agriculture news in Marathi, agrowon, Starting the second recurrence of the Tembhu Irrigation Scheme | Agrowon

टेंभू उपसा सिंचन योजनेचे दुसरे आवर्तन सुरू
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 17 एप्रिल 2018

सांगली  ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे दुसरे आवर्तन सुरू झाले आहे. या योजनेच्या लाभ क्षेत्रातील कडेगाव, खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि सांगोला तालुक्‍यांसाठी हे आवर्तन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

टेंभू उपसा सिंचन योजनेचे पहिले आवर्तन सुमारे एक ते दीड महिना सुरू होते. त्यानंतर योजना बंद करण्यात आली होती. गेल्या चार दिवसांपूर्वी या योजनेचे दुसरे आवर्तन सुरू झाल्याने शेतकऱ्यांना फायदा होण्यास मदत होईल. सद्यःस्थितीला  सुमारे १२ हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

सांगली  ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे दुसरे आवर्तन सुरू झाले आहे. या योजनेच्या लाभ क्षेत्रातील कडेगाव, खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि सांगोला तालुक्‍यांसाठी हे आवर्तन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

टेंभू उपसा सिंचन योजनेचे पहिले आवर्तन सुमारे एक ते दीड महिना सुरू होते. त्यानंतर योजना बंद करण्यात आली होती. गेल्या चार दिवसांपूर्वी या योजनेचे दुसरे आवर्तन सुरू झाल्याने शेतकऱ्यांना फायदा होण्यास मदत होईल. सद्यःस्थितीला  सुमारे १२ हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

टेंभू उपसा सिंचन योजनेचे दुसरे आवर्तन सुरू झाल्याने ऊस पिकासह भाजीपाला पिकांना जीवदान मिळणार आहे, तर टंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होणार असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे, तर आज टेंभूचे पाणी शाळगाव तलावात दाखल झाले. सध्या सर्वत्र टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी पिकांची अवस्था बिकट झाल्याने टंचाईच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी टेंभू उपसा जलसिंचन योजनेतून तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी केली होती. 

शेतकऱ्यांच्या मागणीवरून टेंभूचे उन्हाळी हंगामासाठी पहिले आवर्तन सुरू करण्यात आले. त्यासाठी टप्पा क्र. १ (अ) येथील १९५० अश्‍वशक्तीचे सतरा पंप व टप्पा क्र. १ (ब) येथील २००० अश्‍वशक्तीचे सतरा पंप सुरू करण्यात आले आहेत.

सध्या हे पाणी शिवाजीनगर येथील लघुपाटबंधारे तलावात पोचले आहे. त्यानंतर शनिवारी (ता. १४) टप्पा क्र. २ येथील १४०० अश्‍वश्क्‍तीचे दोन पंप सुरू करून सर्वप्रथम कामथी कालव्यात पाणी सोडण्यात आले. ते कामथी कालव्यातून कामथी, शिवाजीनगर, रेणूशेवाडी, विहापूर, शाळगाव, करांडेवाडी, बोंबाळेवाडीपर्यंत १५ कि.मी.पर्यंत असे शाळगाव तलावात पोचले आहे. हा तलाव कोरडा पडला होता; परंतु या तलावात पाणी सोडल्यामुळे येथील पाणीटंचाईची तीव्रता कमी होणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

कामथी कालव्याचे लाभक्षेत्र भिजल्यानंतर सुर्ली कालव्यात पाणी सोडले जाणार असून, या कालव्यातून हे पाणी सुर्ली, खंबाळे औंध, नेर्ली अपशिंगे, कोतवडे, कडेगाव असे २२ कि.मी.पर्यंत दिले जाईल. त्यानंतर हे पाणी कडेगाव लघुपाटबंधारे तलावात सोडण्यात येणार आहे, तर मुख्य जोड कालव्यातून टेंभूचे पाणी हिंगणगाव बुद्रुक तलावात पोचले आहे. त्यानंतर ते पुढे माहुलीकडे सोडण्यात येणार आहे.

इतर बातम्या
जळगावच्या पालकमंत्र्यांचा दौरा पुन्हा...जळगाव : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा...
खानदेशातील पाणीटंचाई गंभीरजळगाव : खानदेशात पाणीटंचाई दिवसेंदिवस बिकट होत...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
खानदेशात अनियमित वीजपुरवठाजळगाव : खानदेशात जलपातळी सातत्याने घटत आहे....
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
नाशिक येथे साकारणार 'देवराई' नाशिक : दुर्मीळ देशी प्रजातींच्या वृक्षांचे...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...