राज्यातील ३५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर १३ हजार कोटी जमा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात कर्जमाफीअंतर्गत राज्यातील ३५ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर आतापर्यंत १३ हजार कोटी रुपये जमा केले असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी (ता. ६) विधानसभेत दिली. या वेळी मंत्री सुभाष देशमुख आणि अजित पवार यांच्यात शाब्दिक कलगीतुरा रंगला.  

विरोधी पक्षाच्या वतीने नियम २९३ अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना श्री. देशमुख बोलत होते. या वेळी ते म्हणाले, "राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांमध्ये पात्र अपात्र शेतकरी आपण ठरवले आहेत. निकषानुसार ७७ लाख २९ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन फॉर्म भरले आहेत.

शेतकऱ्यांचे कौतुकच आहे. शेतकऱ्यांनी भरलेली माहिती बँकेला न देता, बँकेकडून यादी मागून घेतली. पहिल्या यादीनुसार ५५ लाख शेतकऱ्यांची यादी बँककडे दिली आहे. ४६ लाख ५२ हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला सरकारने संमती दिली आहे. माझ्या माहितीनुसार २००८ ची कर्जमाफी ही निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून केली होती. मात्र, आम्ही कर्जमाफी शेतकरी डोळ्यांसमोर ठेवून केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com