agriculture news in Marathi, agrowon, The state's irrigation area on 40 percent | Agrowon

काँग्रेस, राष्ट्रवादीची सिंचन स्मारके पूर्ण करणार : गडकरी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 30 मे 2018

मुंबई  : गेल्या ४८ वर्षांत राज्यातील सिंचनाची परिस्थिती १८ टक्क्यांवर गेली नाही, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस सरकारने ४० टक्क्यांवर सिंचन क्षेत्र नेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच कॉँग्रेस राष्ट्रवादीने टेंभूपासून ते गोसीखुर्दपर्यंत अनेक योजना अपूर्ण अवस्थेत ठेवल्या आहेत, ही कॉँग्रेसची अर्धवट स्मारके असून, ती आपण पूर्ण करणार असल्याचे केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. 

मुंबई  : गेल्या ४८ वर्षांत राज्यातील सिंचनाची परिस्थिती १८ टक्क्यांवर गेली नाही, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस सरकारने ४० टक्क्यांवर सिंचन क्षेत्र नेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच कॉँग्रेस राष्ट्रवादीने टेंभूपासून ते गोसीखुर्दपर्यंत अनेक योजना अपूर्ण अवस्थेत ठेवल्या आहेत, ही कॉँग्रेसची अर्धवट स्मारके असून, ती आपण पूर्ण करणार असल्याचे केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. 

मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने ते (ता. २९) पत्रकार परिषदेत बोलत होते. सिंचनासाठी सरकारने ५ हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचे गडकरी यांनी या वेळी सांगितले. या वेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारने गेल्या चार वर्षांत केलेल्या कामांची जंत्री वाचून दाखवली. वाहतूक विभागामार्फत कोणकोणत्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. याची माहिती त्यांनी दिली. मुंबई ते दिल्ली असा एक्सप्रेस हायवे तयार करण्यात येणार असून, हा रस्ता आदिवासी पट्ट्यातून जाणार आहे. त्यामुळे आदिवासींचा विकास होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गेल्या चार वर्षांत कोट्यवधी लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला असून, जास्तीत जास्त परदेशी गुंतवणूक आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी जलवाहतुकीसंदर्भात बोलताना ७५०० किलोमीटर लांबीच्या जलवाहतुकीसाठी विविध प्रकल्प राबवण्यात येत आहेत. तसेच गंगा शुद्धीकरण प्रकल्पाचे सत्तर टक्के काम झाले असून, यापुढे गंगा नदीवर कोणत्याही नव्या वीज प्रकल्पास मान्यता देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. 

साडेतीन लाखांत घर देणार
नागपुरात खासदार प्रकल्प म्हणून आपण गृहप्रकल्प उभारत असून, या प्रकल्पातील घर भिकाऱ्यालाही खरेदी करता यावे, असा आपला मानस आहे. त्यासाठी ४६० चौ. फुटांचे हे घर केवळ साडेतीन लाख रुपयांत उपलब्ध करून देत असून सोफासेट, वीज, एलईडी, डबलबेड, गरमपाणी या गोष्टी मोफत देणार असल्याचे आश्वासन गडकरी यांनी या वेळी दिले.

 शिवसेनेशी मी चर्चा करणार नाही 
शिवसेनेशी झालेली युती ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झालेली आहे. त्यामुळे युतीत विघ्न येण्याचा प्रश्न नाही, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. शिवसेना आणि भाजप यांचे नाते तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना, असे असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र युतीबाबत उद्धव ठाकरेंशी आपण चर्चा करणार नाही, असे त्यांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...
उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : मागील आठवड्यात झालेला पूर्वमोसमी वादळी...
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...