agriculture news in marathi, agrowon, special article on sapota management | Agrowon

चिकू बागेत आच्छादन, पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे
विनायक बारी
मंगळवार, 23 जानेवारी 2018

चिकूचे झाड जस जसे जुने होते त्याप्रमाणे त्याचा 
 आकारदेखील वाढतो. मोठ्या झाडाच्या खालच्या बाजूच्या जुन्या फांद्या छाटलेल्या असतील तर झाडाची चांगली वाढ होऊन मोठी फळे मिळतात. मात्र बागेत झाडे जर दाटीने वाढली असतील तर त्यांना योग्य सूर्यप्रकाश मिळत नाही. त्या झाडाच्या फांद्या उंच वाढतात. परिणामी फळे कमी प्रमाणात लागतात. फांद्या उंच गेल्यामुळे फळे काढणे अवघड जाते. परिणामी चांगली फळे वाया जातात. 

चिकूचे झाड जस जसे जुने होते त्याप्रमाणे त्याचा 
 आकारदेखील वाढतो. मोठ्या झाडाच्या खालच्या बाजूच्या जुन्या फांद्या छाटलेल्या असतील तर झाडाची चांगली वाढ होऊन मोठी फळे मिळतात. मात्र बागेत झाडे जर दाटीने वाढली असतील तर त्यांना योग्य सूर्यप्रकाश मिळत नाही. त्या झाडाच्या फांद्या उंच वाढतात. परिणामी फळे कमी प्रमाणात लागतात. फांद्या उंच गेल्यामुळे फळे काढणे अवघड जाते. परिणामी चांगली फळे वाया जातात. 

  •  झाडाला चारही बाजूने भरपूर सूर्यप्रकाश मिळाला तर त्या झाडाची वाढ आणि फळधारणाही चांगली होते. झाडे जवळ जवळ असतील, एका झाडाच्या फांद्या दुसऱ्या झाडामध्ये घुसतात. अशा फांद्या योग्य पद्धतीने कापाव्यात.२५ वर्षांपुढील जुन्या बागेमध्ये तज्ज्ञांच्या सल्याने ऑक्टोबर ते मे महिन्याच्या दरम्यान अति वाढलेल्या फांद्यांची शास्त्रीय पद्धतीने छाटणी करावी.
  •  चिकू बागेमध्ये पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन आणि योग्य प्रमाणात झाडांना सूर्यप्रकाश मिळणे महत्त्वाचे आहे. पालापाचोळ्याचे आच्छादन करावे. बागेची स्वच्छता ठेवावी. 
  •  झाड साधारण २५ फूट उंचीपेक्षा जास्त वाढले असेल तर त्याचे शेंड्याकडील टोक कापावे. त्यामुळे झाडाची उंची मर्यादित ठेवता येते.
  •  काही बागांमध्ये जुनी लागवड आणि नवीन लागवड असते. जुन्या बागेमध्ये झाडाच्या खालच्या बाजुच्या वेड्या वाकड्या फांद्या कापाव्यात. बागेत सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोचावा यासाठी शास्त्रीय पद्धतीने छाटणी करावी. नवीन बागेतील झाडाखालील गवत कापून त्याचे आळ्यात आच्छादन करावे. यामुळे ओलावा टिकून रहातो. बागेत लहान पॉवर टिलरने हलकी मशागत केल्याने जमिनीत हवा खेळती राहाते. त्याचा झाडांच्या वाढीसाठी फायदा होतो.
  • चिकू हे झाड वर्षभर हिरवेगार असते. वर्षभर मोठी फळे, लहान फळे, नवीन कळ्या येणे सुरूच असल्यामुळे बागेमध्ये पुरेसा सूर्यप्रकाश आणि जमिनीमध्ये ओलावा असावा.
  • शक्‍यतो ठिबक सिंचनाने बागेला पाणी द्यावे. साधारण २५ ते ३० वर्षाच्या झाडाला बुंध्याच्या चार फूट त्रिज्याने सभोवती चार ठिकाणी ड्रिपर ठेवावे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यामध्ये साधारण १० तासामध्ये प्रत्येक ड्रिपरमधून १५ ते २० लिटर पाणी झाडांना मिळेल असे ६० ते ७० लिटर पाणी आठ ते दहा दिवसांनी द्यावे. मार्च ते जून महिन्याच्या काळात जास्त तापमान असते. यामुळे चार ते पाच दिवसांच्या दरम्यान जमिनीचा ओलावा तपासावा.
  • खत व्यवस्थापन करताना जेथे ड्रीपर ठेवले आहेत, त्या जागी वर्षातून ३ वेळा विभागून २५ ते ३० किलो गांडूळ खत, ७ ते १० किलो निंबोणी पेंड घ्यावी. दर दोन महिन्यातून एकदा दहा लिटर जिवामृत घ्यावे. ज्यामुळे चिकू झाडाला लागणारी खते आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात उपलब्ध होतील.

संपर्क  ः विनायक बारी, ९४२३३५८०७८
 (लेखक महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाचे अध्यक्ष आहेत.)

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
पाणी अमूल्य असल्याने जनजागृतेची गरज ः...कोल्हापूर : ‘‘पाण्यासाठी व्यापक जनजागृती होणे...
येवला तालुक्यात हंडाभर पाण्यासाठी वणवणनाशिक : कमी पावसामुळे येवला तालुक्यात पाणीटंचाई...
हवामानविषयक समस्यांमुळे शेतीवर परिणाम ः...परभणी ः जागतिक तापमान वाढ, पावसातील अनियमितता,...
मतदार यादीत वाढला महिलांचा टक्कानगर : निर्दोष मतदार यादी तयार करण्यासाठी जिल्हा...
तापमानातील चढ-उताराचा अंजीर उत्पादकांना...परभणी : तापमानातील चढ-उतारामुळे अंजिराची फळे...
गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक कमी; दर वाढलेपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
यंदा मतदानात महिला पुरुषांना मागे टाकणारनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये पुरुषांपेक्षा...
शक्तिशाली उल्कापातापासून बचावली पृथ्वीपुणे ः अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्था ‘नासा’...
संत्रा बागांना उरला केवळ टॅंकरचा आधारअमरावती : संत्रा बागा जगविण्यासाठी...
मराठवाड्याच्या पाण्यासाठी फक्त बोलून...परभणी : केवळ जायकवाडीच्या हक्काच्या...
राज्यात चार हजाराने मतदान केंद्रे वाढलीमुंबई  : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात...
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीचा...मुंबई : गेले सहा महिने विविध समविचारी पक्षांशी...
चंद्रपूर : बांगडेंच्या उमेदवारीने...चंद्रपूर : गेल्या पंधरवाड्यापासून चंद्रपूर...
प्रियांका गांधींचा नागपुरात होणार रोड शोनागपूर ः काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ...
अमरावती लोकसभेसाठी होईल दुहेरी लढतअमरावती : शिवसेनेकडून दोनदा संसदेत गेलेल्या...
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...