agriculture news in marathi, AGROWON soil fertility seminar in Jalgaon | Agrowon

डॉ. कौसडीकर, प्रभाकर चौधरी, प्रताप चिपळूणकर करणार मार्गदर्शन
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 29 मे 2018

जळगाव : ‘ॲग्रोवन’तर्फे बुधवारी (ता. ३०) जमीन सुपीकता या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी १.३० यादरम्यान नवीन बसस्थानकाजवळच्या कांताई सभागृहात हे चर्चासत्र होईल.

यूपीएल हे या चर्चासत्राचे प्रस्तुतकर्ते असून, राईज एन शाईन बायोटेक हे सहप्रायोजक आहेत. या चर्चासत्रात महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, रसायनमुक्त शेती करणारे धुळे येथील प्रभाकर भिला चौधरी व कोल्हापूर येथील प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर हे मान्यवर मार्गदर्शन करतील.

जळगाव : ‘ॲग्रोवन’तर्फे बुधवारी (ता. ३०) जमीन सुपीकता या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी १.३० यादरम्यान नवीन बसस्थानकाजवळच्या कांताई सभागृहात हे चर्चासत्र होईल.

यूपीएल हे या चर्चासत्राचे प्रस्तुतकर्ते असून, राईज एन शाईन बायोटेक हे सहप्रायोजक आहेत. या चर्चासत्रात महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, रसायनमुक्त शेती करणारे धुळे येथील प्रभाकर भिला चौधरी व कोल्हापूर येथील प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर हे मान्यवर मार्गदर्शन करतील.

जमिनीचे आरोग्य दिवसागणिक ढासळत आहे. शेती संकटात सापडली असून, या पार्श्‍वभूमीवर ॲग्रोवनने २०१८ हे जमीन सुपीकता वर्ष म्हणून जाहीर केले आहे. या संदर्भात पहिले चर्चासत्र पुणे येथे १७ एप्रिल, २०१८ रोजी आयोजित केले. त्यास शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. अशा चर्चासत्रांची मागणी विविध भागांतून होऊ लागली. ही बाब लक्षात घेता खानदेशातील शेतकऱ्यांसाठी हे चर्चासत्र आयोजित केले आहे. खानदेशातही गिरणा, तापी, गोमाई, पांझरा आदी नद्यांमुळे शेती समृद्ध झाली आहे. परंतु जमिनीमधील घटते सेंद्रिय कर्ब, क्षारपड जमिनी असे प्रश्‍न भेडसावू लागले आहेत. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर हे चर्चासत्र आयोजित केले आहे.

असे याल चर्चासत्रास
ॲग्रोवन जमीन सुपीकता वर्ष २०१८
 चर्चासत्र ः जपाल माती, तर पिकतील मोती
 स्थळ ः कांताई सभागृह, नवीन बसस्थानकानजीक, जळगाव
 दिनांक व वेळ ः बुधवार, ३० मे २०१८, सकाळी १० ते दुपारी १.३०.

वक्‍त्यांचा परिचय
डॉ. हरिहर कौसडीकर
डॉ. हरिहर कौसडीकर हे राज्याच्या कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे (पुणे) संचालक असून, जमिनीचे आरोग्य, पीक पोषण या विषयातील तज्ज्ञ आहेत. या विषयावर डॉ. कौसडीकर यांनी अनेक शेतकऱ्यांचे प्रबोधन केले आहे. जमिनीमधील घटते सेंद्रिय कर्ब व इतर मुद्द्यांसंबंधी त्यांचा दांडगा अभ्यास आहे.

प्रभाकर भिला चौधरी
प्रभाकर भिला चौधरी हे धुळे येथील आहेत. त्यांची शेती वरखेडी (जि. धुळे) शिवारात असून, सन २००२ पासून ते रसायनमुक्त शेती करीत आहेत. १९ एकरांत कापूस, भाजीपाला, तृणधान्याचे ते सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतात. सोबत देशी गायींचे संगोपनही ते करीत आहेत. ॲग्रोवनने सन २०१७ चा स्मार्ट शेतकरी (सेंद्रिय) पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे.

प्रताप चिपळूणकर
प्रताप चिपळूणकर हे कोल्हापूर येथील असून, आयुष्यभर जमीन सुपीकता या विषयावर ते काम करीत आहेत. ते प्रयोगशील शेतकरी व ॲग्रोवनचे नियमित लेखक आहेत. नैसर्गिक शेतीसंबंधी त्यांचा अभ्यास आहे.

इतर अॅग्रो विशेष
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
परभणी ठरले देशात उष्णपुणे : राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक थांबणार कधी?नाशिक: नाशिक जिल्ह्यातील मुख्य अर्थकारण...
यवतमाळच्या अनिकेतने तयार केला फवारणीचा...यवतमाळ ः फवारणीमुळे होणाऱ्या विषबाधा सर्वदूर...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर...पणजी : गेल्या एक वर्षापासून अधिक काळ...