जळगावमध्ये कृषी पदविका अभ्यासक्रमाला संथ प्रतिसाद
चंद्रकांत जाधव
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

जळगाव : जिल्ह्यातील १३ कृषी विद्यालयांपैकी काही विद्यालयांचा अपवाद वगळता इतर विद्यालयांमध्ये यंदाही कृषी पदविका अभ्यासक्रमाला संथ प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील कृषी पदविकेच्या प्रथम वर्षाच्या एकूण ७२० जागांपैकी केवळ ४५२ जागांवर प्रवेश झाले असून, २६८ जागा रिक्त आहेत.

जागा मोठ्या संख्येने रिक्त असल्याने यंदाही मागील वर्षाप्रमाणे प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. ३ ऑक्‍टोबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार असून, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेतर्फे ऑनलाइन अर्ज मागविले जात आहेत.

जळगाव : जिल्ह्यातील १३ कृषी विद्यालयांपैकी काही विद्यालयांचा अपवाद वगळता इतर विद्यालयांमध्ये यंदाही कृषी पदविका अभ्यासक्रमाला संथ प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील कृषी पदविकेच्या प्रथम वर्षाच्या एकूण ७२० जागांपैकी केवळ ४५२ जागांवर प्रवेश झाले असून, २६८ जागा रिक्त आहेत.

जागा मोठ्या संख्येने रिक्त असल्याने यंदाही मागील वर्षाप्रमाणे प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. ३ ऑक्‍टोबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार असून, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेतर्फे ऑनलाइन अर्ज मागविले जात आहेत.

प्रत्येक कृषी विद्यालयास ६० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता प्राप्त आहे. जिल्ह्यात १३ कृषी विद्यालये असून, यातील दोन विद्यालये प्रवेश प्रक्रियेत सहभागी झालेले नाहीत. त्यात पाल (ता. रावेर) व सायगाव (ता. चाळीसगाव) येथील विद्यालयांचा समावेश आहे. तर काही विद्यालयांमध्ये पदविका अभ्यासक्रमाला अल्प प्रतिसाद आहे.

मराठी अभ्यासक्रमानंतरही प्रतिसाद नाही
जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी तीन वर्षांचा इंग्रजी माध्यमातील कृषी पदविका अभ्यासक्रम कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने लागू केला होता. त्या वेळेसही प्रवेश प्रक्रियेला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. तर निकालांवरही मोठा परिणाम झाला होता. काही विद्यालयांमध्ये तर दोन ते तीनच प्रवेश प्रथम वर्षाला झाले होते. ही बाब लक्षात घेता जिल्ह्यातील कृषी विद्यालयांचे व्यवस्थापन व प्रशासन यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून दोन वर्षांचा मराठी माध्यमातील कृषी पदविका अभ्यासक्रम लागू करून घेतला. पण आता मराठी माध्यमाच्या अभ्यासक्रमालाही फारसा प्रतिसाद लाभत नसल्याचे दिसून येत आहे.  

वाकोद (ता. जामनेर, जि. जळगाव) येथील कृषी तंत्र विद्यालयात तीन वर्षांचा इंग्रजी माध्यमातील कृषी पदविका अभ्यासक्रम आहे. या विद्यालयात पूर्ण ६० प्रवेश झाले आहेत. तर निमखेडी (ता. जळगाव) येथील शासकीय कृषी तंत्र विद्यालयातही ६० प्रवेश झाले आहेत.

जिल्ह्यातील काही विद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रियेला चांगला प्रतिसाद आहे. पण काही विद्यालयांमध्ये हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. आता पुन्हा प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. मात्र ३ ऑक्‍टोबरनंतर प्रवेश दिले जाणार नाहीत. तसेच ३ तारखेनंतर अध्यापनाचे काम गतीने सुरू करावे लागेल. 
- डॉ. अविनाश पाटील, प्राचार्य, कृषी तंत्र विद्यालय, निमखेडी (ता. जळगाव)

 

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांना...नगर  : राज्यात कर्जमाफी मिळणारे सर्वाधिक...
राज्य सरकारचे धोरण शेतकरी हिताचे ः जानकरउस्मानाबाद  : राज्य सरकारचे धोरण...
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा सरकारचा...नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत...
सणाच्या दिवशी शेतकऱ्यांचे ठेचा भाकर...बुलडाणा : एेन सण काळात स्वाभिमानी शेतकरी...
शेतीपूरक व्यवसायाच्या आराखड्याचे काम...पुणे : शेतकऱ्यांना कर्जमाफी केली असली तरी,...
औरंगाबाद येथे कर्जमाफी प्रमाणपत्राचे... औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्हाधिकारी...
देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी ः... सातारा  : शेती आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस...
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी... हिंगोली : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा...
कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड ः... नांदेड : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
शासन शेतीमाल प्रक्रिया उद्योगांवर भर... जळगाव  ः शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी...
असंतोष विभागण्यासाठीच कर्जमाफीचे...मुंबई : सरकारने कर्जमाफीसाठी ज्या अटी- शर्ती लागू...
संत गजानन महाराज संस्थान करतेय...शेगाव, जि. बुलडाणा : शिस्त, सेवा अाणि समाज...
परभणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी... परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
राज्यातील बहुतांशी भागांत उकाडा वाढलापुणे : परतीचा पाऊस राज्यातून गेल्याने बहुतांशी...
कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक ः सदाभाऊ खोत कोल्हापूर : शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत...
कर्जमाफी शेतकऱ्यांना ताकद देणारी ः... बुलडाणा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
अपयश लपविण्यासाठी भाजपकडून खोटी...मुंबई: दुसऱ्या टप्प्यातील ३७०० ग्रामपंचायतींच्या...
औरंगाबादेत २९ ऑक्‍टोबरला 'मराठा महासभा' औरंगाबाद : मराठा समाजातर्फे राज्यभर 57 मोर्चे...
नागपुरात सोयाबीन प्रतिक्‍विंटल २७५०...नागपूर ः बाजारात सोयाबीनच्या दरात होणाऱ्या किरकोळ...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...