agriculture news in marathi agrowon special article on imbalance use of fertilizers | Agrowon

चुकीच्या धोरणामुळे खतांचा असंतुलित वापर
ASHOK SAKALE
सोमवार, 14 मे 2018

लोकप्रियतेसाठी शासनाने गेल्या २० वर्षांत युरियाचे भाव रुपये २९६ प्रति गोणीच्या वर वाढू दिले नाहीत; मात्र १०:२६:२६ किंवा १८:४६:०० या संयुक्त खतांची किंमत ११०० ते १२५० प्रतिगोणी इतकी वाढली आहे. यामुळे युरियाचा अतिरिक्त वापर होतो. 

रासायनिक खते सम्पृक्त (कॉन्सन्ट्रेटेड) स्वरूपात असतात. कमी मात्रेत पिकाला मुबलक मुख्य अन्नघटक उपलब्ध करतात. वापरण्यास सोपे आहेत व सहज उपलब्ध होतात म्हणून रासायनिक खत वापराकडे शेतकरी बांधवांचा अधिक ओढा असतो. 

पिकाचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी १७ अन्नघटक कमी अधिक प्रमाणात पिकाला जमिनीतून मिळाली पाहिजेत. यातील मुख्य अन्नघटक म्हणजेच नत्र, स्फुरद, पालाश व गंधक हे पिकाची जोमदार कायिक वाढ, फुले, फळांचा विकास, गुणवत्ता, रोगप्रतिकारक शक्ती आदींसाठी महत्त्वाची कार्ये करतात. रासायनिक खते शेतीसाठी आवश्यक आहेत; पण महाग आहेत. शेतकऱ्यांनी रासायनिक खते संतुलित प्रमाणात पिकाच्या गरजेप्रमाणे कार्यक्षमरीत्या वापरून शेतीतील उत्पादन वाढवावे यासाठी शासनाने नेहमीच रासायनिक खतांना अनुदान देण्याचे धोरण स्वीकारले आहे. जेणेकरून शेतकरी हवे ते खत खरेदी करू शकेल व त्याचा उपयोग करून शेतीतील उत्पन्न वाढवू शकेल. परंतु असे असताना रासायनिक खतांचा भरपूर वापर होतोय आणि अपेक्षित उत्पादन मात्र मिळत नाही. कारण माती परीक्षण करून, पिकाच्या गरजेप्रमाणे खत देण्याऐवजी आम्ही ढोबळ शिफारसीप्रमाणे, खिशाला परवडतील तशी खत टाकून मोकळे होतो.

खताचा प्रकार
 
                            दर(रु/गोणी)
  उत्पादन खर्च # विक्री किंमत सबसिडी
युरिया ७१७ ## २६६.५० ४५०
१८:४६:०० १७२०.१०  १२०० ५२०.१०
१०:२६:२६ १५७२ ११३५ ४३६.९५
१२:३२:१६ १५८६ ११४० ४४५.८५
२०:२०:१३ १२८९ ९३० ३५८.८५

 

रासायनिक खते ही रासायनिक अभिक्रियेद्वारे कारखान्यात बनविली जातात. नैसर्गिक वायूपासून हायड्रोजन, कार्बन व हवेतील नत्र शोषून युरिया बनवला जातो. १०:२६:२६, १८:४६:०, १२:३२:१६, २०:२०:०:१३ हे संयुक्त दाणेदार खते महागडे, आयात केलेले फोस्फोरिक असिड, नत्र व पालाश वापरून तयार केले जातात. यांचा उत्पादन खर्च खूप जास्त आहे. वर दिलेल्या तक्त्यात उत्पादन खर्च, शेतकऱ्यांना विक्री किंमत व सबसिडी दिली आहे. यावरून रासायनिक खते महाग असून, त्यांचा काटकोर वापर करणे किती गरजेचे आहे याचा अंदाज येईल.

सध्या शासन अन्नघटक आधारित अनुदान (न्यूट्रियंट बेसड् सबसिडी) योजना राबवत आहे. रासायनिक खताच्या गोणीमध्ये किती अन्नद्रव्ये आहेत, त्यानुसार अनुदान दिले जाते. युरिया वगळता सर्व खतांची विक्री किंमत कंपन्या उत्पादन खर्चावर आधारित ठरवतात. मात्र युरिया हा अत्यावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत असल्याने त्याची विक्री किंमत सरकार ठरवते. देशातील एकूण खत वापराच्या सुमारे ५५ टक्के फक्त युरिया आहे. लोकप्रियतेसाठी शासनाने गेल्या २० वर्षांत युरियाचे भाव रुपये २९६ प्रति गोणीच्या वर वाढू दिले नाहीत मात्र १०:२६:२६ किंवा १८:४६:०० या संयुक्त खतांची किंमत ११०० ते १२५० प्रति गोणी इतकी वाढली आहे. यामुळे युरियाची ओळख स्वस्त खत म्हणून झाली आणि त्याचा अतिरिक्त वापर होत आहे. युरियामध्ये फक्त नत्र असते जे पिकाची कायिक वाढ करते, पिकाला लुसलुशीतपणा, गडद हिरवा रंग आणते. मुळाचा विकास, फुले, फळे लागण्यासाठी व गुणवत्ता युक्त उत्पादन घेण्यासाठी स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये अत्यावश्यक आहेत. मात्र चुकीच्या धोरणामुळे संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनालाच खीळ बसली असून, युरियाचा अतिरिक्त वापर जमिनीच्या आरोग्याला धोका निर्माण करत आहे.

युरियामध्ये ४६ टक्के नत्र असते. नत्र अत्यंत चंचल घटक असून, माती व ओलाव्याच्या संपर्कात आल्यानंतर लगेचच विघटित होतो. युरिया मुळांच्या कक्षेत असेल तर मुळे शोषून घेतात, जास्त ओलावा असेल तर जमिनीत झिरपून जाते आणि जमिनीवर टाकला तर हवेत उडून जातो. पिकाला दिलेल्या एकूण युरियापैकी फक्त २५-३० टक्के नत्र मिळते बाकीचे वाया जाते. दुर्दैवाने युरिया पेरून न देता जमिनीवर फेकून दिल्या जातो. त्यामुळे उपलब्धतेची टक्केवारी आणखी घसरते. युरियाचा अंश जमिनीत, पाण्याच्या साठ्यात गेल्याने प्रदूषण वाढते आहे. युरियाची कार्यक्षमता व पिकाला उपयुक्तता वाढवण्यासाठी दाणेदार युरिया आणि निम लेपित युरिया तयार केला आहे. दाणेदार युरियाला फॉर्म अल्डेहाइडचा लेप दिला जातो त्यामुळे तो हळूहळू विरघळतो व पिकाला जास्त कालावधीसाठी उपलब्ध होतो. आता १०० टक्के युरिया हा नीम लेपित करूनच शेतकऱ्यांना दिला जात आहे. ०.०३ टक्के निंबोळी तेलाचा लेप युरिया विरघळण्याची क्रिया थंडावते शिवाय नैसर्गिक कीडरोधक म्हणूनही कार्य करते. युरिया वापराचे प्रमाण कमी व्हावे म्हणून आता ४५ किलोचीच युरियाची गोणी अशी क्लृप्ती केली आहे. शेतात युरिया टाकताना एकरी अमुक गोण्यांच्या हिशोबाने शेतकरी वापर करतात. ५० किलोऐवजी ४५ किलोच्या तेवढ्याच गोण्या जरी शेतकऱ्याने वापरल्या तरी १० टक्के युरियाची बचत होऊ शकते हा योजना कर्त्यांचा होरा आहे. पण ४५ किलोच्या गोणीचे दर ही कमी केले असून, ते रुपये २६६ प्रतिगोणी आहे. आधीच स्वस्त युरिया इतर खतांच्या तुलनेत आणखी स्वस्त वाटून जास्त वापर झाल्यास नवल नाही. 

अनुदानित खतांचे प्रभावी वितरण व्यवस्थापन करण्यासाठी आता प्रत्येक किरकोळ विक्री केंद्रावर ‘पॉइंट ऑफ सेल (पॉश) मशिनद्वारे खत विक्री चालू झाली आहे. या व्यवस्थेत खत कारखान्यात उत्पादित झाल्यापासून शेतकऱ्याने खरेदी करेपर्यंतचे ऑनलाइन ट्रॅकिंग होणार आहे. यामुळे खताच्या चोरट्या व्यापाराला चाप बसला आहे. देशात प्रत्येक तालुका व गाव स्तरावरील विक्रेत्याकडे आज किती खत शिल्लक आहे ही आकडेवारी www.mfms.nic.in या वेबसाइटवर उपलब्ध असून, मागणी आणि पुरवठा याची सांगड घालून शाश्वत खतपुरवठा करणे आता सहज शक्य आहे. 
शेतकरी स्तरावर खत वापरण्याच्या पद्धतीमध्ये बदल होत आहे. सूक्ष्म अन्नद्रव्ये व विद्राव्य खतांचा वापर वाढत आहे. पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेता ठिबक सिंचनाशिवाय पर्याय नाही. मात्र ठिबक फक्त पाणी देण्यासाठी वापरणारे शेतकरी अधिक आहेत. पाण्यात विरघळणारी खते व्हेंचुरी किंवा खत टाकी वापरून ठिबकद्वारे दिल्यास त्यांची कार्यक्षमता ८५-९० टक्के वाढते. शेतकऱ्यांनी  अनुदानाच्या मागे न लागता नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून दर्जेदार उत्पादन आणि त्याची विक्री व्यवस्था उभारण्याची गरज आहे.  
ASHOK SAKALE : ७७९८०९१२८८
(लेखक इफकोचे क्षेत्र अधिकारी आहेत.)

इतर अॅग्रो विशेष
चांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...
धुराडी २० ऑक्टोबरपासून पेटणारमुंबई : साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप...
राज्याच्या तापमानात वाढपुणे : राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस थांबला...
मिरचीच्या आगारात सुधारित तंत्राचा वापरअौरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काही तालुके मिरचीचे...
देशात तब्बल ६८ टक्के दुधात होते भेसळपुणे : देशात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८...
राज्य बँकेवरील जिल्हा बँकांचे...मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक...
फुलशेतीने दिली आर्थिक साथहिंगोली जिल्ह्यातील तपोवन (ता. औंढा नागनाथ)...
जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...
प्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...
मुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...
ऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई :  राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...
मॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...
सेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...
‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...
महसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...