‘सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टर्स’ची बुधवारी सर्वसाधारण सभा

खाद्यतेल
खाद्यतेल

मुंबई : देशातील खाद्यतेल प्रक्रिया उद्योग आणि व्यापाराशी संबंधित यशस्वी व्यक्ती आणि उद्योजकांना या क्षेत्रातील आघाडीच्या सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने (एसईए) सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या बुधवारी (ता. १३) मुंबईतील असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

या वेळी केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, मलेशियाचे मंत्री दातूक सेरी माह सिऊ केआँग, इंडोनेशिया सरकारचे उप अन्न आणि कृषिमंत्री मदाम मुसदल्लिफाह मचमूड, अर्जेंटिना सरकारचे उपसचिव जिझस सिल्व्हेयरा आणि राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला देशविदेशातील सुमारे सातशे ते आठशे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील पोवई येथील रेनिंसन्स हॉटेलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी इंदूर येथील जीजीएन संशोधन कंपनीचे व्यवस्थापक जीजी पटेल ‘‘भारतातील २०१७-१८ मधील तेलबिया पिकाची परिस्थिती आणि खाद्यतेलाची मागणी आणि पुरवठा’’ या विषयावर सादरीकरण करणार आहेत. सिकंदराबाद येथील अायटीसी लि.चे उपाध्यक्ष राजीव मोहन ‘‘भारतातील घाणा उद्योगाचे भविष्य आणि भारतातील तेल कंपन्यांची निर्यात संभावना’’ या विषयावर तर गोदरेज इंटरनॅशनल लि.चे संचालक डोराब मिश्री ‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील एफईडीचा परिणाम’ या विषयावर सादरीकरण करणार आहेत. अग्री बिझनेसचे तज्ज्ञ विजय सरदाणा हे ‘‘तेलबिया विभागातील शाश्वत नफ्याची निश्तिती आणि भविष्यातील मार्गक्रमण’’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. खाद्यतेल प्रक्रिया उद्योगाशी संबंधित असलेली एसईए ही देशातील आघाडीची संस्था आहे. खाद्यतेल उद्योगाच्या माध्यमातून देशात वर्षाकाठी सुमारे पावणेदोनशे लाख टन तेलबिया आणि इतर तेलनिर्मिती करणाऱ्या शेती उत्पादनांवर प्रक्रिया होते. यातून २८ लाख टन खाद्यतेलनिर्मिती होते, शिवाय सुमारे ३५ लाख टन इतकी खाद्यतेलासह विविध पूरक उत्पादने निर्यात केली जातात. उद्योगातून मिळणारे परकीय चलनही मोठे आहे. सुमारे सोळा हजार कोटींचे परकीय चलन वर्षाकाठी देशात येते. या उद्योगाला चालना देण्यासाठी एसईए ही संस्था विशेष प्रयत्न करत असते. खाद्यतेल प्रक्रिया उद्योजक आणि निर्यातदारांना प्रेरणा देण्यासाठी असोसिएशनच्या वतीने दरवर्षी यशवंतांचा गुणगौरव समारंभही साजरा केला जातो. यंदाही उद्योगातील यशस्वी व्यक्तींना येत्या बुधवारी (ता. १३) सन्मानित केले जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com