agriculture news in Marathi, agrowon, The state should contribute Rs. 55 to the sugar factories | Agrowon

राज्याने साखर कारखान्यांना प्रतिटन ५५ रुपये मदत करावी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 30 मे 2018

मुंबई : बाजारात साखरेचे कोसळलेले भाव आणि विक्रमी साखर उत्पादनामुळे अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने केंद्राप्रमाणे कारखान्यांना प्रतिटन ५५ रुपयांची मदत करावी. तसेच सरकारने कर्जासाठी थकहमी दिलेल्या कारखान्यांचे व्याज स्थगित करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाने सोमवारी (ता. २८) केली. 

मुंबई : बाजारात साखरेचे कोसळलेले भाव आणि विक्रमी साखर उत्पादनामुळे अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने केंद्राप्रमाणे कारखान्यांना प्रतिटन ५५ रुपयांची मदत करावी. तसेच सरकारने कर्जासाठी थकहमी दिलेल्या कारखान्यांचे व्याज स्थगित करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाने सोमवारी (ता. २८) केली. 

वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) परिषदेची बैठक लवकरच होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर जीएसटी, तसेच व्हॅटशी संबंधित साखर उद्योगाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित बैठक पार पडली. या बैठकीत संघाने साखर उद्योगाला भेडसावत असलेल्या प्रश्नांवर सादरीकरण केले. त्या वेळी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे एक शिष्टमंडळ दिल्ली दरबारी न्यावे आणि साखर उद्योगाच्या प्रश्नांची तड लावावी, असाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.

बैठकीत साखर कारखान्यांना आकारण्यात येणारा सेस, व्हॅट आणि जीएसटी अशा दुहेरी कराची आकारणी या मुद्द्यांवर चर्चा झाली. अनेक साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. ज्या साखर कारखान्यांनी एफआरपीच्या ७० टक्क्यांपर्यंत पैसे शेतकऱ्यांना दिले आहेत, अशा कारखान्यांवर रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेटसाठी (आरआरसी) कारवाई करू नये. तसेच कारखान्यांकडे कर्जाची मुद्दल देण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे सरकारने कर्जावरील व्याज वसुलीला स्थगिती द्यावी, अशी मागणी सरकारकडे करण्यात आल्याची माहिती राज्य साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनी दिली. कारखान्यांवरील कर्जाची पुनर्बांधणी करावी. साखरेच्या निर्यातीसाठी अनुदान द्यावे. नाबार्ड, रिझर्व्ह बँकेशी संबंधित मुद्द्यांवर मार्ग काढण्यात यावा, अशा मागण्या बैठकीत मांडण्यात आल्याचे खताळ म्हणाले.

दरम्यान, नितीन गडकरी यांनी साखर कारखान्यांनी उसाच्या रसापासून इथेनॉलनिर्मितीवर भर द्यावा, अशी सूचना केली. तर ऊस गाळपाचा परवाना देताना कोणतेही अडथळे आणले जाऊ नयेत, असे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी केंद्र सरकारने साखरेसाठी किमान आधारभूत मूल्य निश्चित केल्यास अनेक प्रश्न निकाली निघतील, असे सांगितले. 

इतर ताज्या घडामोडी
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात पंचवीस...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्याच्या...
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...