agriculture news in marathi, AGROWON Sirpanch Mahaparishad starts from today in Alandi, pune | Agrowon

आळंदीत आजपासून ग्रामविकासावर मंथन
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

पुणे : सकाळ ॲग्रोवनच्या सातव्या सरपंच महापरिषदेला आळंदीत आजपासून (ता. १५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत प्रारंभ होत आहे. राज्यातील निवडक एक हजार सरपंचांचा सहभाग असलेल्या या महापरिषदेचे उद्‌घाटन सकाळी ११ वाजता होईल. दरम्यान, बुधवारी दुपारपासूनच महापरिषदेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील सरपंच दाखल व्हायला सुरवात झाली असून ज्ञानोबारायांची आळंदी गजबजून गेली आहे.

पुणे : सकाळ ॲग्रोवनच्या सातव्या सरपंच महापरिषदेला आळंदीत आजपासून (ता. १५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत प्रारंभ होत आहे. राज्यातील निवडक एक हजार सरपंचांचा सहभाग असलेल्या या महापरिषदेचे उद्‌घाटन सकाळी ११ वाजता होईल. दरम्यान, बुधवारी दुपारपासूनच महापरिषदेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील सरपंच दाखल व्हायला सुरवात झाली असून ज्ञानोबारायांची आळंदी गजबजून गेली आहे.

महाराष्ट्राचा कृषिविकास आणि ग्रामसमृद्धीसाठी धोरणात्मक मंथन घडवून आणणारी एक ऐतिहासिक चळवळ म्हणून सरपंच महापरिषदेचा आवर्जून उल्लेख केला जातो. आजपासून सुरू होत असलेल्या सातव्या महापरिषदेत महिला सरपंचांसह एक हजारांहून अधिक सरपंच सहभागी होत आहेत. 

आळंदीमधील माउली समाधी मंदिराजवळच्या फ्रुटवाले धर्मशाळा सभागृहात गुरुवारी सकाळी ११ वाजता महापरिषदेला सुरवात होईल. महापरिषदेचे मुख्य प्रायोजक फोर्स मोटर्स हे असून स्मार्टकेम टेक्‍नॉलॉजिज लिमिटेड, विक्रम चहा हे प्रायोजक आहेत. राज्य शासनचा जलसंधारण विभाग, रोजगार हमी विभाग, पशुसंवर्धन विभाग, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान यांचा सहयोग सरपंच महापरिषदेला लाभला आहे. ग्रामविकासाची स्वप्नं बघणारे सुशिक्षित, गावासाठी उत्साहाने पुढाकार घेणारे युवा सरपंच, तसेच आपल्या अनुभवातून गावात आदर्श कामे करणाऱ्या अनुभवी सरपंचांचा परिषदेत समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अनेक महिला सरपंच या महापरिषदेत उत्साहाने सहभागी होत आहेत. 

मान्यवरांचे मार्गदर्शन मिळणार  - 
आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष तथा हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्याकडून सरपंच मंडळींना विकासाचा मंत्र या महापरिषदेत मिळणार आहे. पंतप्रधान कार्यालयापासून ते जागतिक बॅंकेपर्यंत हिवरे बाजारातील प्रयोगांचे कौतुक होत असून त्यामागे श्री. पवार यांच्या रूपाने एका कुशल व दिशादर्शक सरपंचांची भूमिका मोलाची ठरली आहे. सरपंच महापरिषदेच्या निमित्ताने श्री. पवार यांच्यासारखे धुरंधर सरपंच तयार करून राज्याच्या नकाशावर आणखी काही आदर्श ग्रामपंचायती साकारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

धोरण, प्राधान्यक्रम समजणार 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची उपस्थिती सरपंच महापरिषदेत असेल. यामुळे सरकारकडून ग्रामविकासाचे पुढील धोरण समजण्यास मदत होणार आहे. गावाला विकासाच्या वाटेने नेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सरपंचांना यामुळे सरकारचे प्राधान्यक्रम व भूमिका समजून घेता येईल. त्यातून गावात विकासाचे नियोजन करण्यास मदत होणार आहे. मृद व जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे देखील शुक्रवारी परिषदेच्या समारोप सत्रात सहभागी होत आहेत. गावागावांमध्ये सुरू असलेल्या जलयुक्तशिवार अभियानाबाबत प्रा. शिंदे यांच्याकडून पुढील दिशा समजून घेण्यास सरपंचांना मदत मिळणार आहे. 

कृषिकेंद्रित ग्रामसमृद्धीचा मंत्र 
सरपंच महापरिषदेच्या निमित्ताने राज्यातील सरपंचांना खऱ्याखुऱ्या ‘भगिरथ’ मंडळींना भेटण्याची संधी मिळणार आहे. विविध गावांमध्ये विकासाची गंगा आणून राज्य व देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या या भगिरथांकडून सरपंचांना कृषिकेंद्रित ग्राम समृद्धीचा मंत्र मिळणार आहे. यात पोपटराव पवार यांच्यासह कुर्डू गावातील जयंतराव पाटील कुर्डूकर, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, महिन्यात गावाला दहा पुरस्कार मिळवून देणारे ॲड. विकास जाधव, विदर्भातील आपल्या कायापालट करणारे सरपंच चंदू पाटील, बारडगावचा सरपंच डॉ. शीतल गावडे, शेतकरी उत्पादक कंपन्यांची चळवळ उभारणारे विलास शिंदे, अंकुश पडवळे, योगेश थोरात यांच्याकडून दिशादर्शक माहिती सरपंचांसाठी दिली जाणार आहे. याशिवाय कृषी विभाग आणि गाव विकास, गटशेती, ग्रामविकास, आदर्श गाव योजना, ग्रामस्वच्छता, ग्रामपंचायत व ग्रामसभेचे अधिकार, चौदावा वित्त आयोग, सरपंचांचे हक्क आणि कर्तव्य अशा विविध विषयांवर महापरिषदेत चर्चा होईल.  

ट्रॅक्टरसह अनेक बक्षिसे जिंकण्याची संधी 
 सरपंच महापरिषदेत सहभागी झालेल्या सरपंचांना मौलिक मार्गदर्शनाबरोबरच विविध बक्षिसांचे मानकरी होण्याची संधी मिळणार आहे. महापरिषदेचे मुख्य प्रायोजक ‘फोर्स मोटर्स’ यांच्याकडून भाग्यवान सरपंचाला ऑर्चर्ड ट्रॅक्टर मिळणार आहे. त्यासाठी ड्रॉ काढला जाणार आहे. याशिवाय महापरिषदेचे दुसरे प्रायोजक असलेल्या विक्रम चहा यांच्या वतीने राज्यातील दहा गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी डिजिटल क्लासरूम दिले जाणार आहेत. प्रत्येक डिजिटल क्लासरूमसाठी ५५ हजार रुपयांचे साहित्य विक्रम चहाकडून दिले जाणार असून, या भाग्यवान गावांची नावेदेखील ड्रॉ पद्धतीने काढली जातील.

उद्‌घाटन सत्राचे अॅग्रोवन आणि सकाळच्या
फेसबुकवर थेट प्रक्षेपण, वेळ : सकाळी ११ वाजता

https://www.facebook.com/AGROWON
https://www.facebook.com/SakalNews 

इतर अॅग्रो विशेष
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
सीताफळाच्या योग्य जातींची करा लागवडमहाराष्ट्रात सीताफळाच्या झाडांचे काही नैसर्गिक...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
केसर आंबा पाडाला आलाय...औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना...
बदल्या समुपदेशनानेच...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
बारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...
भाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...
मथुरेचं दूध का नासलं?राज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...