agriculture news in marathi, agrowon, sugar production, vsi, pune | Agrowon

ऊस उत्पादकतावाढीसाठी उद्या व्हीएसआयमध्ये कार्यशाळा
मनोज कापडे
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

पुणे : राज्यातील उसाची उत्पादकता वाढविण्यासाठी यापुढे संशोधनावर भर देण्याचा संकल्प वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने (व्हीएसआय) केला आहे. त्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्या (ता. ९) ‘व्हीएसआय’ने कार्यशाळेचे आयोजन केले आहे. 

साखर कारखान्यांसाठी स्वंतत्र ऊस विकास कार्यशाळेचे नियोजन करण्याचा निर्णय ‘व्हीएसआय’ने घेतला होता. त्यानुसार उद्या सकाळी दहा वाजता व्हीएसआयच्या मांजरी बुद्रुक (ता. हवेली) येथील मुख्यालयात कार्यशाळेला सुरवात होईल. 

पुणे : राज्यातील उसाची उत्पादकता वाढविण्यासाठी यापुढे संशोधनावर भर देण्याचा संकल्प वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने (व्हीएसआय) केला आहे. त्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्या (ता. ९) ‘व्हीएसआय’ने कार्यशाळेचे आयोजन केले आहे. 

साखर कारखान्यांसाठी स्वंतत्र ऊस विकास कार्यशाळेचे नियोजन करण्याचा निर्णय ‘व्हीएसआय’ने घेतला होता. त्यानुसार उद्या सकाळी दहा वाजता व्हीएसआयच्या मांजरी बुद्रुक (ता. हवेली) येथील मुख्यालयात कार्यशाळेला सुरवात होईल. 

राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी संचालक, कृषी विकास अधिकारी आणि ऊस पुरवठा अधिकाऱ्यांशी यावेळी श्री. पवार संवाद साधणार आहेत. ‘व्हीएसआय’ने शेतकऱ्यांसाठी ‘ऊस शेती ज्ञानयाग’देखील आयोजित केला होता. या उपक्रमातून राज्यातील शेतकऱ्यांना ऊस शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान प्रात्यक्षिकासहीत दिले जाते. 

‘व्हीएसआय’चे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांच्या म्हणण्यानुसार राज्याची ऊस उत्पादकता गेल्या दोन दशकांपासून स्थिर आहे. मात्र, साखर उद्योगात महाराष्ट्राशी स्पर्धा करणाऱ्या उत्तर भारतात ऊस आणि साखर उत्पादनात चांगली वाढ होताना दिसते आहे. त्यामुळे राज्यातील साखर कारखान्यांना उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. 

उत्पादकता वाढीसाठी कारखान्यांना अर्थातच चांगल्या प्रतीचा ऊस पुरवठा शेतकऱ्यांकडून होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ऊस लागवडीकडे भर द्यावा लागणार आहे. सध्याच्या लागवड तंत्रज्ञानात बदल, चांगल्या जातींचा वापर होण्यासाठी ऊस विकास कार्यक्रम राबवावा लागेल, असेही ‘व्हीएसआय’चे म्हणणे आहे.

इतर ताज्या घडामोडी
अब आया उंट पहाड के निछे; राजू शेट्टींचा...सोलापूर : शेतकऱ्यांच्या दूध दराच्या प्रश्‍...
सरकार रिलायन्स, पतंजलीच्या दुधाची वाट...नागपूर : एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस-...नागपूर : कधी देणार कधी देणार...कापूस, धानाला...
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...