Agriculture news in marathi, AGROWON Smart Awards, Pratap Pawar | Agrowon

शेतकरी स्वतःच्या हिमतीवर उभा राहावा : प्रतापराव पवार
टीम अॅग्रोवन
रविवार, 31 डिसेंबर 2017

पुणे : शेतकरी स्वतःच्या हिमतीवर उभा राहावा. शेतकऱ्याने प्रयोग करावेत, शेतीपुढील प्रश्न कसे सोडवावेत याचा विचार करावा, त्याला सरकारसह कुणाच्याही मदतीची गरज भासू नये, असे प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी शुक्रवारी (ता. २९) येथे केले.

पुणे : शेतकरी स्वतःच्या हिमतीवर उभा राहावा. शेतकऱ्याने प्रयोग करावेत, शेतीपुढील प्रश्न कसे सोडवावेत याचा विचार करावा, त्याला सरकारसह कुणाच्याही मदतीची गरज भासू नये, असे प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी शुक्रवारी (ता. २९) येथे केले.

सकाळ-अॅग्रोवनच्या स्मार्ट शेतकरी पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी श्री. पवार बोलत होते. ते म्हणाले, की लोकांच्या साहाय्याने लोकांना सोबत घेऊन लोकांसाठी काम करायचे ही दैनिक ‘सकाळ’ची परंपरा आहे. व्यवस्थेत शेतकरी हा मोठा वर्ग आहे. हे जाणून ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी जेव्हा अॅग्रोवनची संकल्पना मांडली तेव्हा सुरवातीला काहींनी हा वेडेपणा ठरवला. शेतकरी वाचत नाही, तेव्हा कुठे हे वृत्तपत्र चालणार, अशी चर्चा झाली. मात्र, शेतकऱ्यांनी स्वतःच हा गैरसमज खोटा ठरवला आहे.

‘सकाळ’ने राज्यातील दुष्काळी भागात पाण्याबाबत सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून सुमारे ५०० गावे टंचाईमुक्त करण्यात यश आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हजारो शेतकऱ्यांना याचा लाभ झाला. कोट्यवधींची उलाढाल शक्य झाली. ते पुढे म्हणाले, महिलांची मोठी शक्ती नजरेसमोर ठेवून महिलांसाठी तनिष्का हे व्यासपीठ उपलब्ध केले आहे. नापिकी, कर्जबाजारीपणा आणि इतर नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी आत्महत्या करतात, याची खंत व्यक्त करताना त्यांनी महिला मात्र जिद्दीने उभी राहते, ती कधीही आत्महत्या करीत नाही, ती संकटाचा धाडसाने मुकाबला करते, असे सांगत महिलांमध्ये असे अलौकिक सामर्थ्य असते, याचा उल्लेख केला. हे सांगत असताना त्यांनी अॅग्रोवन प्रेरणा पुरस्कार मिळालेल्या ज्योतीताई देशमुख यांचा आवर्जून उल्लेख केला. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी, त्यांच्यात काम करायची इच्छा निर्माण व्हावी त्यासाठी हा पुरस्कार दिला जात असल्याचे सांगून चांगलं घडतंय, घडू शकतंय हे सांगायचा उद्देश त्यामागे असल्याचे श्री. पवार यांनी स्पष्ट केले.

शेतकरी स्वतःच्या हिमतीवर उभा राहावा. शेतकऱ्याने प्रयोग करावेत, नाशिकच्या सह्याद्री अॅग्रो फूड्ससारख्या संस्था उभाराव्यात, शेतीपुढील प्रश्न कसे सोडवावेत याचा विचार व्हावा, त्याला सरकारसह कुणाच्याही मदतीची गरज भासू असे प्रयत्न करावेत, असा सल्लाही त्यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिला. आगामी काळातही शेतकऱ्याला आणखी काही नवीन देता येईल याचा प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांना उत्कृष्ट बियाणे मिळावं यासाठीसुद्धा सकाळ प्रयत्नशील असल्याचे सांगताना पुढील वर्षी याबाबत विस्ताराने बोलेन, असेही श्री. पवार म्हणाले.

 

इतर अॅग्रो विशेष
अंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...
रोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...
साखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...
‘ॲग्रोवन’ आमचा..! आम्ही ‘ॲग्रोवन’चे..!!पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...
वर्धापन दिनानिमित्ताने ‘अॅग्रोवन’वर...पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...
भारतासह दक्षिण आशियात यंदा सामान्य पाऊसपुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
चंद्रपूरला अजूनही उच्चांकी तापमानपुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यातील ऊन...
रत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला...मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या...
‘ॲग्रोवन’चे आज चौदाव्या वर्षात पदार्पण !पुणे ः राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या...
कृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान...पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान...
चंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
३२०० साखर दराची अंमलबजावणी व्हावी :...कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने...
केसर आंबा संकटातचऔरंगाबाद :  सुरवातीला मोहराच्या काळात...
त्रस्त शेतकरी वाटणार ३ मेपासून मोफत दूधनगर/औरंगाबाद  : गतवर्षी शेतकरी संपानंतर...
पीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा केला वापरप्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची...
खडकाळ, हलक्या जमिनीतही आणली सुपीकताकोणतेही पीक येईल की नाही, अशा खडकाळ जमिनीचे संजय...
नैसर्गिक शेतीतून राखले जमिनीचे आरोग्यअमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा (संभू)( ता. भातकुली...
जमिनीवरील अत्याचार थांबवा !पुणे : एक इंच माती तयार होण्यासाठी ५०० वर्षे...
दुग्ध व्यवसायाला २८०० कोटींचा फटकापुणे : उत्पादन खर्चात वाढ आणि नफा घटल्यामुळे...
मुदत संपलेल्या जिल्हा बँकांवर प्रशासक...मुंबई : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण चार...