गटसचिवांचा संप मिटला
मनोज कापडे
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

कृषी पतपुरवठा सोसायट्यांच्या व्यवस्थापन खर्चासाठी १४२ कोटी रुपये देण्याची तयारी सहकार खात्याने दाखविली होती. मात्र, निधी प्रत्यक्षात रुजू झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याची भूमिका गटसचिवांनी ठेवली होती.

पुणे ः राज्यातील गटसचिवांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेले काम बंद आंदोलन अखेर मागे घेतले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे रखडलेले प्रस्ताव तयार होण्याला वेग मिळेल, अशी माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली.

कर्जमाफीच्या कालावधीतच राज्यातील कृषी पतपुरवठा सोसायट्यांना व्यवस्थापन खर्च मिळालेला नाही. तसेच अनेक महिन्यांपासून गटसचिवांचे पगार झालेले नाहीत. त्यामुळे २७ जूनपासून राज्यातील गटसचिवांनी संप सुरू केला होता.

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी गटसचिवांशी चर्चा केल्यानंतर थेट शिवसेना भवनात आम्हाला नेले. तेथे शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी वीस मिनिटे चर्चा केली.

तुमच्या मागण्यांचा पाठपुरावा मी करेन, पण कर्जमाफीचे प्रशासकीय काम तुम्ही मार्गी लावावे, असे ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे आम्ही आंदोलन समाप्त केले, अशी माहिती गटसचिवांचे नेते विश्वनाथ निकम यांनी दिली.

संप मिटल्यामुळे आता ६६ रकान्यांमधील कर्जमाफीची माहिती गटसचिवांकडून तातडीने भरली जाणार आहे. सॉफ्टवेअरमध्ये माहिती भरणे तसेच पात्र थकबाकीदारांना अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन करणे अशी कामेदेखील सुरू होतील. यामुळे कर्जमाफीच्या रखडलेल्या प्रक्रियेला वेग येईल, असे सहकार विभागाचे म्हणणे आहे.

वेतन दरमहा चालू राहणार
गटसचिवांचे वेतन दरमहा चालू ठेवण्यासाठी सहकार विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे व्यवस्थापन अनुदान देखील बॅंकांनी परस्पर खर्च न करण्याचे ठरले आहे. याशिवाय जिल्हास्तरीय समित्यांचे स्वतंत्र बॅँक खाते उघडून वेतन दिले जाणार असल्याने शासकीय सेवेते येण्याचे आमचे पहिले पाऊल आहे, असेही गटसचिवांनी म्हटले आहे.

इतर ताज्या घडामोडी
शीतकरण केंद्र बंद असल्याने दुग्धोत्पादक...अमरावती : वाशीम येथील शासकीय दुग्ध योजनेकडून...
पुणे बाजार समिती असुविधांच्या विळख्यात पुणे : राज्यात सर्वांत माेठ्या बाजार...
नाशिकला टोमॅटो ४५५ ते १६३५ रुपये क्विंटलनाशिक : नाशिक, नगर जिल्ह्यातून वाढलेली आवक,...
साताऱ्यात वाटाणा, वांगी, गवार तेजीत सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत...
नागपूरमध्ये हरभरा सरासरी ५६४० रुपये...नागपूर ः कळमना बाजार समितीत गेल्या आठवडाभरापासून...
शेतकऱ्यांना न्याय मिळायवा हीच भूमिका :...अकोला : भारत हा कृषिप्रधान देश म्हटला जातो, मात्र...
साताऱ्यात दमदार पावसामुळे पाणीटंचाईची... सातारा : जिल्ह्यात गेल्या सप्ताहात झालेल्या...
‘सिद्धेश्‍वर’कडून गतहंगामातील उसाला... सोलापूर : दुष्काळ, कमी पाऊसमान यामुळे...
वऱ्हाडात मॉन्सूनपूर्व कपाशीचे नुकसान अकोला : गत आठवड्यात काही भागांत संततधार पाऊस...
गवारगमसह तांदूळ निर्यात वाढलीमुंबई ः अमेरिकेतून मागणी वाढल्याच्या...
उकाडा वाढलापुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने...
जळगावमध्ये नवती केळी १०२५ रुपये क्विंटल जळगाव ः मागील आठवड्याच्या सुरवातीला जिल्ह्यात...
सोलापुरात वांगी, कोबी, ढोबळी मिरचीच्या... सोलापूर ः येथील बाजार समितीच्या आवारात गत...
एक लाख हेक्टरने हरभऱ्याचा पेरा वाढणारपुणे : राज्यात यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे रब्बी...
राज्यात दुधाचा एकच ब्रॅँड बनविणार :...राहुरी, जि. नगर : गुजरातमधील ‘अमूल’प्रमाणेच...
जनताप्रश्नी सरकार अधिक संवेदनशील :...नवी दिल्ली ः ``जनतेच्या प्रश्नी सरकार अधिक...
पुणे विभागात रब्बीसाठी आठ लाख टन खताची...पुणे  ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून...
बुलेट-ट्रेनसाठी महाराष्ट्राला २५ हजार...नगर : मुंबई- अहमदाबाद बुलेट-ट्रेनऐवजी चंद्रपूर ते...
पावसाचा केळी, कापूस, मका, ज्वारीला फटका यावल, जि. जळगाव  : शहर व परिसरात या...
परभणीत गहू, हऱभऱ्याचे क्षेत्र वाढण्याची... परभणी : येत्या रब्बी हंगामामध्ये जिल्ह्यात २...