agriculture news in Marathi, agrowon, Start the auction of the farm Commodity, Otherwise, we will confiscate the plots | Agrowon

शेतमालाचे लिलाव सुरू करा, अन्यथा गाळे, भूखंड जप्त करू
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 10 मे 2018

नाशिक  : व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना रोखीने, आरटीजीएस, तसेच एनईएफटीद्वारे रक्कम देण्यास नकार दिल्यामुळे नांदगाव येथे आठवड्यापासून शेतमालाचे लिलाव बंद आहेत. याबाबत तीन दिवसांत खुलासा करावा, लिलाव सुरू करावेत, अन्यथा गाळे, गोदाम व भूखंड जप्त करू, अशा नोटिसा बाजार समितीने २१ व्यापाऱ्यांना दिल्या आहेत.

नाशिक  : व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना रोखीने, आरटीजीएस, तसेच एनईएफटीद्वारे रक्कम देण्यास नकार दिल्यामुळे नांदगाव येथे आठवड्यापासून शेतमालाचे लिलाव बंद आहेत. याबाबत तीन दिवसांत खुलासा करावा, लिलाव सुरू करावेत, अन्यथा गाळे, गोदाम व भूखंड जप्त करू, अशा नोटिसा बाजार समितीने २१ व्यापाऱ्यांना दिल्या आहेत.

नांदगाव बाजार समितीसह न्यायडोंगरी व बोलठाण उपबाजार समितीतील ८९ व्यापारी शेतीमाल खरेदी केल्यानंतर पुढील तारखांचे धनादेश देत असल्याने शेतकऱ्यांना पैसे त्वरित मिळत नव्हते, याबाबतच्या तक्रारीनंतर  जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांना जिल्हा उपनिबंधकांनी बरखास्तीच्या नोटिसा दिल्या. ही नामुष्की आपल्यावर येऊ नये म्हणून या बाजार समितीने व्यापाऱ्यांना धनादेशाऐवजी रोखीने किंवा आरटीजीएस, तसेच एनईएफटीद्वारे पैसे देण्यास सांगितले, मात्र व्यापाऱ्यांनी नकार दिल्याने समितीने २ मेपासून लिलाव बंद ठेवले आहेत. ३ मे पासून न्यायडोंगरी व बोलठाण उपबाजारात व्यापाऱ्यांनी सहभाग घेतल्याने लिलाव सुरू झाले. मात्र, नांदगावला सहा दिवस उलटूनही लिलाव ठप्पच आहेत. 

अखेर आज बाजार समितीने या २१ व्यापाऱ्यांकडूना बुधवारपर्यंत खुलासा मागविला आहे, तो न आल्यास समितीने दिलेले गाळे, भूखंड, गोदामे जप्त का करण्यात येऊ नयेत, अशी विचारणा करण्यात आल्याची माहिती सचिव ए. पी. खैरनार यांनी दिली. व्यापाऱ्यांनी आडमुठेपणा कायम ठेवल्यास त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील.
 

इतर ताज्या घडामोडी
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...