agriculture news in Marathi, agrowon, Speed ​​up water conservation works in villages which in the water cup competition | Agrowon

वॉटर कप स्पर्धेतील गावांमध्ये जलसंधारणाची कामे गतिमान करा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 एप्रिल 2018

वाशीम  : वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांमध्ये विविध शासकीय यंत्रणांमार्फत करण्यात येणारी जलसंधारणाची कामे गतिमान करण्याच्या व जलसंधारणाच्या कामांसाठी ग्रामस्थांना संपूर्ण सहकार्य करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केल्या. 

वाशीम  : वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांमध्ये विविध शासकीय यंत्रणांमार्फत करण्यात येणारी जलसंधारणाची कामे गतिमान करण्याच्या व जलसंधारणाच्या कामांसाठी ग्रामस्थांना संपूर्ण सहकार्य करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केल्या. 

मंगरूळपीर व कारंजा तालुक्यातील स्पर्धेत सहभागी गावांच्या सरपंचांची बैठक आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी ते बोलत होते. बैठकीला रोहयोचे उपविभागीय अधिकारी सुनील कोरडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, कारंजाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, कारंजाचे तहसीलदार सचिन पाटील, मंगरूळपीरचे तहसीलदार वैशाख वाहूरवाघ, कारंजाचे तालुका कृषी अधिकारी समाधान धुळधुळे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी मिश्रा म्हणाले, वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांना शासनाने जलसंधारणाच्या कामांसाठी प्रत्येकी १.५० लक्ष रुपये उपलब्ध करून दिले आहेत. या स्पर्धेत सहभागी असलेल्या ज्या गावांमध्ये लोकसहभागातून कामे झाली आहेत, अशा गावांनी शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे कामांचे प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावेत. यामध्ये शासनाने मान्यता दिलेल्या उपचार, कामांचा समाविष्ट असावीत. 

स्पर्धेत सहभागी गावांमध्ये विविध यंत्रणांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दीपक कुमार मीना म्हणाले, वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून एकत्र येऊन गाव पाणीदार बनविण्याची चांगली संधी गावकऱ्यांना मिळाली आहे. सर्वांनी आपल्या गावातील दुष्काळ हटविण्याचा संकल्प करावा. या कामांमध्ये प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहील. 

इतर बातम्या
खानदेशात दुष्काळ निवारणात अडचणीजळगाव : दुष्काळी व पिण्याच्या पाण्याची तीव्र...
सरपंच परिषदेची ताकद दाखवू नगर  ः सरकार शहरांचे पोषण करण्यासाठी...
संत्रा, मोसंबी बागांचे नव्याने सर्वेक्षणनागपूर : जिल्ह्यातील काटोल, नरखेड व कळमेश्‍वर...
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
‘अक्कलपाडा’चे पाणी न पोचल्याने...धुळे : अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदीत...
नानेगावकरांचा ग्रामसभेतून प्रस्तावित...नाशिक : नाशिक पुणे प्रस्तावित रेल्वे महामार्ग...
सोलापूर जिल्ह्यातील खरीप नुकसानीपोटी ३८...सोलापूर : खरीप हंगामातील नुकसानीपोटी जिल्ह्यातील...
नाशिकच्या धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठानाशिक : यंदा कमी झालेल्या पावसामुळे धरणातील...
द्राक्ष बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांची...पांगरी, जि. सोलापूर : बार्शी तालुक्यातील पूर्व व...
नागालँड राज्य बँक राबविणार पुणे जिल्हा...पुणे ः शेती, शेतीपूरक व्यवसायासाठी पुणे जिल्हा...
सातारा जिल्ह्यात ऊस गाळप वेगातसातारा ः जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात सुरू...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
पुणे विभागात दहा लाख हेक्टर क्षेत्र...पुणे ः पाणी टंचाईमुळे रब्बीच्या पेरण्यांच्या...
शेतकरी सन्मान योजनेसाठी सात हजार...उस्मानाबाद ः तालुक्‍यातील २४ गावांतून सात हजार...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
वाहतूक शुल्कासाठी प्रमाणपत्राची अट नको...पुणे : निर्यातीचा कोटा पूर्ण करणाऱ्या साखर...
राष्ट्रीय जल पुरस्कारांत महाराष्ट्र...मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये...