agriculture news in marathi, AGROWON Sirpanch Mahaparishad, Alandi, Pune | Agrowon

ग्रामविकासाची शिदोरी घेत सरपंच निघाले गावाकडे
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

आळंदी, पुणे : सकाळ-ॲग्रोवनची सातवी सरपंच परिषद उत्साहात पार पडली. दोन दिवसांच्या या परिषदेतील विविधांगी कार्यक्रमात अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी, तज्ज्ञ, शास्त्रज्ञ वक्त्यांमुळे ग्रामविकासाची सखोल चर्चा झाली. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सरपंच कृषिकेंद्रित ग्रामविकासाची शिदोरी घेतच आपल्या गावाकडे परतले.

आळंदी, पुणे : सकाळ-ॲग्रोवनची सातवी सरपंच परिषद उत्साहात पार पडली. दोन दिवसांच्या या परिषदेतील विविधांगी कार्यक्रमात अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी, तज्ज्ञ, शास्त्रज्ञ वक्त्यांमुळे ग्रामविकासाची सखोल चर्चा झाली. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सरपंच कृषिकेंद्रित ग्रामविकासाची शिदोरी घेतच आपल्या गावाकडे परतले.

 सरपंचांच्या माध्यमातून शेती व गावाचा विकास कसा घडवून आणता येईल, याविषयीचे मंथन घडवून आणणारी एक ऐतिहासिक चळवळ म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जाते. या महापरिषदेचे मुख्य प्रायोजक फोर्स मोटर्स होते. स्मार्टकेम टेक्नॉलॉजिज लिमिटेड, विक्रम चहा हे प्रायोजक, तर राज्य शासनचा जलसंधारण विभाग, रोजगार हमी विभाग, पशुसंवर्धन विभाग, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान यांचाही सहयोग परिषदेला लाभला. 

गावात मूलभूत सुविधा, तसेच सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी योजना कशा पद्धतीने राबविता येतील, याचे मार्गदर्शन या महापरिषदेत सरपंचांना मिळाले. पंचायतराज व्यवस्थेचा पाया सरपंच असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्पष्ट केल्यामुळे आपले पद छोटे नाही याची जाणीव सरपंचांना झाली. तसेच, गावविकासात येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आता स्वतः मुख्यमंत्री आणि राज्य सरकार आपल्या पाठीशी उभे आहे, याचा विश्वास या महापरिषदेत मिळाल्याने सरपंच मंडळी समाधानी चेहऱ्याने गावाकडे परतत होती. 

सरपंच महापरिषदेच्या निमित्ताने अनेक सरपंच एकमेकांचे मित्र बनले. तसेच, पोपटराव पवार, चंदू पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ सरपंचाना भेटण्याची, चंद्रकांत दळवी यांच्यासारख्या आयएएस अधिकाऱ्याशी संपर्क करण्याची सुविधा सरपंचांना मिळाल्यामुळे गावाच्या विकासाला प्रेरक ठरणारे दुवे मिळाल्याचे अनेक सरपंचांनी सांगितले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री व जलसंधारणमंत्र्यांची भूमिका सरपंचांना एकाच व्यासपीठावर ऐकण्यास मिळाल्यामुळे ग्रामविकासाची राज्याची वाटचालदेखील सरपंचांना स्पष्टपणे समजली. 

गावात रस्ते, वीज, पाणी, आरोग्य केंद्र, पोषण आहार, महिला व बालकल्याण, डेअरी, विविध कार्यकारी सोसायट्या, जलसंधारण, आदर्श गाव, तसेच विविध सेवा यांची उभारणी कशी करायची, त्यासाठी निधी कसा उभारायचा, याचे धडे दोन दिवस सरपंचांनी गिरवले. आळंदीमधील सातव्या सरपंच महापरिषदेमुळे आतापर्यंत ‘सकाळ अग्रोवन’च्या माध्यमातून कृषिकेंद्रित ग्रामविकासाचे प्रशिक्षण मिळालेल्या सरपंचांची संख्या आता आठ हजार झाली आहे.

 

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...