागवड करण्याचा मनोदय व्यक्त करीत होते. पशुसंवर्धन विभागाने जनावरांसाठी अॅझोला, मुरघास, निकृष्ट चाऱ्यापासून सकस चारा निर्मिती, बहुवार्षिक चारा पिके, मुक्त संचार गोठा अशी विविध माहितींचे पत्रके उपलब्ध करून दिली होती. 

मुख्यमंत्री कार्यालयाअंतर्गत विविध योजनांची एकत्रित माहिती करून महालाभार्थी अंतर्गत सरपंचांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला. योजनांबरोबर प्रशिक्षणाची माहिती देण्यासाठी एसआयएलसी विभागाने खास बनवलेल्या प्रशिक्षणाची माहिती  ली जात होती. फोर्स मोटर्स लिमिटेड कंपनीने सरपंचांना नवीन तंत्रज्ञानाआधारित ट्रॅक्टर पाहण्यासाठी प्रदर्शनात ठेवला होता. 

#सरपंच_महापरिषद  #अॅग्रोवन_सरपंच_महापरिषद

इतर बातम्या
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
भारतात गोड्या पाण्याची उपलब्धता घटलीवॉशिंग्टन ः भारतात उपलब्ध पाण्याचा आणि पाणी...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
उत्तर प्रदेशातील कारखान्यांची अतिरिक्त...नवी दिल्ली ः बाजारात साखरेचे पडलेले दर आणि...
वादळाने बाष्प खेचून नेले; अरबी समुद्रात...पुणे : अरबी समुद्रात मंगळवारी कमी तीव्रतेचे वादळ...
उन्हाचा चटका कायम राहणारपुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भ, मध्य...
अधिकाऱ्यांनी कोंडून दिली खुनाची धमकीपुणे  : कृषी खात्यातील पाणलोट व मृद्संधारण...
कापसाच्या ३७० वाणांच्या विक्रीला...नगर  ः बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कमी आणि...
बफर स्टॉकच्या शक्‍यतेने साखर १००...कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून मंदीच्या...
दापोलीत उद्यापासून जॉइंट ॲग्रेस्कोपुणे ः यंदा ४६ वी संयुक्त कृषी संशोधन व विकास...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
हिरापूरच्या बैल बाजारात चार कोटींवर...बीड : हिरापूर (ता. गेवराई) येथे बैलांचा आठवडे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
कापूस बियाणे सत्यता पडताळण्यासाठी ‘क्‍...जळगाव ः बोगस कापूस बियाण्याला आळा घालण्यासह...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...