agriculture news in Marathi, agrowon, strike If the for Koyna project affected action not taken, | Agrowon

‘कोयना प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत कार्यवाही न झाल्यास आंदोलन’
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 12 एप्रिल 2018

सातारा  ः ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेल्या बैठकीत मांडण्यात आलेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत कार्यवाही न झाल्यास मुंबईतील आझाद मैदानावर तीव्र आंदोलन करू,’’ असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे संस्थापक डॉ. भारत पाटणकर यांनी दिला. 

मुंबईमध्ये पाटण, जावळी, महाबळेश्वर, कोरेगाव व कऱ्हाड तालुक्‍यांतील कोयना प्रकल्पग्रस्तांचा नुकताच मेळावा झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी हरिश्‍चंद्र दळवी, बाजीराव कदम, संदीप कदम, संजय कदम, राजू मोरे, अजय पाटील, शलाका पाटणकर, दत्ता देशमुख, चैतन्य दळवी, श्रीपती माने, विठ्ठल सपकाळ उपस्थित होते. 

सातारा  ः ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेल्या बैठकीत मांडण्यात आलेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत कार्यवाही न झाल्यास मुंबईतील आझाद मैदानावर तीव्र आंदोलन करू,’’ असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे संस्थापक डॉ. भारत पाटणकर यांनी दिला. 

मुंबईमध्ये पाटण, जावळी, महाबळेश्वर, कोरेगाव व कऱ्हाड तालुक्‍यांतील कोयना प्रकल्पग्रस्तांचा नुकताच मेळावा झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी हरिश्‍चंद्र दळवी, बाजीराव कदम, संदीप कदम, संजय कदम, राजू मोरे, अजय पाटील, शलाका पाटणकर, दत्ता देशमुख, चैतन्य दळवी, श्रीपती माने, विठ्ठल सपकाळ उपस्थित होते. 

डॉ. पाटणकर म्हणाले, की माझ्यावर टीका करत बसण्यापेक्षा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा. पाटण तालुक्‍यातील कोणीही लोकप्रतिनिधींनी याचे श्रेय घ्यायचा प्रयत्न करू नये. प्रकल्पग्रस्तांच्या समस्या या ६४ वर्षे झाली, तरी सोडविल्या नाहीत आणि आता श्रेय घ्यायला जर कोण येत असेल, तर त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. ज्यांनी कोयना प्रकल्पग्रस्तांसाठी काहीही केले नाही.

डॉ. पाटणकर प्रश्न सोडवत असतील, तर त्यात कुणाला वाईट वाटून घ्यायचे कारण नाही. पाटण तालुक्‍यातील ९३, जावळी-महाबळेश्वर मिळून १०५, कोरेगावाची पाच गावे कोयनेत येतात. २७ दिवस रात्रंदिवस आंदोलन स्थळावर उपस्थित राहिलेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांच्या विचारांचा हा लढा आहे. विजय प्रकल्पग्रस्तांचा आहे, मी फक्त निमित्त मात्र आहे. माझ्यावर टीका करणाऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी काय केले, याचे उत्तर द्यावे.

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या २७ दिवसांच्या आंदोलनात एका पक्षाच्या कोयना विभागातील पदाधिकाऱ्यांनीच विरोध केला. ही बाब प्रकल्पग्रस्तांना वेदना देणारी आहे. निष्क्रियता लपविण्यासाठी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या एकीत फूट पडण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. तो त्यांनी बंद करावा, अन्यथा प्रकल्पग्रस्त जनता तुम्हाला गावात फिरू देणार नाही.’’ 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...