agriculture news in marathi, AGROWON Sirpanch Mahaparishad, Alandi, Pune | Agrowon

शेतीत नवे बदल घडवून गावाला पुढे नेणार : सरपंचांचा निर्धार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

आळंदी, जि. पुणे : शेतीतील समस्यांवर सगळेच बोलतात. शेतीत बदल घडायला पाहिजे. हे सगळ्यांना वाटतं. पण तो बदल कुणी करायचा? शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर उत्तरे कुणी शोधायची? सरपंच म्हणून ही आपली जबाबदारी आहे. याची जाणीव आज झाली आहे. सरपंच महापरिषदेतून आत्मविश्‍वास मिळाला आहे अशी भावना सरपंचांशी झालेल्या संवादातून व्यक्त झाली. 

आळंदी, जि. पुणे : शेतीतील समस्यांवर सगळेच बोलतात. शेतीत बदल घडायला पाहिजे. हे सगळ्यांना वाटतं. पण तो बदल कुणी करायचा? शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर उत्तरे कुणी शोधायची? सरपंच म्हणून ही आपली जबाबदारी आहे. याची जाणीव आज झाली आहे. सरपंच महापरिषदेतून आत्मविश्‍वास मिळाला आहे अशी भावना सरपंचांशी झालेल्या संवादातून व्यक्त झाली. 

आळंदी येथे भरलेल्या ॲग्रोवन सरपंच महापरिषदेत दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. १६) सरपंचांशी साधलेल्या थेट संवादातून त्यांची गाव विकासाची तळमळ स्पष्ट झाली. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी या आदिवासी तालुक्‍यातील कुऱ्हेगाव येथून आलेले सरपंच संपतराव धोंगडे म्हणाले, की आत्तापर्यंत शेतीतच वाढलो आहे. आमचा भाग भात उत्पादकांचा. पावसाळ्यात भात शेती आणि अन्य काळात शहरात रोजगार यावरच इथल्या आदिवासी शेतकऱ्यांचा चरितार्थ चालतो. एवढं असूनही ग्रामपंचायतीचा अन शेतीचा थेट संबंध आहे हे माहीत नव्हतं. सरपंच महापरिषदेमुळे माहिती, ज्ञानात मोठीच भर पडली आहे. भात उत्पादनापासून मार्केटींग पर्यंत अनेक प्रश्‍न आहेत. चांगले भातवाण आमच्याकडे आहेत. मात्र त्यावर प्रक्रिया, मूल्यवर्धन करण्याची सोय आमच्याकडे नाही. त्यामुळे मध्यस्थ अन व्यापारीच त्याचा फायदा घेतात. यापुढील काळात गावठाणातील लोकांसाठीच्या सुविधांबरोबरच शेतकरी गट जोडणे, त्यांची कंपनी करणे या बाबींना प्राधान्य द्यायचं ठरवलं आहे.''''

विजेची समस्या दूर केली 
तळेगाव दिंडोरी येथील सरपंच गोकूळ चौधरी यांचं गाव द्राक्ष आणि टोमॅटोच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. गावालगत असलेल्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचा गावातील शेतकऱ्यांना लाभ मिळतो आहे. पाणीटंचाई ही मुख्य समस्या आहे. या भागातून कालवा नेऊन हा प्रश्‍न मार्गी लागू शकतो. यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. विजेच्या प्रश्‍नांवर त्यांनी मार्ग काढला आहे. गावात व ग्रामपंचायत कार्यालयात सौर ऊर्जा प्रकल्प बसविला आहे. त्यामुळे इतरत्र वीजभारनियमनामुळे शेतकरी त्रस्त असताना तळेगावात ही समस्या राहिलेली नाही. सरपंच झाल्यापासून चौधरी यांनी त्यावर लक्ष केंद्रित केले आहे. गावात मोठा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारून त्यातून लगतच्या औद्योगिक वसाहतीला वीज विक्री करून त्यातून गावाचे उत्पन्न वाढविण्याचे त्यांनी ठरविले आहे. सरपंच महापरिषदेतील चर्चेतून या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले. 

गटनिर्मितीवर देणार भर 
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्‍यातील कोळथरेच्या सरपंच ज्योती दीपक महाजन यांच्या परिसरातील शेतीला रानडुकरे आणि वानरांचा फार त्रास होत असल्याचे सांगितले. आंबा, काजू, चिकू, नारळ या फळांचा हंगामच रानटी जनावरांमुळे अडचणीत सापडला आहे. येत्या काळात ही समस्या सोडवण्याबरोबरच गट निर्मिती करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. गाव शिवारात महाजन यांच्याच प्रयत्नांनी प्रक्रिया प्रकल्प सुरू झाला आहे. ॲग्रोवन सरपंच महापरिषद ही ग्रामीण उद्योजकतेला गती देणारी आहे, यामुळे गावे खऱ्या अर्थाने समृद्ध होण्यास मदत होईल असेही त्या म्हणाल्या.

शिक्षकाप्रमाणे शिकवणारी परिषद 
"आधी वाटलं ही नेहमीसारखीच एखादी परिषद असेल. मात्र "कृषिकेंद्रित ग्रामविकास'' हा एकच विषय सर्वच मार्गदर्शकांनी इतका सोपा करून सांगितला, की त्याचा थेट उपयोग आता होणार आहे. ही परिषद किती वेगळी आहे हे प्रत्यक्ष अनुभवल्यावरच समजते. सरपंच झालो आहे, मात्र प्रश्‍नांना अग्रक्रम कसा द्यावा याबाबत गोंधळ होत होता. ही सरपंच महापरिषद आमच्यासारख्या पहिल्यांदाच सरपंच झालेल्यांना हाताला धरून शिकवणाऱ्या शिक्षकांसारखी आहे अशी प्रतिक्रिया मराठवाड्यातील एका तरुण सरपंचांची होती. शेती आणि ग्रामपंचायतींचा संबंध उलगडून दाखविणारी ही परिषद गाव शिवारातील उद्योजकतेला प्रोत्साहन देणारी असल्याचे मत सरपंचांशी झालेल्या थेट 
संवादातून उमटले.

सरपंच म्हणतात...
 ॲग्रोवन सरपंच महापरिषद म्हणजे शेती, ग्रामीण उद्योजकतेला गती देणारा प्रयोग
 शेतकरी गट, शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून गावाचा चेहरा बदलणार
 प्रश्‍नांना अग्रक्रम देण्यात गोंधळ होता. आता निर्धास्त झालो आहोत.
 सौरऊर्जा प्रकल्पातून गावचे उत्पन्न वाढवण्याचा विचार आहे. 

इतर अॅग्रो विशेष
परभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...
‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...
साखर कारखान्यांची धुराडी आजपासून पेटणारपुणे: राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला...
सहकारी बॅंकांना एकाच छताखाली आणणार :...पुणे ः सहकार क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी...
चला मिरचीच्या आगारात राजूरा बाजारात...मिरचीचे आगार अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील राजूरा...
‘एसआरटी’ तंत्राने मिळाली उत्पादनासह...पेंडशेत (ता. अकोले, जि. नगर) या कळसूबाई शिखराच्या...
तुटवड्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या कांदा उत्पादक...
कृषी विद्यापीठांचे संशोधन आता एका...मुंबई ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले...
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना...शिर्डी: महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला....
कोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...
कमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
होय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...
‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला :  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
शेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...
नाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...
अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...
अठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...
‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...