ऑक्टोबरपासून गाळपास कारखान्यांचा विरोध
मनोज कापडे
रविवार, 10 सप्टेंबर 2017

पुणे ः केंद्रीय अन्न मंत्रालयाने यंदा ऊस गाळप हंगाम एक ऑक्टोबरपासून सुरू करण्याची सूचना राज्य सरकारांना केली आहे. मात्र साखर कारखान्यांनी या धोरणाला विरोध केला असून गाळप नोव्हेंबरपासून सुरू करण्याची भूमिका घेतली आहे.

पुणे ः केंद्रीय अन्न मंत्रालयाने यंदा ऊस गाळप हंगाम एक ऑक्टोबरपासून सुरू करण्याची सूचना राज्य सरकारांना केली आहे. मात्र साखर कारखान्यांनी या धोरणाला विरोध केला असून गाळप नोव्हेंबरपासून सुरू करण्याची भूमिका घेतली आहे.

केंद्रीय अन्न मंत्रालयाने ऊस उत्पादक राज्यांना ऑक्टोबरपासून गाळप सुरू करण्याची सूचना केली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे यांनी सांगितले, की गाळप ऑक्टोबरमध्ये सुरू केल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. पहिल्या टप्प्यात उतारा मिळत नाही. लवकर गाळपाची भूमिका कारखान्यांना आर्थिक अडचणीत टाकणारी आहे. त्यामुळे ऊस उपलब्धता, मजुरांची टंचाई आणि कमी उतारा अशा समस्यांना तोंड द्यावे लागेल. हा प्रकार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनाही आवडलेला नाही. त्यांनी राज्य शासनाशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, बोलणे होऊ शकले नाही.

ऑक्टोबरमध्ये गाळप सुरू केल्यास कारखाने अडचणीत येतील. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात देखील अडचणी येण्याची शक्यता आहे, अशी भूमिका श्री. पवार यांच्याकडून राज्य शासनासमोर मांडली जाणार आहे. 

दरम्यान, राज्यातील साखर कारखान्यांना ऊस उत्पादकता विकासाकडे वळविण्यासाठी व्हीएसआयकडून पुढील वर्षापासून विशेष पारितोषिक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यात अग्रेसर ठरणाऱ्या कारखान्याला एक कोटी रुपयाचे प्रथम बक्षीस, दुसरे बक्षीस पाऊण कोटीचे तर तिसरे बक्षीस ५१ लाखांचे राहील, असा धोरणात्मक निर्णय श्री. पवार यांनी घेतला आहे. त्यामुळे व्हीएसआयच्या सभासद कारखान्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. 

शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार
राज्यातील साखर कारखान्यांचे शिष्टमंडळ याबाबत १५ तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून ऑक्टोबरच्या गाळप धोरणाला विरोध करणार आहे. त्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, ‘व्हीएसआय’चे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली साखर कारखान्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. शरद पवारदेखील यावेळी कारखान्यांची बाजू मांडणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेदेखील साखर उद्योगात असल्यामुळे त्यांनाही या चर्चेत सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

इतर अॅग्रो विशेष
संकरित नेपिअर चारा पीक लागवड तंत्रज्ञानसंकरित नेपिअर हे बहुवार्षिक, भरपूर व चांगले...
शेतकर्यांना आथिर्क सक्षमतेकडे नेणारी...शेतमालाला योग्य बाजारभाव मिळावा, शेतकऱ्यांची...
आंतरपीक पद्धतीतून वाढवा उत्पन्नआंतरपीक पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता वाढते....
मधुमेहींच्या आयुष्यात येणार गोडवापुणे ः निरोगी आयुष्याची गोडी खऱ्या अर्थाने वाढेल...
कृषी विद्यापीठांना हवीय स्वायतत्तापुणे : राज्यातील चार कृषी विद्यापीठांमध्ये क्षमता...
कापूस वेचणीसाठी प्रतिकिलो पाच रुपये...जळगाव : ढगाळ वातावरण आणि उघडीप यात अडकलेल्या...
मराठवाड्यात रब्बीची ४ टक्के क्षेत्रावर...औरंगाबाद : यंदा सर्व आशा रब्बी हंगामावर अवलंबून...
अॅस्टर लागवड तंत्रज्ञान ॲस्टरची फुले सजावट, फुलदाणी, हार-गुच्छ तयार...
लक्ष्मीपूजनच्या पार्श्वभूमीवर झेंडूने...नाशिकला प्रतिक्विंटल २५० ते ५०० रुपये नाशिकच्या...
गुणवत्तापूर्ण दुधाला मिळाला किफायतशीर दरबाजारपेठेत रसायनमुक्त अन्नधान्य तसेच दुधाची मागणी...
खुल्या शेतीतील गुलाब लागवड तंत्रज्ञान गुलाबाच्या फुलांचा उपयोग...
ज्ञानाचा प्रकाशदिवाळी... प्रकाशाचा, उत्साहाचा सण! सारी दुखं...
साडेआठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ४...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...जळगाव ः जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...
पोषक तत्त्वांनीयुक्त खजूर, अक्रोड, काजूपोषक तत्त्वे आणि आरोग्याच्या दृष्टीने अक्रोड अाणि...
रब्बी हंगामासाठी कांदा जाती अन्‌...महाराष्ट्रात रब्बी कांदा पिकाचे क्षेत्र मोठ्या...
बाजरी चारा पीक लगवड तंत्रज्ञान बाजरी हे पीक पालेदार, रसाळ, गोड व मऊ असते....
जळगाव जिल्ह्यात दादर ज्वारी तरारली जळगाव  ः खानदेशात यंदा परतीच्या पावसामुळे...
कांद्यावर डिसेंबरपर्यंत 'स्टॉक लिमिट'नवी दिल्ली : नफेखोरपणा, साठेबाजी, वाढते दर आणि...
सांगली जिल्ह्यात भाजपच्या वारुला ब्रेकसांगली ः लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत...