agriculture news in marathi, AGROWON Sirpanch Mahaparishad, Alandi, Pune | Agrowon

नव्या दमाने स्वत: काम करणार : महिला सरपंचांचा आत्मविश्‍वास
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

आळंदी, जि. पुणे ः नवे करण्याची जिद्द आहे. लोकांच्या पाठिंब्याची गरज आहे. थेट जनतेतून निवडून आल्याने नव्या दमाने काम करणार आहे, असा आत्मविश्‍वास महिला सरपंचांनी येथे व्यक्त केला.

आळंदी, जि. पुणे ः नवे करण्याची जिद्द आहे. लोकांच्या पाठिंब्याची गरज आहे. थेट जनतेतून निवडून आल्याने नव्या दमाने काम करणार आहे, असा आत्मविश्‍वास महिला सरपंचांनी येथे व्यक्त केला.

ॲग्रोवन सरपंच महापरिषदेत सुमारे पाचशे महिला सरपंचांनी सहभाग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ या समृद्ध तालुक्‍यातून उमळवाडच्या सरपंच सरिता भवरे, शिरदवाडच्या सरपंच अक्षदा कांबळे, नवे दानवाडच्या सरपंच वंदना कांबळे यांनी सरपंच परिषदेत सहभागी झाल्या आहेत. यापैकी उमळवाडच्या सरपंच सुचित्रा खवरे या शेतकरी चळवळीतून आलेल्या कार्यकर्त्या. त्यांना राजकीय कारकीर्द घडवायची आहे, या जिद्दीने त्या सरपंच पदासाठी उभ्या राहिल्या आणि निवडून आल्या. पुरुषच ग्रामपंचायत चालवतात याबद्दल तुमचे काय मत आहे, हे विचारताच सौ. खवरे यांनी आमच्या बाबतीत हे खरे नसल्याचे सांगितले. बहुतांशी ठिकाणी अशी परिस्थिती असली तरी आम्ही मात्र स्वतंत्रच निर्णय घेत असल्याचे त्यांनी उत्साहाने सांगितले.

नव्या गोष्टी शिकण्यासाठी आम्ही येथे आलो. ग्रामविकासासाठी अशा प्रकारच्या परिषदा आम्हा नव्या महिला सरपंचाना दिशादर्शक ठरतील, असे मत अक्षदा कांबळे, वंदना कांबळे यांनी व्यक्त केले. शोसनाकडून येणाऱ्या नियमांचा आम्ही स्वत: अभ्यास करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

नव्या नियमानुसार जनतेतून थेट सरपंच निवडून आल्यानंतर किमान अडीच वर्षे तरी त्याच्यावर अविश्‍वास ठराव आणता येणार नाही असा नियम आहे. या नियमाचा अनेकींना विकासकामे करताना फायदा हाईल, अशी प्रतिक्रिया अनेक महिला सरपंचानी दिल्या. जरी एखादे काम लोकहितासाठी असले आणि त्याला विरोध झाला, तर तातडीने अविश्‍वास ठराव आणून सत्तेवरून बाजूला करण्याच्या वृत्तीला हा नियम म्हणजे लगाम असल्याचे महिला सरपंचांनी सांगितले. यामुळे एखादे रखडलेले काम करणे आता सहज शक्‍य होणार असल्याचे सहभागी महिला सरपंचांचे मत आहे. 

इतर ताज्या घडामोडी
गैरव्यवहारप्रकरणी कृषी अधिकाऱ्यांवर...मुंबई : नाशिक येथील कृषी सहसंचालक कार्यालयात...
उस पीक सल्ला उसपिकात सद्यस्थितीत ठिबकसिंचन पद्धतीने पाणी...
वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी जंगलांना...पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेण्याच्या...
परभणीतील एक लाख ३३ हजार शेतकऱ्यांना... परभणी  ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...
सातारा जिल्ह्यात ७५ लाख टन उसाचे गाळप सातारा : जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचे ऊस गाळप...
कोल्हापुरातील ऊस गाळप हंगाम अंतिम... कोल्हापूर : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम हळूहळू...
मार्चअखेरपर्यंत टप्प्याटप्याने... मंदीतील ब्रॉयलर्सचा बाजार मार्चअखेरपर्यंत...
पुण्यात लसूण, फ्लॉवर, मटार वधारलापुणे ः वाढता उन्हाळ्यामुळे शेतीमालाचे उत्पादन...
चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये...चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये प्रति...
राहुल गडपाले ‘सकाळ’चे चीफ कन्टेंट क्‍...पुणे : सकाळ माध्यम समूहाच्या संपादक संचालकपदी...
सत्तावीस कारखान्यांकडून १ कोटी २१ लाख... नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांत सुरू असलेल्या...
पुणे जिल्ह्यातील १०० मंडळांमध्ये... पुणे  ः हवामान अंदाजाबाबत अचूक माहिती...
लाचखोर तालुका कृषी अधिकारी 'लाचलुचपत'...अकोला : जलसंधारणाच्या केलेल्या कामांची देयके...
परभणी जिल्ह्यातील चार लघू तलाव कोरडे परभणी ः पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे...
स्वखर्चाने शेततळे करणाऱ्यांना मिळेना...औरंगाबाद : शेतीला पाण्याची सोय व्हावी म्हणून...
कोल्हापुरात गुळाचे पाडव्यानिमित्त सौदे कोल्हापूर : येथील बाजार समितीत पाडव्यानिमित्त...
साखरेप्रमाणे कापसासाठी धाेरण ठरवावे :...पुणे : साखरेप्रमाणेच कापसासाठी दरावर लक्ष कें....
राज्यात आज अन्नत्याग आंदोलनमाळकोळी, नांदेड ः आजवर आत्महत्या केलेल्या...
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...