agriculture news in marathi, agrowon, solvent extractor association of india, annual general meeting | Agrowon

‘सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टर्स’ची बुधवारी सर्वसाधारण सभा
मारुती कंदले
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

मुंबई : देशातील खाद्यतेल प्रक्रिया उद्योग आणि व्यापाराशी संबंधित यशस्वी व्यक्ती आणि उद्योजकांना या क्षेत्रातील आघाडीच्या सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने (एसईए) सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या बुधवारी (ता. १३) मुंबईतील असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

मुंबई : देशातील खाद्यतेल प्रक्रिया उद्योग आणि व्यापाराशी संबंधित यशस्वी व्यक्ती आणि उद्योजकांना या क्षेत्रातील आघाडीच्या सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने (एसईए) सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या बुधवारी (ता. १३) मुंबईतील असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

या वेळी केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, मलेशियाचे मंत्री दातूक सेरी माह सिऊ केआँग, इंडोनेशिया सरकारचे उप अन्न आणि कृषिमंत्री मदाम मुसदल्लिफाह मचमूड, अर्जेंटिना सरकारचे उपसचिव जिझस सिल्व्हेयरा आणि राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला देशविदेशातील सुमारे सातशे ते आठशे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील पोवई येथील रेनिंसन्स हॉटेलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

या वेळी इंदूर येथील जीजीएन संशोधन कंपनीचे व्यवस्थापक जीजी पटेल ‘‘भारतातील २०१७-१८ मधील तेलबिया पिकाची परिस्थिती आणि खाद्यतेलाची मागणी आणि पुरवठा’’ या विषयावर सादरीकरण करणार आहेत. सिकंदराबाद येथील अायटीसी लि.चे उपाध्यक्ष राजीव मोहन ‘‘भारतातील घाणा उद्योगाचे भविष्य आणि भारतातील तेल कंपन्यांची निर्यात संभावना’’ या विषयावर तर गोदरेज इंटरनॅशनल लि.चे संचालक डोराब मिश्री ‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील एफईडीचा परिणाम’ या विषयावर सादरीकरण करणार आहेत. अग्री बिझनेसचे तज्ज्ञ विजय सरदाणा हे ‘‘तेलबिया विभागातील शाश्वत नफ्याची निश्तिती आणि भविष्यातील मार्गक्रमण’’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

खाद्यतेल प्रक्रिया उद्योगाशी संबंधित असलेली एसईए ही देशातील आघाडीची संस्था आहे. खाद्यतेल उद्योगाच्या माध्यमातून देशात वर्षाकाठी सुमारे पावणेदोनशे लाख टन तेलबिया आणि इतर तेलनिर्मिती करणाऱ्या शेती उत्पादनांवर प्रक्रिया होते. यातून २८ लाख टन खाद्यतेलनिर्मिती होते, शिवाय सुमारे ३५ लाख टन इतकी खाद्यतेलासह विविध पूरक उत्पादने निर्यात केली जातात.

उद्योगातून मिळणारे परकीय चलनही मोठे आहे. सुमारे सोळा हजार कोटींचे परकीय चलन वर्षाकाठी देशात येते. या उद्योगाला चालना देण्यासाठी एसईए ही संस्था विशेष प्रयत्न करत असते. खाद्यतेल प्रक्रिया उद्योजक आणि निर्यातदारांना प्रेरणा देण्यासाठी असोसिएशनच्या वतीने दरवर्षी यशवंतांचा गुणगौरव समारंभही साजरा केला जातो. यंदाही उद्योगातील यशस्वी व्यक्तींना येत्या बुधवारी (ता. १३) सन्मानित केले जाणार आहे.

इतर अॅग्रोमनी
सोयाबीनच्या फ्युचर्स भावात घटएनसीडीइएक्स मध्ये या सप्ताहात कापूस, मका व साखर...
सोयाबीनच्या फ्युचर्स भावात नरमाईएनसीडिएक्स मध्ये या सप्ताहात कापूस, साखर, हळद,...
तूर उत्पादकांना दोन हजार बोनस न दिल्यास...अमरावती ः तुरीची शासकीय हमीभाव खरेदी सुरू करावी...
सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता नाहीदेशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सध्या सोयाबीनचे दर...
सीमाबंदीमुळे टोमॅटोचा लाल चिखलकेंद्रीय कृषी मंत्रालयाने ३० मे रोजी...
दूध दर कमी असतानाही मूल्यवर्धित...वाढता उत्पादन खर्च, तुलनेने कमी झालेले दूध दर...
सोयाबीन, मका, हरभऱ्यात नरमाई; साखर, हळद...एनसीडीईएक्समध्ये या सप्ताहात कापूस व साखर वगळता...
कांद्यातील नरमाई किती काळ?कां द्याच्या बाजारात जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८...
शेतकरी कंपन्यांनी राबवला थेट विक्रीचा...राज्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना...
सर्व पिकांच्या फ्युचर्स भावात वाढीचा कलएनसीडीइएक्समध्ये या सप्ताहात गवार बी, गहू व हरभरा...
सरकारने साखर आयात केली नाही कोल्हापूर : सरकारने पाकिस्तानातून कोणतीही साखर...
दीडशे लाख क्विंटल कापूस शिल्लकजळगाव : देशात आजघडीला सुमारे १५० लाख क्विंटल...
गवार बी वगळता सर्व पिकांच्या फ्युचर्स...एनसीडीइएक्स मध्ये या सप्ताहात हळद, गहू व हरभरा...
पंजाबात गव्हाची १२१ लाख टनांपेक्षा अधिक...चंडीगड : पंजाब राज्यात सरकारी संस्था आणि...
कशी रोखणार पुरवठावाढ?शेतीमाल पुरवठावाढ ( Supply glut) ही मोठी ...
साखरेचा बफर स्टॉक न केल्यास अडचणी...पुणे : देशातील साखरेचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे...
एमार कंपनी महाराष्ट्रात अन्न...मुंबई : अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सौदी अरेबियाची...
मक्याच्या भावात घसरणया सप्ताहात सर्वात अधिक घसरण गवार बी मध्ये (८.६...
तीन महिन्यांनंतर परतली तेजी; बाजार उसळलाजानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून ब्रॉयलर्सच्या...
डॉलर वधारल्याने कापसात निर्यात संधीजळगाव : रुपयाचे अवमूल्यन होऊन डॉलरचे दर ६६ रुपये...