agriculture news in Marathi, agrowon, The speed of the transaction of the e-name system | Agrowon

ई-नाम प्रणालीनुसार व्यवहाराला गती
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 मार्च 2018

औरंगाबाद : अनेक अडथळ्यांनंतर आता औरंगाबाद बाजार समितीमध्ये ई-नाम प्रणालीनुसार शेतमाल खरेदी-विक्रीच्या व्यवहाराला गती मिळाली आहे. या प्रक्रियेमुळे बाजार समितीमधील शेतमालाची आवक काहीशी मंदावली असली तरी ई-प्रणाली प्रक्रिया स्वीकारण्याचा प्रश्न मार्गी लागल्याचे दिसत आहे. 

औरंगाबाद : अनेक अडथळ्यांनंतर आता औरंगाबाद बाजार समितीमध्ये ई-नाम प्रणालीनुसार शेतमाल खरेदी-विक्रीच्या व्यवहाराला गती मिळाली आहे. या प्रक्रियेमुळे बाजार समितीमधील शेतमालाची आवक काहीशी मंदावली असली तरी ई-प्रणाली प्रक्रिया स्वीकारण्याचा प्रश्न मार्गी लागल्याचे दिसत आहे. 

पहिल्या टप्प्यात ई-नाम प्रणाली लागू केलेल्या औरंगाबाद बाजार समितीमध्ये उद्‌घाटनाला थोड्याबहुत खरेदीनंतर अडथळा आला होता. हा अडथळा सुटेल की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता; परंतु बाजार समिती व्यवस्थापन, पदाधिकारी, व्यापारी आदींच्या बैठकांच्या खलबतानंतर अखेर ई-नाम प्रणालीनुसार शेतमाल खरेदीच्या प्रक्रियेत सर्वांचा सहभाग मिळणे सुरू झाले. १२ मार्चला ई-नाम प्रणाली बाजार समितीमध्ये कार्यान्वित झाल्यापासून जवळपास साडेसातशे शेतकऱ्यांचा ३३६१ क्‍विंटल शेतमाल बाजार समितीमध्ये आला. त्यापैकी १ हजार ३५९ क्‍विंटल शेतमालाची ई-नाम प्रणालीनुसार खरेदी झाली. या प्रणालीनुसार शेतमालाच्या खरेदीची उलाढाला २५ लाखांवर पोहाेचली आहे.

शेतमालाच्या दोन दिवसांतील व्यवहाराच्या आकडेवारीनुसार बाजरीची ३४.५३ क्‍विंटल, हरभऱ्याची १८.१८ क्‍विंटल, ज्वारीची ३३८.२५ क्‍विंटल, मकाची ९६. ८० क्‍विंटल, तुरीची २१. ५१ क्‍विंटल तर गव्हाची ४६५.०९ क्‍विंटल खरेदी झाली. कार्यरत असलेल्या सर्व अडत्यांनी ई-नाम प्रणालीनुसार खरेदीत सहभाग नोंदविल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. तूर्त मालाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना चेकद्वारे पैसे दिले जात आहेत.

दोन दिवस व्यवहार बंद असताना आता थेट मालाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरच पैसे जमा होण्यासाठी आवश्‍यक ती पावले या दोन दिवसांत सर्व माहिती संकलित करून पावले उचलली जाणार असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. गत दोन दिवसांत बाजार समितीमध्ये बाजरीची १३.५० क्‍विंटल, हरभऱ्याची ६९.५० क्‍विंटल, ज्वारीची ३०२.५० क्‍विंटल, मकाची ३८ क्‍विंटल, तुरीची २१.५१ क्‍विंटल तर गव्हाची ४५१.५० क्‍विंटल आवक झाल्याचे ई-नाम प्रणालीचे ऑनलाइन आकडे सांगतात. 

शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यांच्या शेतमालाचे पैसे थेट पैसे जमा व्हावेत, यासाठी आमचे डाटा फीडिंगचे काम सुरू आहे. लवकरच हे काम पूर्ण होऊन शेतकऱ्यांना विकलेल्या मालाचे पैसे लागलीच मिळायला लागले की बरेच प्रश्न सुटतील. 
राधाकिसन पठाडे, सभापती, कृष उत्पन्न बाजार समिती औरंगाबाद. 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...