ऑनलाइन गाळप परवाने ऑक्टोबरपासून
मनोज कापडे
रविवार, 24 सप्टेंबर 2017

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांना यंदाचा गाळप हंगाम सुरू करण्यासाठी परवाने देण्याची प्रक्रिया ऑक्टोबरपासून सुरू होईल. यंदा सहकारातील किमान ८७ साखर कारखान्यांना परवाने दिले जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

‘राज्याचा गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे मंत्री समितीने ठरविल्यामुळे परवानेवाटपाची प्रक्रिया ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होऊ शकते. परवान्यासाठी अत्यावश्यक ठरविलेली सर्व माहिती साखर कारखान्यांकडून संगणकीय प्रणालीत भरली गेली आहे.

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांना यंदाचा गाळप हंगाम सुरू करण्यासाठी परवाने देण्याची प्रक्रिया ऑक्टोबरपासून सुरू होईल. यंदा सहकारातील किमान ८७ साखर कारखान्यांना परवाने दिले जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

‘राज्याचा गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे मंत्री समितीने ठरविल्यामुळे परवानेवाटपाची प्रक्रिया ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होऊ शकते. परवान्यासाठी अत्यावश्यक ठरविलेली सर्व माहिती साखर कारखान्यांकडून संगणकीय प्रणालीत भरली गेली आहे.

त्यासाठी आम्ही ३० सप्टेंबरची मुदत कारखान्यांना दिली आहे. त्यामुळे ही मुदत संपताच परवानेवाटप सुरू होईल,’ असे सहकार विभागातून सांगण्यात आले. 
सहकारातील ८७ आणि खासगी क्षेत्रातील ८३ साखर कारखाने यंदा ऑनलाइन परवाना मिळण्यासाठी तयारी करीत आहेत.

गेल्या हंगामात सहकारातील ८८ कारखान्यांनी परवाना घेतला होता. म्हणजेच राज्याची सहकारी साखर कारखानदारी आता स्थिरावल्याचे चित्र दिसत आहे. याउलट खासगी कारखान्यांचा विचार करता २०१५-१६ च्या हंगामात ७८, २०१६-१७ मध्ये ६२ आणि आता ८३ साखर कारखाने परवाना घेण्याची तयारी करीत आहेत. 

‘राज्यात खासगी साखर कारखानदारी सहकारी कारखान्यांना तोडीस तोड म्हणून उतरली आहे. आमच्या दृष्टीने आता सहकारी आणि खासगी कारखाने समान संख्येत दिसत असल्यामुळे साखर उद्योगात सहकार यशस्वी ठरतो की खासगी व्यवस्था आदर्श ठरेल, याचा निवाडा पुढील काही वर्षांत होईल.

सहकारातील नेते आणि काही कारखानदारांनीच खासगी पातळीवर साखर कारखाने चालविण्यास घेतल्यामुळे सहकारी व्यवस्थेला खासगी कारखाने चालविता येतात काय हेदेखील स्पष्ट होईल,’ असे सूत्रांचे म्हणणे आहे.  गेल्या हंगामात ३७३ लाख टन ऊस राज्यात होता. त्यातील १०३ लाख टन ऊस खासगी कारखान्यांच्या वाट्याला आला होता. चालू हंगामासाठी ६५० लाख टन ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

त्यातील किती ऊस स्वतःकडे आणण्याचा प्रयत्न सहकारी साखर कारखाने करतात यावर सहकारी साखर उद्योगाचे भवितव्य ठरणार आहे.  राज्यातील ८८ सहकारी साखर कारखान्यांनी गेल्या हंगामात २६८ लाख टन उसाचे गाळप करून ३० लाख ६८ हजार क्विंटल साखर तयार केली होती. सहकारी साखर कारखान्यांचा एकूण सरासरी साखर उतारा ११.४१ टक्के, तर खासगी कारखान्यांचा उतारा १०.८० टक्क्यांच्या आसपास होता. 

इतर अॅग्रो विशेष
खुल्या शेतीतील गुलाब लागवड तंत्रज्ञान गुलाबाच्या फुलांचा उपयोग...
ज्ञानाचा प्रकाशदिवाळी... प्रकाशाचा, उत्साहाचा सण! सारी दुखं...
साडेआठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ४...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...जळगाव ः जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...
पोषक तत्त्वांनीयुक्त खजूर, अक्रोड, काजूपोषक तत्त्वे आणि आरोग्याच्या दृष्टीने अक्रोड अाणि...
रब्बी हंगामासाठी कांदा जाती अन्‌...महाराष्ट्रात रब्बी कांदा पिकाचे क्षेत्र मोठ्या...
बाजरी चारा पीक लगवड तंत्रज्ञान बाजरी हे पीक पालेदार, रसाळ, गोड व मऊ असते....
जळगाव जिल्ह्यात दादर ज्वारी तरारली जळगाव  ः खानदेशात यंदा परतीच्या पावसामुळे...
कांद्यावर डिसेंबरपर्यंत 'स्टॉक लिमिट'नवी दिल्ली : नफेखोरपणा, साठेबाजी, वाढते दर आणि...
सांगली जिल्ह्यात भाजपच्या वारुला ब्रेकसांगली ः लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत...
कर्जमाफी योजनेस प्रारंभ...राज्य सरकारची...मुंबई : कर्जमाफी देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या...
वाढत्या लोकसंख्येसाठी व्हर्टिकल फार्म...भारतासारख्या उच्च लोकसंख्या असलेल्या देशांसाठी...
निशिगंध लागवड तंत्रज्ञान निशिगंधाची फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात....
बरसीम पीक लागवड बरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे...
‘जीवनसंगिनी’ची प्रकाशवाटनैसर्गिक आपत्तींचा कहर आणि अनिश्चित बाजार अशा...
बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर...मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट)...
रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचेरब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात कापूस खरेदी २५ पासूननागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन...
नेताओं की दिवाली, किसानों का दिवालादोन दिवसांपूर्वी मला अमरावती जिल्ह्यातील शेतकरी...
ऊसावरील कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन तपशील : पूर्व मशागत     कीड...