agriculture news in Marathi, agrowon, Suspend to Prashant Paricharak | Agrowon

प्रशांत परिचारकांना बडतर्फ करा, शिवसेनेची मागणी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 मार्च 2018

मुंबई : विधान परिषदेचे भाजपपुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीवरून शिवसेनेने मंगळवारी (ता.६) पुन्हा आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला अडचणीत आणले. याच मुद्यावर शिवसेना सदस्यांनी सभात्याग केला. 

आमदार परिचारक यांचे वक्तव्य हे सैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अपमान करणारे असून, या वक्तव्याबाबत कठोरातील कठोर शिक्षा द्यायला पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी केली. या वेळी शिवसेनेच्या आमदारांनी प्रशांत परिचारक यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रशांत परिचारक हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबतचा निर्णय येथे घेता येत नसल्याची बाब शिवसेनेच्या सदस्यांच्या नजरेस आणून दिली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की विधानसभेप्रमाणे विधान परिषदेचे सभागृह स्वायत्त आहे. तेथे या विषयावर चर्चा करण्यात येत असून याबाबत निर्णय होईल. त्यानंतर परिचारक यांच्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट नसल्याचा आरोप करत सर्व शिवसेना सदस्यांनी सभात्याग केला.

इतर बातम्या
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
पाण्याअभावी फळबागांवर संकटअकोला : फळबागांसाठी अोळख असलेल्या अकोट तालुक्यात...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
तूर हमीभाव नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठसांगली : खरेदी केंद्रात तूर विक्रीसाठी ऑनलाइन...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...