ऊस विकास विभागाने चूक सुधारावी

राज्यातील सर्व कारखान्यांनी ऊस विकास हाच आता सार्वजनिक जबाबदारी समजली पाहिजे. ऊस नोंदणी, तोडणी समन्वयाने केली तर उसाची आणि साखरेची उत्पादकता वाढेल. -दिलीप वळसे पाटील,उपाध्यक्ष,व्हीएसआय
दिलीप वळसे पाटील
दिलीप वळसे पाटील

पुणे : राज्यातील काही साखर कारखान्यांमधील ऊस विकास विभाग मूळ कामे करीतच नाहीत. या विभागांचा वापर केवळ वाहतूक आणि तोडणीसाठी करून घेतला जातो. ही चूक आता सुधारली पाहिजे, असे मत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट(व्हीएसआय)चे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.  ‘व्हीएसआय’ने राज्यातील उसाची उत्पादकता वाढविण्यासाठी आयोजित केलेल्या चर्चासत्रात श्री. वळसे पाटील यांनी आपली मते स्पष्टपणाने मांडली. ‘‘साखर कारखान्यांनी आपला ऊस विकास कार्यक्रम भक्कमपणे राबविण्यासाठी ऊस विकास खाते सक्षम करण्याची आवश्यकता आहे. या खात्यामार्फत पुरेसा निधी उपलब्ध करून देत ऊस विकासाच्या योजना राबविल्या पाहिजेत. मात्र, अनेक कारखान्यांमध्ये हा विभाग नावापुरता आहे, असे श्री. वळसे पाटील म्हणाले.  ऊस विकास विभागाची मूळ जबाबदारी अतिशय महत्त्वाची असते. मात्र, केवळ तोडणी व वाहतूक नियोजनात या विभागाचा वेळ घालविणे चुकीचे ठरते. राज्यातील सर्व कारखान्यांनी ऊस विकास हाच आता सार्वजनिक जबाबदारी समजली पाहिजे. ऊस नोंदणी, तोडणी समन्वयाने केली तर उसाची आणि साखरेची उत्पादकता वाढेल, असे श्री. वळसे पाटील यांनी नमूद केले.

राज्यातील साखर कारखानदारीला ऊर्जितावस्था आणण्यासाठी कारखाना कार्यक्षेत्रात ऊस विकास हाच मध्यवर्ती हेतू आपण ठेवला पाहिजे. ‘व्हीएसआय’ने नवीन जाती आणि जैविक खते, कीडनाशके तसेच निविष्ठा निर्मितीचा मोठा कार्यक्रम हाती घेतला आहे. कारखान्यांनी महाग आणि निकृष्ठ निविष्ठांवरचे अवलंबित्व कमी केले पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळू शकते, असेही श्री. वळसे पाटील यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com