agriculture news in Marathi, agrowon, sugarcane labor On the way back to home | Agrowon

ऊसतोड मजूर परतीच्या मार्गावर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 2 एप्रिल 2018

पुणे  ः साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपत आला आहे. साखर कारखाना स्थळावर रोजीरोटीसाठी आलेल्या ऊसतोड मजुरांना परतीचे वेध लागले आहे. आतापर्यंत राज्यातील सुमारे ७८ साखर कारखाने बंद झाल्याने ऊसतोड मजूर परतीच्या मार्गावर आहेत.  

पुणे  ः साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपत आला आहे. साखर कारखाना स्थळावर रोजीरोटीसाठी आलेल्या ऊसतोड मजुरांना परतीचे वेध लागले आहे. आतापर्यंत राज्यातील सुमारे ७८ साखर कारखाने बंद झाल्याने ऊसतोड मजूर परतीच्या मार्गावर आहेत.  

गेल्या ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात बहुतांशी साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला होता. यंदा हंगामात सुमारे १८७ साखर कारखाने सुरू झाले होते. त्यामुळे ऊस तोडणी मजुरांनी गावाकडून येऊन पाच ते सहा महिने ऊस तोडणीचे काम केले. मात्र, गेल्या आठवड्यापासून साखर कारखान्यांचा गाळप हंगाम बंद होऊ लागला आहे. येत्या महिनाअखेरपर्यंत गाळप चालू केलेल्या बहुसंख्य साखर कारखान्यांचा गाळप हंगाम बंद होण्याच्या मार्गावर असल्याने ऊस तोडणी मजुरांची गावाकडे परत जाण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. 

गेल्यावर्षी याच कालावधीत १४९ साखर कारखाने बंद झाले होते. यंदा उसाचे क्षेत्र अधिक असल्याने कारखानेदेखील उशिरा बंद होत आहे. राज्यात सहकारी १०१ तर खासगी ८६ साखर कारखाने सुरू झाले होते. बीड, औरंगाबाद, जालना, नाशिक व जळगाव या जिल्ह्यांतून सुमारे आठ ते दहा हजार ऊस तोडणी मजूर साखर कारखाना क्षेत्रात ऊस तोडणीसाठी दाखल झाले होते. साखर कारखान्यांचे गाळप चालू असताना मजूर ज्या भागातून येतात तेथील गावे, वाड्या, वस्त्या, तांडे निर्मनुष्य होतात. तेथे केवळ वयस्कर महिला, पुरुष व शाळेत शिक्षण घेणारी मुले राहतात. गाळप हंगाम सुरू असताना कष्ट करण्यासाठी सहा महिने घरदार मुलेबाळे सोडून हे मजूर कारखाना कार्यक्षेत्रात येतात. या काळात ऊस तोडणीतून येणाऱ्या पैशावर उर्वरित पाच ते सहा महिने कुटुंब चालते.

हंगामाच्या काळात उसाचे वाढे विकून कुटुंबाची गुजराण करतात. आता उन्हाळ्याची चाहूल लागली असून साखर कारखान्यांनीही आपला गाळप हंगाम आटोपता घेतला आहे. त्यामुळे तोड मजुरांना घरची ओढ लागली असून त्यांची गावाकडे जाण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. 

बाजारपेठा ओस पडणार 
साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर ऊस तोडणी मजुरांमुळे कारखाना परिसरातील गावे व ऊस क्षेत्रातील आठवडे बाजार व दैनंदिन बाजारपेठा गर्दीने फुलून जातात. त्यामुळे हॉटेल, किराणा दुकानादार अशा छोटे व्यावसायिकही तेजीत असतात. मात्र, आता मजूर गावी परतल्यानंतर बाजारपेठांवर परिणाम होणार असून बाजारपेठा काही प्रमाणात ओस पडतील. 
 

इतर ताज्या घडामोडी
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...
आंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या...मिजमाशी प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर,...
फळपिके सल्लाकोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानाचा कमी जास्त...
योग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...
धनगर समाजाचा उद्या औरंगाबादमध्ये धडक...औरंगाबाद : धनगर समाजाला एस.टी.(अनुसूचित जमाती)...
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव...मनमाड, जि. नाशिक : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक,...
केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री अनंत...बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण...
ऊस दरप्रश्नी सोलापुरात ‘स्वाभिमानी’...सोलापूर  ः गेल्या गळीत हंगामातील उसाची...
दिवाळी संपूनही शासकीय कापूस खरेदीला...अकोला : या हंगामात लागवड केलेल्या बागायती तसेच...
ऊस दरासाठी सातारा जिल्ह्यात रास्ता रोकोसातारा  ः जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने...
थकीत एफआरपीच्या मागणीसाठी शिरोळ येथे...कोल्हापूर  : साखर कारखान्यांनी गेल्या...
ऊस दरप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे त्रिधारा...परभणी : मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी यंदाचे ऊस...
सांगलीत एकरकमी ‘एफआरपी’कडेगाव, जि सांगली  ः कोल्हापूर जिल्ह्याने...